साहित्य – अळूच्या दोन जुड्या, चुका भाजी अर्धी जुडी, मुळा एक तुकडा, हरबरा व शेंगदाणे मिळून भीजविलेले पाव वाटी, थोडे ओल्या व किंवा सुकलेल्या खोबर्याचे काप, हिरव्या मिरच्या दोन, मेथी दाणे व गोडा मसाला पाव चमचा, तेल पाव वाटी, गुळ अर्धी वाटी चिंचेचा कोळ पाव वाटी, दाळीच पीठ पाव वाटी, फोडनिचे साहित्य व मीठ .
कृती -: अळू भाजी आणि चुका स्व्च्छ करून चिरून घ्यावा व कुकरमध्ये शिजवून घ्यावा, मुळ्याच्या अर्ध गोल चकत्या करून घ्याव्या व भिजवलेली डाळ, दाणे, मिर्चीचे तुकडे, खोबर्याचे काप हे सर्व एकत्रित शिजवावे. भाजी शिजत आल्यावर डाळीचे पीठ लावून घोटून घ्यावी, फोडणीत मोहरी, हिंग, हळद, मेथीचे दाणे घालावे व नंतर घोटलेली भाजी घालावी.शिजवलेली डाळ,दाणे मिरचीचे तुकडे, खोबर्याची काप घालून हलवावे. चिंचेचा कोळ,मीठ,मसाले,गुळ व नंतर पाणी घालून उकळू द्यावे मोकळी झाली कि भाजी तयार समजावे.