This article will teach about Human life and thoughts. Life is precious. It’s precious because the God of the universe created each one of us. Read this article.
मानवी जीवनात विवेक, विचार आणि संयम यांची नितांत गरज आहे.त्या शिवाय जीवन सुंदर होऊ शकत नाही, सार्थकी लागत नाही. विवेक म्हणजे विचार. चांगले – वाईट यांची डोळस पारख. विवेक नसेल तर कोणतीही गोष्ट करताना स्वैर वागेल, वहावत जाईल किंवा स्वत:चे नुकसान करून घेईल हेच. कोणतीही कृती करताना सांगोपांग सर्व पैलूंनी विचार करावा. तरच कार्य साधेल. स्व्च्छ चारीत्र्यासाठी संयम असावा. संयमच नसेल तर बेताल, स्वैर वागून मनुष्य स्वत:च स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतो.
शिस्त, चिकाटी आणि एकाग्रता हे तीन सद्गुण असल्यास कोणत्याही कामात मनुष्य यशस्वी होतो. परमेश्वराला शोधायचे असेल तर पृथ्वीवर चांगल्या व सद्गुणी मनुष्याच्या अंत:करणातच परमेश्वराचे या जगातील राहण्याचे पवित्र व सुंदर स्थान आहे.
मनात सतत सकारात्मक मनोवृत्ती,आनंदी भावना ठेवावी.प्रतिकूल परिस्थिती, अडी – अडचणी आपल्या समोर असतील तरी त्या दूर होणारच त्यानंतरचा आपला भविष्यकाळ उज्वल असेल अशीच आशा बाळगावी. विश्वास ठेवावा. सततच्या आशावादी भावनेने बिघडलेली परिस्थिती पूर्णपणे बदलून जाईल. विचार परिवर्तन हि फार महत्वाची गोष्ट आहे. विचार बदलले कि आचार हे बदलतातच मनुष्य जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. सारे चित्रच नंतर बदलून जाते, कारण करता करविता हा ईश्वरच आहे आपण त्याच्या हातातले निमित्त मात्र बाहुलेच आहोत.
मनुष्य जे काही मनोमन मागतो प्रभू जवळ मागतो तेच तो देतो. म्हणूनच मागताना संयम असावा. जो संतुष्ट आहे तोच ज्ञानी आहे, नश्वर धनाचे चिंतन सोडा मनाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयास करा. दु:ख असेल तर दूर करा त्याची चिंता करू नका चिंता करून ते नेहमी वाढत असते व आपल्याला चिटकून राहते. मन स्वस्थ तरच तन स्वास्थ्य असते.