The panchamahabhuta are the five elements of nature. According to Hindu mythology, every human body essentially are made from five elements which are Earth (bhumi), Water (jala), Fire (agni), Air (Vayu) and Space (aakash). Hindus believe that, upon death; all these 5 elements of human body are dissolved to respective element of nature, so that it can balance the cycle of nature.Each of these five elements has its own functions and characteristic
पंचमहाभूतांनी मिळून हे शरीर बनलेले आहे तसेच या शरीरात आंबट, गोड, खारट, तिखट, कडू आणि तुरट या सहा रसांचा समावेश शरीरात आहे. जगातील सर्व खाद्यपदार्थातून आपणाला या सहा प्रकारच्या चवींचा अनुभव येतो. शारीरिक कार्यांतून याचे कमी-अधिक प्रमाण होत असते त्यामुळे दररोजच्या भोजनात शक्यतो या सहा रसांचा समावेश असावा म्हणजे शरीरातील या सहा रसांची उणीव सुद्धा भरून निघेल.
पंचमहाभुते फार सामर्थवान आहेत, त्याचे चमत्कार आपण बघतोच. त्यालाच ईश्वर मानून त्याची पूजा होत असते. त्याच सिद्ध पुरुषांनी किंवा संतांनी मानवी अवयवांचे साकार रूप देवून म्हंटले आहे कि पंचतत्वाचा हा पुतळा म्हणजेच आपला देह आणि या देहाच्या बाह्यांगावर एक तेजाची (तजेला) छाया असते. ती आपल्याला दिसत नसली तरी त्या छायेमुळे या देहाचे संरक्षण होत असते.
* पार्थिव छाया :
दातांचा, नखांचा आणि केसांचा स्वच्छपणा, त्वचेच तेज हे पृथ्वीतत्वाची छाया होय. यामुळे शरीरावर तेज येते व आकर्षक दिसते आणि सर्व प्रकारचे खानपान व सुखांचा आपण लाभ घेऊ शकतो.
* जलस्वभावी छाया :
हि छाया असल्याने अंगावरील तजेला जणू नवीनच ढगांतून वर्षाव होणाऱ्या उदकाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मल भासतो. अशा छायेच्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे त्याला भाग्यवंत समजल्या जाते.
* अग्नीस्वभावी छाया :
तेजस, प्राणसूर्य, तप्तसुवर्ण, प्रवाळ, भाविक, आस्ति याप्रमाणे त्या व्यक्तीवर तजेल्याचा वर्ण असतो. ह्या सर्व काम व्यवस्थित पार पाडतात म्हणून ह्या व्यक्ती भाग्यवान समजल्या जातात.
* वायूस्वभावी छाया :
अंग मळकट ,दिन, चंचल पणा, आणि खाष्ट स्वभाव या सर्व प्रकाराने ह्या व्यक्ती सदा कचाट्यात सापडतात. त्याच्या द्रव्यनाशासोबतच काही प्रसंगी तो प्राणाशी मुकतो. ह्या अभागी समजल्या जातात.
* आकाशस्वभावी छाया :
स्फटीकाप्रमाणे गुणी, निर्मलता, अंगात जोम प्रदर्शित करण्याची शक्ती अशा छायेची व्यक्ती उत्तम भाग्यशाली समजल्या जाते; त्याला द्रव्यसंपत्ती सहजच लाभते.
याप्रमाणे पंचमहाभूतांबद्दल शात्र सांगते,
आपल्या अस्तित्वाचा भार सांभाळणारी आणि एकमेव आधार म्हणजे पृथ्वी म्हणजेच (माती). माती ही निसर्गाची देणगी आहे. या भूमिनेच आम्हाला निर्माण केले आणि अंती सुद्धा ही काया मातीतच मिळणार
मनुष्याचा सर्व प्रथम व्यवसाय म्हणजे शेती; तो मातीतच करावयाचा असतो. मानवी शरीरास विचारासाठी उर्जेची गरज असते. हवेतील प्राणवायू, सूर्यप्रकाश , पाणी व मातीतील मूलद्रव्ये शेतीच्या रूपाने आपणास मिळत असते. ही सर्व निसर्गाचीच देणगी आहे.
श्वासोच्छवास हा आपला प्राण आहे. संत म्हणतात, हा श्वास आंत येताना ईश्वराला म्हणतो कि सद्गुणी भक्ती, निरोगी काया, माधुर्य, आनंद हे सर्व माझ्या शरीरात प्रवेश करू दे , मला सद्बुद्धी दे व शरीराच्या बाहेर पडताना म्हणतो माझ्या शरीरातील दु:ख , रोग, चिंता, भय हे शरीराच्या बाहेर पडू दे.
हा वायू शरीराला सुदृढ बनवितो व चेतना देतो. पण याचा चांगला फायदा करून घ्यावा. जड चेतना मनुष्याला लोभी बनविते, त्याची संगत नको. मन हे देहाला प्रत्येक पातळीवर नाचवू पाहते. आत्मा हा मनाला व मनाच्या स्थूल शरीराला चालवितो, त्यामुळे सतत ही भावना ठेवायला पाहिजे कि “मी परमात्म्याचाच आहे , परमात्मा माझा आहे, मी आणि माझा परमात्मा न बदलणारे आहे; परंतु देह व संसार बदलणारे आहेत”. देहातील ठाशीवपणा हा पृथ्वीचा अंश आहे; देहातील उष्मा हा अग्नी व सुर्याचा अंश आहे. तो मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळे आपण आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी आहोत. देहातील वायू हा वायुचा अंश आहे आणि देहातील ज्या पोकळ्या आहेत त्या अवकाशाचे (आकाश ) अंश आहेत. या प्रमाणे हा देह पाच तत्वाचा बनलेला आहे.