Hanuman and Arjun , both are the great and mighty characters of our two great Epics Ramayana and Mahabharata, Although they belonged from different time period, there are some stories telling about their meeting at once during the time of a pilgrimage of Arjuna in South India . This beautiful and interesting story is described in this article.
“ध्वज स्तंभावरी वानरु । तो मूर्तीमंत शंकरु ।।
सारथी शारंगधरू । अर्जुनेसी ।।“
अर्थ :- ( कथारुपात) धनुर्धारी अर्जुन एकदा फिरत फिरत धनुष्कोडी येथे सागरतीरावर आला असता त्याने रामाचा सेतू पाहीला , तेव्हा तो म्हणाला ”हा असला दगडांचा सेतू उगाच उभारला. त्यापेक्षा बाणांचा सेतू सहज उभारता आला असता !’ हनुमानाने (त्यांचे वास्तव्य तेथेंच असल्याने )अर्जुनाचे हे शब्द ऐकले व त्याला उत्तर दिले, ” वानर फार मोठे , पर्वत प्राय: देहाचे असल्यामुळें बांणाचा सेतू टिकला नसता. ” अर्जुनाला ते पटले नाही आणि त्या दोघांत पैज लागली. अर्जुन म्हणाला, मी बाणांचा सेतू बांधतो; तो तुझ्या वजनाने मोडला तर मी अग्निकाष्ठे भक्षण करीन. हनुमानाने उत्तर दिले ” तर मी तू सांगशील ती तुझी सेवा करीन.” पुढे अर्जुनाने बाणाचा सेतू बांधला आणि हनुमंताने त्यावर पाय ठेवताच तो सेतू कोसळून पडला.
अर्थात अर्जुनाने अग्नी सिद्ध करून त्यात उडी घेण्यासाठी तो तयार झाला, तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण ब्राम्हणाच्या वेशात तेथे आले ‘ याला साक्षी कोण? ‘ असे विचारू लागले ‘व पुन्हा बाणाचा सेतू बांधून दाखवा , मी पाहातो ‘ असे म्हणाले . त्यावर अर्जुनाने पुन्हा बाणाचा सेतू बांधला व हनुमान त्यावरून जाऊ लागले पण सेतू मोडला नाही. कारण भगवंतांनी आपले सुदर्शन चक्र त्याखाली घातले होते आणि सहजच हनुमान पैज हरले , व अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे महाभारताच्या युद्धात त्यांना अर्जुनाच्या रथाच्या ध्वज स्तंभावर बसून त्याचे रक्षण करावे लागले.