ओली भेळ




Like
Like Love Haha Wow Sad Angry
52

Oli Bhel is my absolute favorite street food. We make bhel often at home. Here is our simple version with just few ingredients.

Aoli Bhel

साहित्य – : फरसाण २५० ग्राम, चुरमुरे २५० ग्राम, एक वाटी बारीक शेव, पाव वाटी भाजके दाणे, बारीक चिरलेला कांदा एक मोठी वाटी भरून, कैरीचे बारीक तुकडे पाव वाटी, टोमाटोच्या फोडी अर्धी वाटी, कोथिंबीर पाव वाटी.

चटणीसाठी लागणारे साहित्य:-

अर्धी वाटी बिया काढलेले खजुराचे तुकडे, गुळ अर्धी वाटी, एक मोठा चमचा लाल तिखट, चिंच अर्ध वाटी, दोन चमचे धने जीऱ्याची पावडर, चवी नुसार मीठ.

तिखट चटणीची कृती : पुदिना, मिरच्या व मीठ मिक्सर मध्ये काढून पातळसर चटणी करावी.

गोड चटणीची कृती : एक वाटी चिंच गरम पाण्यात भिजत घालावी.पाणी थंड झाल्यावर चिंच हाताने कोळून घ्यावी, मिक्सर मध्ये खजुराचे तुकडे बारीक करावेत व नंतर त्यात परत थोडे पाणी घालून पुन्हा सैलसर वाटून घ्यावे. चिंचेच्या पाण्यात बारीक वाटलेला खजूर, तिखट, मीठ, धणे व जीऱ्याची पावडर, बारीक केलेला गुळ हे सर्व एकत्रित करून मिसळावे नंतर त्यात दोन वाट्या पाणी घालून दोन उकळ्या आणाव्यात नंतर खाली उतरवून थंड करावे. हे पाणी पातळ असू द्यावे. हि चटणी फ्रीज मध्ये ठेवल्यास पाच ते सहा दिवस चांगलीच राहते.

एका मोठ्या पातेल्यात चुरमुरे, कोथिंबीर, दाणे फरसाण, कांदा, टोमाटो, व तिखट चटणी घालून एक सारखे करावे, हि भेळ तयार झाली. डिश मध्ये भेळ घालून वर गोड चटणीचे पाणी घालावे, त्यावरून शेव पसरावी, त्यावर तळलेला किंवा भाजलेला उडीद पापड हाताने थोडा चोळून घालावा. व लगेच खाण्यास द्यावा, फार वेळ भिजून ठेवू नये. आवडी नुसार वरून उकडलेल्या बटाटा चा चुरा घालू शकता पण चवी नुसार घ्यावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
52




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu