A list of different types of astrology and astrological traditions from around the world. There are two types of Astrology, this article will teach you two types on Astrology in the world.
ज्योतिषाचे दोन प्रकार आहे. एक म्हणजे ग्रहज्योतिष दुसरे फलज्योतिष. ग्रह ज्योतिषाला खज्योतिष,किंवा आकाशज्योतिष म्हणतात. चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे व ईतर तारा आकाशात रोज उदयास्त पावून ज्याची प्रत्यक्ष साक्ष देत आह,ते खगोल किंवा ग्रह ज्योतिष होय. ग्रह ज्योतिषाच्या आधाराने अमुक योग असता अमुक घडेल त्यापासून त्या व्यक्तीला अमुक प्रकारचे सुख किंवा दु:ख होईल किंवा किती दिवसांनी त्याची पीडा दूर होईल ईत्यादी गोष्टींचे ज्ञान स्वानुभवावरून विद्वान ऋषींनी जे अनेक ग्रंथांतून लिहून ठेवलेले आहे तेच खरे फलज्योति:शास्त्र होय. तेथे अमक्या योगाची अमकी फळे हे सर्व त्या ग्रंथात सांगितलेले असते. त्याला फलग्रंथ म्हणतात. आणि त्याचा अभ्यास ज्याला परिपूर्ण आहें तोच पंडीत खरे भविष्य सांगू शकतो.
ज्योतिष्यग्रंथात संख्या दाखविण्या करीता अंकाच्या परिभाषिक संज्ञा योजल्या असतात हि योजना फार सोईची आहे. कारण तिच्या योगाने तद्विषयक पद्द बरीच आटोपशीर असतात. त्यामुळेच बऱ्याच ग्रंथकारांनी हीच पद्धती स्वीकारलेली आहे.