आवळ्याचा मुरब्बा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Amla Murabba is very easy to prepare at home and tastes very delicious. Kids will love this very much. Today we will learn how to make amla Murabba . It’s very useful for your health, especially in summers. get complete procedure for cooking Murraba from Marathi Unlimited.

For all Special Recipes you can Visit www.marathi-unlimited.in

 

Amla_murabbaसाहित्य –  मोठे आवळे ८ ते १०, साखरेचा पाक २ वाट्या, वेलची पावडर १/२ चमचा, खाण्याचा चुनापाव चमचा.

कृती – आवळे स्व्च्छ धुवून कोरडे करून त्याला वरून काप किंवा टोचे मारावेत. चुन्याचे पाणी करून त्यात ५ ते ६ तास भिजत घालावे. त्या नंतर साखरेचे पाक करून त्यात वेलची पावडर टाकावी व त्यात ते आवळे टाकून उकळून घ्यावे. पाक अति घट्ट होऊ देवू नये, होत असल्यास पाण्याचा शिट्का मारावा. या प्रमाणे मुरब्बा करून तो काचेच्या बरणीत थंड करून भरून ८ ते १० दिवस उन्हात ठेवावा. आवळे चांगले मुरले कि त्यातील बिया काढून टाकाव्या.

सुके व गोड आवळे करावयाचे असल्यास –

याच पद्धतीने आवळे उकळून त्याच्या साधारण फोडी करून चुन्याच्या पाण्यात भिजत घालून नंतर साखरेच्या पाकात उकळवून एक रात्र ठेवावे नंतर तोच पाक दुसर्या दिवशी चांगला उकळवून घट्ट करावा हि उकळण्याची क्रिया तीन वेळ ( तीन दिवस थोडे थोडे वेळ उकळावे ) करावी. आवळ्याचे तुकडे सुकल्या प्रमाणे झाले कि नंतर हे पाकवलेले आवळ्याचे तुकडे पिठी साखरेत घोळून वाळू द्यावे. आवळ्याला टोचे पाडताना लोखंडी सुरीचा वापर करू नये त्याने आवळा काळा पडतो व गुणधर्म सुद्धा कमी होतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu