If we understand the importance of having the association of a Guru who is a true Saint, then we will naturally want to learn how to recognize him or her. It is difficult to recognize a true enlightened Saint. This article discuss about how to recognize those holy people around us.
आता संतांना ओळखणे म्हणजे एवढे सोपे नाही. त्यांना ओळखण्याची शक्ती आपल्या सर्वसामान्य मनुष्यात नाही. ती शक्ती फक्त संत, महात्मे, गुरु, सद्गुरू किंवा परात्पर गुरु यांच्यात असते. म्हणूनच एक संत दुसर्या संतास पाहता क्षणीच ओळखतो. काही संत एकमेकांच्या दृष्टीस न पडताही एकमेकांना ओळखत असतात. प्रकट ईश्वरीशक्तीच्या आधारे त्यांचा हा खेळ म्हणजेच ‘लीला’ सुरु असतात. संत म्हणजे ईश्वराच्या हातातील कळसूत्री मार्गदर्शक होत. म्हणूनच ते जगाचे कल्याण करू शकतात.
खरे संत म्हणजे ‘परीस’. खोट्या संतांना ओळखणे म्हणजे सोपे आहे परंतु खर्या संतांना ओळखणे सोपे नाही. ते संयमी, शांत, विचारी व मौन असतात, त्यांच्या कडे बघितल्या बरोबरच मनाला आनंद प्राप्त होतो, आपल्याला शक्ती जाणवते आणि मन हलके होवून आतून, अंतरात्मातून एक प्रकारे आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात, शरीराचा थकवा अजिबात नाहीसा होतो.
त्यांना तुमच्या कडून काहीही नको असते तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच तुमच्या समस्या समजून घेतात. ते तुमच्या सोबत वेळ पडल्यास बोलत सुद्धा नाही.
* संत चमत्कार कां करतात ?
कलियुगातील मानवाची ‘ चमत्कारा शिवाय नमस्कार नाही’ हि वंदिता ईश्वराला ठावूक आहे. मानवातील भक्ती वाढावी म्हणून संतांच्या हातून तो चमत्कार घडवून आणत असतो. भक्तांचा आत्मा निरोगी राखण्यासाठी चमत्काराची योजना ईश्वरच करीत असतो. एखाद्या भक्ताला संस्कारित करावयाचे असल्यास तोच संताच्या कर्वे चमत्कार करवितो, किंवा एखाद्या नाठाळ भक्ताला वठणीवर आणायचे असल्यास संताकडून चमत्कार दाखविले जातात. तसेच मानवापेक्षा ईश्वर किती शक्तिवान आहे हे सुद्धा दाखविण्यासाठी संतांचे हातून चमत्कार घडवितात. चमत्कार म्हणजे ईश्वराचे अधिष्ठान संतांच्या सहाय्यार्थ धावून येणे हेच होय. ईश्वराची क्षणोक्षणी आपल्यावर कृपा दृष्ठी असतेच, ती कधी लक्षात येते तर कधी लक्षात येत नाही.