स्वीकारातून आनंद
Like
Like Love Haha Wow Sad Angry

One can get great amount of satisfaction, happiness and calmness through the acceptance of themselves , situations all around or even pain and misery of themselves. All just needs to accept and not to oppose the things the way they are going out. Sometimes, merely letting go things can give better outcome rather than holding them.

Gain happiness thorugh acceptanceविचार सकारात्मक असो वा नकारात्मक, वेळेनुसार त्याचा स्वीकार करणेही कधी कधी उचित ठरते .

आजार किंवा वेदना असेल तर वेळेनुसार त्याचा स्वीकार भाव ठेवणे मदतगार ठरते. जेव्हा कधी आपल्या शरीरात वेदना होत असतील आणि मानसिक त्रासही वाढलेला असेल तेव्हा त्या वेदनेचा  स्वत: स्वीकार करून बघा. वास्तविक आपण आपली पीडा काही काळ विसरून जातो. या स्वीकार भावनेत लहान मोठ्या वेदना सहन करण्याची क्षमता असते. याचा अर्थ वेदनेकडे दुर्लक्ष करा असा नव्हे. त्याचा उपचार करा पण उद्रेक करू नका. मनाला वेदना होत आहे याची जाणीव करून देण्याने आपला मानसिक त्रास नाहीसा होऊन त्या पीडेचे दु:ख कमी जाणवेल.

 नाते संबंध – त्यातील पीडा व त्यातील स्वीकार भाव :

नाते संबंध हे कुठलेही असो, ती कोणत्याही मनुष्याच्या आयुष्यातील फार महत्वाची बाब आहे. कुठल्याही व्यक्तीशी कुठलेही नाते असो, तो जसा आहे तसा त्याचा स्वीकार जर केला तर त्या नातेसंबंधात फार सुधार व परिवर्तन घडून येते.

नातेसंबंध मजबूत करावयाचे असेल तर समोरच्याचे गुण व अवगुण स्वीकार करणे हे कठीण तर आहे पण तेवढेच महत्वाचे आहे. त्याच्या अवगुणाचा प्रथम न चिडता स्वीकार करावा लागेल, किंवा आपण त्याच्या अवगुणांसहीत त्याचा स्वीकार करू शकतो हे ठरवावे लागेल. त्याचे थोडे थोडे अवगुण स्वीकार करण्याची सवय करावी लागेल. असे करताना एक लक्षात घ्यावे, समोरच्याचे नकारात्मक विचार स्वीकार करताना त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची नाही असे नव्हे. त्यांची चूक त्याना जरूर लक्षात आणून द्यावी पण त्यात आपल्या बोलण्यात किंचितही नकारात्मक भाव किंवा  कटुता नसावी. शब्द प्रयोग फार जपून करावेत म्हणजे आपल्या गोष्टींचा परिणाम सकारात्मक ठरून नाते मजबूत होण्यास मदत होईल.

* कधी कधी अस्विकाराच्या भावना येतात पण त्यावर आवर घाला व त्याही स्वीकार करा.

* शब्द प्रयोगात सौम्यता असावी.

* आपल्यात आलेल्या नकारात्मक भावना ओळखून त्याही स्वीकारा.

या सर्व बाबींचा सकारात्मक विचार केल्यास नाते संबंध जुळून राहण्यास मदत होईल. व आपल्याला आनंदाच्या आणि सुखाच्या मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. नाते हे मौल्यवान आहे हे गमावून आयुष्याच्या आनंदास तडा पाडू नका.

  आपल्या आयुष्यातील समस्या व त्या वरील उपचार !

जीवनात आपल्याला जे काही मिळते किंवा जीवनात अचानक  काही छोट्या मोठ्या घटना घडतात,  त्या आपल्या जीवनातील त्यां वेळेची,  त्या क्षणाची  गरज असते; हे एक रहस्यमय सूत्र आहे. कित्येक वेळी या घटनांनी आपल्या विचारांत किंवा जीवनांत  परिवर्तन सुद्धा होत असतात.

उदा-:  एखादे वेळी एखादी व्यक्ती आपल्याला शिवी देवून गेला किंवा आपल्याला गरज असणारी वस्तू न देता, आपलं मन दुखावून गेला असेल तर ते त्याच वागणं म्हणजे त्या क्षणाची गरज असते. तेवढ्यापुरतं आपल मन फार दुखावलं जावू शकतं पण त्याच्या त्या वागणुकीतून कदाचित आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्याची ती एक शिकवण असू शकते. त्यावेळी ते आपल्या लक्षात येत नाही. ही तुम्हाला मिळालेली टाळी आहे , आणि त्यातूनच आपल्या सुधारण्याचा तो मार्गदर्शक ठरू शकतो. याला आपण नकारात्मक म्हणू शकत नाही. हे सृष्टीचेच नियम आहेत.

तेव्हा आपल्या जीवनात येणार्या अडचणी यांना कधीच वाईट घटना समजू नका. त्यांचा आनंदाने स्वीकार करा. त्यातच जीवनाचा आनंद आहे. त्यांना हसत सामोरे जा, जीवनाला सुंदर बनवा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu