स्वानुभवाने आनंदाची खरी संतुष्टी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Self-RealisationThe words self realization and enlightenment are often used synonymously in spiritual literature to refer to the liberation of an individual. Self realization is a real satisfaction. Self Realization is the awakening of you happiness.

खरा आनंद हा ज्ञानात आहे, खरा आनंद भोगण्या करीता ज्ञानाची खरी गरज आहे. अज्ञानात सुद्धा आनंदाचा लाभ मिळतो मात्र तो क्षणभंगुर असतो. परंतु ‘खोट्याला खर मानून अवघ आयुष्य वाया घालवले जात आहे’ याचा मनुष्याला थांगपता नाही. त्या वेळी त्याला खोटा आनंदच खरा आनंद वाटत असतो. आणि तो त्यातच अडकून पडतो व खर्या आनंदाला गमावून बसतो  मात्र इतकेच खरे कि एक गरीब मनुष्य आनंदी असू शकतो, परंतु एक आनंदी मनुष्य कधीच गरीब असू शकत नाही.

आनंद हा मनुष्य खूप प्रकारे मिळवू शकतो. उदा: कधी एखादी वस्तू सापडल्या ने आनंद होतो,तो तात्पुरता आनंद ,कधी कुण्या दुसर्याची आपण फसवणूक केल्या बद्दल आपल्याला आनंद प्राप्त होतो, कधी आपल्याला कुणाकडे अचानक जेवणाचे आमंत्रण आल्यामुळे आनंद होतो, कधी आपण कुणाला चिडवून स्वत; आनंद प्राप्त करून घेतो, तर कधी क्रिकेट सामना जिंकून आल्यानेमुळे आनंद होतो. तर कधी एखाद्या व्यक्तीचे काही नुकसान होवून निराशा होतासेल तर तो दारूचे घोट घश्यात उतरवून आपला आनंद व्यक्त करतो. कुणी मेजवान्या करून आनंद प्राप्त करतो. तर हे एकंदरीत आनंदाचे प्रकार आहेत पण हे तात्पुरते आनंद जीवनात आपल्याला सफलता प्राप्त होत नाही.

पण कधी कधी मनुष्य दुसर्याना मदत करून किंवा सेवा करून जो आनंद मिळतो तो थोडा वेगळाच आनंद असतो.यातही प्रकार आहेत पण भ्रष्टाचार करून जर दिखावा दाखवण्या करीता जर सेवा भाव किंवा मदतीचा दिखावा दाखविणारे लोक सुद्धा असतात तो आनंद सुद्धा तात्पुरताच असतो. परंतु जो निष्फळ व कुठल्याही निस्वार्थ सेवा किंवा मदतीचा हात पुढे करतो त्यात त्या व्यक्तीचा अहंभाव पूर्णपणे मिटलेला असतो त्या सेवेतून त्याला मिळणारा आनंद हा मोलाचा असतो.

त्यानंतर ईश्वराची भक्ती पण आजच्या या काळात भक्ती म्हणजे दिखावा भक्ती च्या नावाखाली लुट्पाट वैगरे प्रकार फारच चालू आहेत या गोष्टी वगळता. खरा भक्ती मार्ग म्हणजेच बिनशर्त भक्ती आपली इच्छा पुरती झाली नसेल तरी देवावरची श्रद्धा प्रेम कमी न् होता जी भक्ती केली जाते आणि त्या भक्तीतून मिळणारा आनंद हा वेगळाच अनुभव असतो. तो तेज प्रेमाचा आनंद म्हणजेच ईश्वरीय आनंद होय.

परंतु याही पलीकडे आपल्यातील मी पणाचा व देहभान हरपून गेलेला भक्तिमार्ग जिथे त्या ईश्वरा शिवाय काहीही उरलेले नाही असे हे दर्या खोर्यात बसून भक्ती करणारे सद्गती ला प्राप्त झालेले संत याना मिळणारा आनंद म्हणजे हाच स्वानुभवातील आनंद खरा आनंद होय.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu