There are more explanations in Mundaka,besides Srimad Bhagavatam and Bhagavat Gita on Brahmma jyoti. Brahma-Jyoti is with us. Heat is the sign of vision of Jyoti (by Sadhaka). If we put our hands on our body, we will feel the heat of it; that heat will reveal the presence of Brahma-Jyoti within us. That heat is not present in a body which is dead.
ब्रह्मज्योत ब्रम्हांडातील ब्रम्हरंध्रांत स्थित आहे. ब्रह्मरंध्रालाच शून्यस्थान, मुर्धिनीस्थान, दशवेद्वार किंवा स्थान म्हणतात. पिंडातील हृद्य आणि ब्रम्हांडांतील हृद्य अशी दोन हृद्यस्थानें असतात.
[१] पिंडातील हृद्य :- पिंडातील हृद्यस्थान दोन्ही वक्षस्थळांच्या मध्यभागी असते. याच स्थानी अनाहत चक्र असून तेथे प्राण आणि मन यांचे ऐक्य होते. चित्ताच्या एकाग्रतेने परा व मन यांचा लय होऊ लागला म्हणजे नाभीस्थानातील कुंडलिनी शक्ती जागृत होऊन, ऊर्ध्वमार्गाने सहस्त्रदळचक्राकडे जाण्यास निघाली असता; ती वक्षस्थळाचे मध्यभागी येतांच, ज्योतआकारांचा धवल, लख्ख प्रकाश प्रगट होतो. या स्थानास ह्रद्कमल किंवा हृद्यस्थान म्हणतात.
[२] ब्रम्हांडांतील हृद्य :- ब्रम्हांडांतील हृद्यस्थान त्रिकुटांच्या वर आहे, त्यास दशवेद्वार म्हणतात. त्या दशवेद्वारालाच हृद्य, हृत्पद्म, पद्मगर्भ, मुर्धिनी, शून्य, कैवल्य, भ्रमरगुंफा, निरंजनपुर, अल्क्ष्पूर, अमरपूर, सहस्त्रदळ, ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्र दशवेद्वारातील सोहं ब्रह्मज्योत अंगुष्ट प्रमाणाची दिव्य, तेजोमय, अखंड, अविनाशी, अहर्निश, निरंतर, स्वयंभू प्रकाशित आहे.