Methi puri is a crispy deep fried Indian bread or puri, which is prepared from plain flour and chopped methi (fenugreek) leaves. Oil is used for deep fry. Read Complete Recipe of Methi puri .
साहित्य : एक वाटी चिरलेली मेथी, एक मोठा चमचा लाल तिखट नाहीतर हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीप्रमाणे साधारण एक चमचा मीठ, एक मोठा डाव तेलाचे मोहन, एक चमचाभर चिरलेली कोथिंबीर, एक चमचा जिरे, एक चमचा ओवा, दोन वाट्या कणिक, एक चमचा डाळीचे पीठ, एक चमचा तांदुळाचे पीठ किंवा बारीक रवा, तळणीसाठी तेल, मेथीपुरी करताना पीठ भिजवताना दुध जास्त व पाणी कमी असे प्रमाण घ्या. त्यामुळे मेथीचा कटवटपणा कमी होईल.
कृती: चिरलेली मेथी, कोथिंबीर धुवून चाळणीत पाणी निथळत ठेवा. नंतर तो परातील घेऊन त्यात तांदुळाचे पीठ, डाळीचे पीठ तिखट, मीठ साखर, जिरे, ओवा, कणिक, पाण्यापेक्षा दुध जास्त घेऊन सर्व मिसळून घट गोळा करा. कढईत तेल तापत ठेवा व पालक पुरीप्रमाणे आवडीनुसार आकारात करा व तळा. ही पौष्टीक पुरी खुपच खुसखुशीत आणि छान लागते.