नवे युग संस्कार !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

In todays world, it is very often that people loose their confidence and instead of trying hard to achieve their goals, they loose their heart and make excusesfor being fail, become jealous on others achievements ; feel lonely and troubled, depressed. In this article , Gayatri parivar has given the moral values , one can use in their life and can transform their life magically. All it needs to believe in oneself.

confidentमहत्वाचे बिंदू -:

स्वत:चा सुधार हीच विश्वातली सर्वात मोठी सेवा आहे.

” आपापला करा सुधार, तेव्हाच मिटेल भ्रष्टाचार ”

मुलांनो ,परमेश्वराने आपल्याला सुंदर आयुष्य दिले आहे. आपण चांगले संस्कार धारण करून श्रेष्ठ जीवन जगायला हवे.

या करीता हे विचार अवश्य वाचा व आत्मसात करा –

* आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दु:ख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहें. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी होणार.

* उठा जागे व्हा ! थांबू नका जो पर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.

* जीवनात चढ-उतार हे येतच असतात, नेहमी हसत रहा . असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.

* अहंकारापासून तितकेच सावध रहा, जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.

* प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा; तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.

* कोणत्याही गोष्टीसाठी स्वत:ला दुखी-कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल व सन्मार्ग सुचवेल. स्वत:च्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन नेहमी गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे  महान कार्य आहे आणि वेळ फार थोडा आहे. जर तुम्ही नको त्या गोष्टीत बेसावधपणे राहिलात तर तुम्हालाच दु:खी व्हावे लागेल. त्याचबरोबर अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोचाल.

* धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वत:च्या बळावर उभे रहा, आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही.

* थोरं मंडळी हे सदैव एकाकी वाटचाल करीत आले आहेंत आणि या एकाकी प्रयत्नांमुळे ते फार दूरपर्यंत पोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वत:च्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वत:च्या अंतरात्म्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखानेच ते नेहमीच प्रफुल्लीत झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दु:ख दूर करावे अशी आशा त्यांनी कधीच बाळगली नाही. स्वत:च्या वृत्तीमध्येच त्यांनी आश्रय शोधला आहे.

* एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्रागा करणे, कर्तव्यपथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वत:च्या अंतरंगात  लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वत:वरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.

* क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याच एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंत :करण दुखावले तर काय तुम्ही या दु:खद गोष्टीचा ऊहापोह करीत राहणार? त्या कष्टप्रद अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वत:च्या मनाला शुभकर्मामध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दु:खांना विसरणे हाच आहे.

* आमचे कुणी  ऐकत  नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्यांने स्वत:कडे बघावे, आत्मनिरीक्षण केल्यास स्वत:च्या निश्चिततेची साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला पण कार्यात तल्लीन व्हा. थोड्याच दिवसात असे दिसून येईल कि लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्ये  अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो.

* मनुष्याला एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो इतरांकडून शंभरपट कामे करवून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो, कि आश्चर्यच वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतके विराट प्रमाणात सत्साहीत्य लिहिण्यापासून, आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरु करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हाच ध्यास आहे.

* काय करावे ? परिस्थिती आम्हाला अनुकूल नाही!  आम्हाला कोणी मदत करत नाही; काही विशेष करण्याची संधीच आम्हाला प्राप्त होत नाही; अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहणे व्यर्थ आहे. आपल्या दोषांचे खापर इतरांच्या माथी फोडण्याच्या अशा सवयीमुळे मनाला खोटे समाधान लाभू शकते. स्वत:च्या वर्तमान परिस्थितीकरीता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवी-देवतांसमोर नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वत:वर विश्वास नसणे.

* दुसऱ्यांना सुखी बघून परमेश्वराच्या न्यायावरच शंका घेऊ लागतो. परंतु या सुखी लोकांनी किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत यांकडे आम्ही पूर्णत: दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे कां ? याकडे आम्ही लक्ष द्यावे. ईश्वर कोणत्याही बाबतीत पक्षपात करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांनाच मुक्त हाताने, सढळपणे प्रदान केले आहे; ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वत:ची उन्नती करता येईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu