नकारात्मक घटना घडत असताना सकारात्मक्तेवर लक्ष केंद्रित कसे करावं ?

Like Like Love Haha Wow Sad Angry When Negative Things Happening In Your Life, You Have To Focus Your Mind...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

When Negative Things Happening In Your Life, You Have To Focus Your Mind On Positing Things.

12
१ तंत्र आपल्या शब्दांचा उपयोग नेहमी दुसर्यांच्या उत्कर्षासाठी किंवा आशीर्वादासाठीच करावा. उदा. दवाखान्यात एखाद्या व्यक्तीला बघण्यास गेल्या नंतर बरीच लोक असे म्हणतात ‘अरे, तुला काय झालं? किती पिवळा पडलास ? किती बारिक झालास ? काही खातोस कि नाही’…. ? अशा प्रकारचे संभाषण त्या व्यक्तींशी कधीही करू नये.… त्यापेक्षा आता तू बरा दिसतोस … तुझी प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली सुधारल्या सारखी वाटते…… याच प्रमाणे वेगळ काही तरी बोलण्याचा प्रयत्न करावा. कि आपल्या बोलण्यानेच त्याच्या प्रकृतीत जेणे करून सुधारणा होईल. आपल्या चांगल्या बोलण्याने त्याला बरे वाटेल व तो आपण गेल्या नंतर आरशात बघेल आणि ‘मी बरा होत चाललोय ‘ या प्रमाणे विचार करू लागेल. त्या परिस्थितीत तुम्ही जर चांगले बोलू शकत नसाल तर कमीत कमी नकारात्मक शब्द तरी उच्चारू नका, तुम्ही ज्या प्रमाणे बोलता त्याच प्रमाणे तुमचे विचार बनतात आणि श्रीराठी तसेच बदल घडतात. आपलं शरीर हे जल, वायू, पृथ्वी, अग्नी आणि आकाश असा पंचतत्वांनी बनलेले आहे हे आपण जाणतो, जव्हा तुम्हाला थंडी वाटते त्यावेळी शरीरातल्या पेशींतील पंचतत्वांपैकी जल तत्व वर येतं तेव्हा तुम्हाला थंडी वाजायला लागते. जेव्हा तुम्ही विचार करता,खूप उकडतंय, सूर्य डोक्यावर आला आहे तेव्हा तुमच्या अग्नी तत्व प्रबळ होतं. म्हणून या नंतर जेव्हा कधी तुम्हाला उकाड्यात बसाव लागलं आणि त्यावेळी थंडपणा अनुभवायचा असेल तेव्हा हा प्रयोग करायला हरकत नाही ‘ मी हिमालयात आहे ‘ अशी कल्पना करून ती कल्पना एक मिनिट पर्यंत पकडून ठेवताच थोड्याच वेळात उष्णता कमी जाणवेल थंडी वाटू लागेल. जेवढा जास्त काळ तुम्ही हा विचार घरून ठेवाल तेवढा अधिक परिणाम झाल्याच जाणवेल.

तंत्र २ — ‘परंतु’

या तंत्रात ‘परंतु’ या एका शब्दाचा वापर करायचा आहे. काही लोकांना प्रश्न पडतो. आम्ही सकारात्मक शब्दांनी विचारांवर नियंत्रण तर मिळवितो,पण तरीही कधी कधी नकारात्मक विचार येतातच, अशा वेळी काय करावं? तेव्हा परंतु या शब्दाचा वापर करायला हवा. विशेषत नकारात्मक विचारांच्या बाबतीत तर नक्कीच तुमच्या मनात विचार येतो, ‘बहुतेक मी आजारी पडनार आहे … ‘ तेव्हा लगेचच या वाक्याच्या शेवटी ‘परंतु’ हा शब्द जोडा आणि म्हणा, परंतु असे होणार नाही,कारण माझ्या शरीरात प्रत्येक आजाराशी लढा द्यायची अपार शक्ती आहे…’ कुठलाही नकारात्मक विचार आल्यावर त्याला तसेच सोडू नका. त्याच्या पुढे ‘परंतु’ लावून त्याला सकारात्मक बनवा. उदा. पुढे माझ्याकडे पैसे असणार नाही, परंतु मी मेहनत करेन तेव्हा नक्कीच पैसे येतील… ‘ माझे आता अभ्यासात मन लागत नाही, परंतु थोडावेळ मी नक्कीच अभ्यास करू शकेन….’ तुमच्यात कोणतेही विचार आले तरी त्यांना ‘परंतु’ हा शब्द जोडून सकारात्मक करून सोडा. अशा विचारांना अर्धवट सोडून मनात घर करण्याची संधी कधीच देऊ नका. अन्यथा हे नकारात्मक विचार हळूहळू पूर्णपणे तुमच्यावर ताबा मिळवतील .

तंत्र ३ – शक्तिशाल प्रेरणादायी वाक्य…

हवं ते मिळविण्यासाठी शक्तिशाली प्रेरणादायी (masterthought catchword ) बनवा. म्हणजे असे विचार जे तुमच्या हृदयाला भिडतात उदा. ‘हम होंगे कामयाब !’ हा एक masterthought catchword आहे. हे वाक्य एकूण जर तुमच्या मध्ये जोश येत असेल,उत्साह संचारत असेल तर ते तुमच्यासाठीच बनलेलं आहे असं समजा. ‘ माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते दिव्य योजनेनुसारच घडत आहे.’

* ‘माझ्यातील उणीव हि उणीव नसून ती माझी ताकत आहे. ‘

* ‘सत्यात प्रत्येक आजार ठीक करण्याची ताकत असून सत्य माझ्या सोबत आहे.’

* ‘ज्याने मला घडवील तोच मला जगवेल.’

* ‘ज्याने ईच्छा दिली तोच तृप्ती व मुक्ती करील.’

* ‘ज्याने स्वप्न दिलं तोच स्वप्न साकारेल.’

हि सर्व प्रेरणादायी वाक्यं master thought बनू शकतात. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रेरक विचार बनू शकाल. उदा. मुलगी असणं हि माझी उणीव नसून ताकत आहें त्यामुळे माझे यश निश्चित आहे. या विचाराने तुम्ही स्वत:ला प्रेरणा देणाऱ्या सकारात्मक सूचना देखील बनवू शकाल.  ( सरश्री )

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories