प्रपंच आणि परमार्थ
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

The dictionary definition of “worldly” is “relating to, or devoted to, the temporal world.” Worldliness, then, is the condition of being concerned with worldly affairs, especially to the neglect of spiritual things. The term spirituality has to be understood in a very broad way, it comprises our relation to invisible beings, like for example God, angels, spiritual guides, non incarnated souls and other non incarnated beings. Spirituality also comprises questions about the meaning of life and about our personal attitude towards life as a whole. This article discuss about what and  how to attain spirituality , ignoring the worldliness.

prapanch ani parmarthसामान्य मनुष्य संसार थाटून जीवनातले सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आजच्या या युगात भौतिक  सुखसाधनांची विपुलता आहेच. तीची पूर्णता करण्यात मनुष्य यशस्वी झाला आहे. पण तरी तो सुखी आहे का?

सांगावेसे वाटते, पूर्वी आपल्या समाजात लग्न हे जन्मभराचे बंधन मानल्या जायचे, आज मात्र घटस्फोटाचे प्रमाण कितीतरी वाढले आहे. तसेच आत्महत्येचे प्रमाण काही कमी नाही. त्याचप्रमाणे पैसा, धन, प्रापर्टी करीता एकमेकांचे जीव घेणे हे प्रमाण तर सर्वात अधिकच वाढले आहे. या सर्व गोष्टीं  मानवाला सुख -समाधान नसल्याचेच दर्शवितात. तेंव्हा या सर्व भौतिक सुखांत सुख नाहीच. खरे सुख-समाधान यां बाह्य वस्तूंवर अवलंबून नसून ते मनुष्याच्या अंतर्मनातील शांती वर आहे आणि ती शांती -समाधान फक्त परमार्थानेच प्राप्त होत असते.

संसारातून ऐहिक सुख मिळवावे,परंतु थोडाबहुत परमार्थ केलाच पाहिजे हे योग्य आहे.

परमार्थासाठी थोडा देह झिजविला तरच या नरजन्माचे सार्थक होईल. अन्यथा नाना रोग जडून मृत्यू अवश्यभावी आहे. मृत्यू हा मानवी जीवनाचा शेवट आहे हे तर प्रत्येकाला ठाऊक आहेच परंतु जन्म-मरणाच्या चक्रातून मोक्ष साधण्यातच मानवी  आयुष्याची सार्थकता आहे, हेच खरे ज्ञान होय.

संसारी मनुष्याला देवपूजा, व्रत-वैकल्य, उपवास, पोथी-पुराण वाचणे, धार्मिक चालीरीती, तीर्थयात्रा हे सर्व परमार्थाला पूरक याकरिताच सांगितल्या गेल्या आहेत कारण यानेच त्याचा कल परमार्थाकडे जाऊन, त्याच्यातील सत्वगुण उत्तेजित व्हावा हाच उद्देश.

परमार्थ म्हणजे काय ?

परमार्थ म्हणजे जीवन जगण्याची शैली. मनुष्याने देह, मन, बुद्धी पासून आपण अलिप्त आहोत हे लक्षात ठेवलेच पाहिजे. जीवनात व्यवहार करताना  इंद्रीयांना मिळणार्या सुखापासून मी अलिप्त आहे असा भाव ठेवावा. डोळ्यांना मिळणारे दृष्टीसुख, कानाला मिळणारे नादसुख, नासिकेला मिळणारे सुगंधसुख, त्वचेला मिळणारे स्पर्शसुख आणि रसनेद्वारे मिळणारे चविसुख याचा मी साक्षी आहे , अलिप्त आहे, मी सच्चिदानंदरूप आत्मा आहे असा बोध होणे व व्यवहार हे सर्व लक्षात ठेवणे म्हणजेच परमार्थ ! माझ्यात जे आत्मतत्व आहे ते सर्व मानवातच नव्हे तर या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांत व वनस्पती, वृक्ष -वेलींत विद्यमान आहेत याची जाणीव ठेवून सर्वांशी प्रेमभावाने वागणे हे आत्मज्ञान होणे म्हणजेच परमार्थ. या सर्व उपाधी म्हणजे या संसारात न दिसणारे सुप्त चैतन्यच आहे. या चैतन्याला आत्मा म्हणतात. हे सर्व तत्वज्ञ, संत मानतात व या आत्म्याच्या बोधात आपले संपूर्ण जीवन अत्यंत आनंदाने जगतात. कित्येक संतांना व्यवहारी जगतात दारिद्र्य, जनलोकांद्वारे उपेक्षा, निंदा यांना सामोरे जावे लागले तरी ते आनंदाने डोलत राहिले.

ध्यानाचा अभ्यास :

ध्यानाचा अभ्यास करताना मनाच्या चंचलतेची अडचण येते कारण मन हे वायूसारखे असल्याने त्याला आवरणे अत्यंत कठीण आहे. त्याकरिता ध्यानाचा अभ्यास हा प्रत्यक्ष समजावून घ्यावा लागतो. त्याकरीता पारमार्थिक साधकाची संगती आवश्यक आहे.

 नामस्मरण :

मनुष्य अत्यंत प्रयत्न करून दिवसरात्र प्रपंचाची चिंता वाहतो परंतु हरीचे नामस्मरण करू शकत नाही. कधी कधी नामस्मरण करतो पण परंतु त्याचे चित्त त्यात नसते. तेव्हा या मनाला हरीपाठात लावणे व स्थिर करणे महत्वाचे आहे. इतरत्र कशाचाही विचार न करता नाम मुखाने घ्यावे तेव्हा जीव-शिव एकरूप आहे, असा भाव ठेवावा. नाम घेताना मात्र एकच नामस्मरण करणे उत्तम आहे.

त्रिगुणात्मक संसार हा असार आहे, तेव्हा या संसारावर  विश्वास न ठेवता नामावर श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे. खरा देव निर्गुण आहे त्याचीच प्राप्ती करून घ्यावी. संसारीजणांना सगुण देवतेचे नाम घेवून उपासना करताना निर्गुण देवाची कशी प्राप्ती होईल,  हे कोडे पडणे साहजिक आहे.  तेव्हा उदार अंत:करणाने सद्गुरू या कोड्याची उकल करतात. ‘ज्ञान’ आणि ‘नाम’ या साधना मनुष्याला मोक्ष प्राप्त करून देण्यास समर्थ असतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu