The nature of human mind is very difficult to understand because it is very subtle as well as hidden. Therefore, it has been defined in different ways by different thinkers. In this article , we are trying to have some understanding of human mind.
“ याचा गुंता सोडता सोडवेना,
याचा शेंडा नी बुड ; थांगपत्ताच लागे ना ..”
मनाच्या अगम्य अस्तित्वाला मिळालेले कंगोरे त्याच्या असण्याचे पुरावे देतात. कुणी पाहिलत का मनाला ??? पण मन मनातल्या मनात सार्यांनीच जाणलेल, मानलेल. अदृश्य असले तरी अस्तित्वात आहे.
आपल्या आतील चैतन्य म्हणजेच ” मन ”.
भणभणनार्या वार्यासारख्या असंख्य प्रश्नांच्या वावटळी, सागराच्या उसळणार्या लाटांसारख्या एकामागोमाग एक उठणार्या भावनांच्या लहरी तर कधी भयावह करणारे समस्यांचे प्रलय. कधीतर निरभ्र आकाशातील शीतल , शांत, चांदण्यासारखे शुभ्र, स्वच्छ असे नितळ विचार असे काय तरी सांगावे …
कधी राग, कधी लोभ, कधी कुणाविषयी मत्सर, कधी मोह, तर कधी दया, प्रीती, ममता, वात्सल्य या मनाच्या सप्तरंगी छटा ; त्याची गणतीच करता करवेना.
पृथ्वी वर मिळणारा असा दुर्मिळ जन्म; सजीव प्राणी त्यातही मानव म्हणून त्यातील हे मन, त्यात उठणार्या मुलभूत इच्छा ची लालसा तर कधी संस्कारी मानव म्हणून प्रत्येक कृतीवर नियंत्रण मिळविणारा कठोर निश्चय, तर कधी सुगंधी भावनांचा सागर हे सारं काही त्या मनाचच संबोधन!
आपल्यातला सळसळता उत्साह म्हणजे मन ! .. आपल्या जिवंत असण्याच प्रतिक म्हणजे मन !
अनेक वेदना-संवेदना यांनी भरलेलं अस हे मन, बरेच वेळा चांगल-वाईट, खरे-खोटे, होय किंवा नाही यांच्या बुचकळ्यात पडलेलं अस हे मन, किती किती प्रकारचे महायुद्ध चालत असलेले हे मन !
आणि यातही चांगला उपदेश निवडला तर ठीक नाहीतर या उध्वस्त मनाला सावरण म्हणजे कितीतरी कठीण काम !
मग कुठे तरी बुद्धीला मिळवावा लागतो मनावर ताबा. त्यांचे काही निर्णय बुद्धीच्या कसोटीवर सद्विवेकाला साक्षी ठेवत संघर्ष करीत कधी काही गमवावे तर काही कमवावे लागते.