मटन पुलाव




Mutton Pulao recipe. Mutton Pulao made with Basmati rice, Mutton, Onions, and medley of spices. The mutton pulao is very Testy and flavorful. It can be served to your Family.

mutton_pulao
साहित्य :  १ किलो तांदूळ, मटन १ किलो, मीठ, आले, हळद अंदाजे, २ कांदे लसुन, ४ मोठे चमचे धने, २५ सुक्या मिरच्या, १० लवंगा, २० मिरी, २ इंच दालचिनी, १ चमचा  शहाजीर, २ मिरी २ इंच दालचिनी, १ किलो कांदा, तांदळाच्या दुप्पट पाणी, १ वाटी तूप.

कृती : तांदूळ धुवून निथळून सुकत ठेवावे. मटणाला आलं, लसुन मीठ, हळद लावून शिजत ठेवावे धने, लवंगा, मिरच्या, मिरी, दालचिनी, शहाजिरे खसखस घ्या सर्व जिनसा कच्च्याच वाटून तुपात खमंग परताव्यात. मटन शिजत आले कि त्यात हि गोळी घालावी. मटन अगदी सुके करावे. पाणी राहू देऊ नये. तांदळाच्या दुप्पट पाणी, मीठ व हळद घालून मोकळा रोजच्या सध्या भाताप्रमाणे भात शिजवावा.
कांदे उभे चिरून तुपात खमंग तळून ठेवावे मग एक मोठे पातेले घेऊन त्यात पातळ तूप घालावे. सर्व बाजूनी तूप लावावे. मग प्रथम भाताचा, असे ठार लावावा. मग मटणाचा थर लावावा. त्यावर कांद्याचा ठार लावावा. पुन्हा भाताचा, असे थर येऊ घ्यावा. मग उलथन्याच्या दांड्याने मधे भोक पाडून त्यात तूप सोडावे मग पातेल्यावर  घटट झाकण ठेवावे. पातेले मंद विस्तवावर ठेऊन एक दणकून वाफ येऊ घ्यावी. मग उतरवावे. वाढताना नित सगळे मिसळावेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड