सुविचार- संत तुकारामांचे
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Good thoughts or the Suvichar are the thoughts which may guide your life towards a way where you can lead your life towards great satisfaction and  joy . In other words, these are the thoughts which motivates us to achieve goals, we have set in our life .  This post gives one such thought given by Sant Tukaram, in which he had pleaded god to keep away from the evil things.

” पापाची वासना नको दावू डोळा, त्याहुनि आंधळा बराच मी

  निंदेचे श्रवण नको माझे कानी , बधीर करोनी ठेवी देवाsant-tukaram-maharaj

  अपवित्र वाणी नको माझ्या मुखा , त्याहूनी  मुका बराच मी

  नको मज कधी परस्त्री संगती ,  जनातून माती उठता भली

 तुका म्हणे मज अवघ्याचा  कंटाळा ,  तू एक गोपाळां मज आवडसी|| “

” हे देवा, माझी दृष्टी निर्मळ ठेव. माझ्या डोळ्यांना वाईट गोष्टी पाहू देवू नको. कोणाची निंदा ऐकण्यापेक्षा तू मला बहिरा ठेव. माझ्या मुखातून कधीही अपवित्र वाणी बाहेर पडू देवू नको, त्यापेक्षा मी मुका झालेला बरा. मला कधीही परस्त्री ची संगत करण्याची पाळी येवू देऊ नको; एक वेळ मी मरण पत्करेन पण परस्त्रीसंग करणार नाही. हे देवा मला या साऱ्या वाईट गोष्टीचा कंटाळा आलेला आहे, मात्र तू मला सदैव आवडतोस. मला तुझी भक्ती प्रिय आहे. तुझीच भक्ती करण्याची मला सद्बुद्धी दे.”

संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्या इंद्रीयांना खूप मोलाचा सल्ला दिला आहे. डोळ्यांनी जीवनातील सकारात्मक अन विधायक बाबींचा वेध घेतला पाहिजे, कानांनी मधुर व आल्हाददायक वाणीवरच आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे ; मुखातून अपवित्र व कठोर शब्द बाहेर पडू नयेत ; पापकर्म, दृष्टकृत्य, परस्त्रीसंग, अभद्रवाणी, परनिंदा या गोष्टी मनुष्याला अधोगतीकडे नेणारया आहेत. मनुष्याने आपले मन स्व्च्छ, निर्मळ, प्रसन्न, आनंदी, उत्साही व सकारात्मक ठेवण्याचा सदोदित प्रयत्न केला पाहिजे, असे तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आवर्जून सांगतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
4 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu