आनंदाचा मूळप्रवाह आतंच आहे (भाग २)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

What is the main source of happiness .  Happiness an easy word to say but a goal tried to be achieved by everyone in any form of the other. But what is really Happy or Happiness? Is it being successful and rich? Is it being in love? Is it enjoying time with friends? Can one really buy happiness? And so many more questions I could think of but what is it really. Read this article to find out your happiness.

happineesसंसारिक लोक राहणीमानाच्या उच्च स्तराला सुद्धा आनंदाचे कारण मानतात, त्यांच्या विचारात असते कि जेवढे आलिशान घर, विजेची रोषणाई, किमती पंखे, सोफे, गाड्या, फर्निचर, दागदागिने साज-शृंगार यात जास्त आनंद प्राप्त होईल. या धारणेनुसार ते आपल्या बंगल्यात साज-सजावटीचे दुकानच लावून बसतात त्यातील वस्तू उपभोगात न येता पडूनच राहतात आणि खराब होतात त्यात त्यांना काय आनंद मिळतो? त्यात आनंद तर दूरच त्यांचा सांभाळ करणे त्याचे रक्षण करणे त्यालाच परत  दुरुस्ती करणे व त्याची विल्हेवाट लावणे. यात होणारा विनाकारण मोठा खर्च हीच एक मोठी डोकेदुखी असते. या भ्रामक धारणेमुळे कर्जबाजारी होवून कित्तेक वेळी पागल पणाच्या आहारी जावून आत्महत्या करण्याच्या मार्गाला सुद्धा लागतात.

याच दिखावटि आनंदासाठी पैसा कमी पडतो यातूनच शोषण, बेईमानी, भ्रष्टाचार, चोरी या मार्गाला लागतात. हे किती उपहासास्पद आहे. अश्या कितीतरी व्यक्ती धनकुबेर आहेत पण काय ते खरोखरच सुखी आहेंत? असे जर असते तर त्यांच्या कडे तर आनंदाचा भंडारच असतां आणि त्याचा व्यापारही ते करू शकले असते. या साज-सामाना मध्ये आनंदाची कल्पना करणे व त्याच्या संचयासाठी व्यर्थ जिवाचे हाल करणे हे बुद्धीमत्तेचे लक्षणे नाही.

मनोरंजन हास्य हे उच्चकोटीचे असेल तेव्हाच ते ठीक होय. परंतु निम्न श्रेणी मनोरंजन व हास्य मनुष्याला अश्लील, अस्वस्थ, अभद्र नव्हे तर आचरणहीन बनवून टाकतं. पदार्थात रुची घेणारी व्यक्ती मनोरंजनाच्यानावा खाली व्याभिचारी, व्यसनी सुद्धा बनतात. नशेमध्ये मग्न होवून आनंद मिळविणार्या व्यक्तीच्या बुद्धीची किव करावी लागेल. नशा ही तर जीवनाच्या हिरवळीसाठी आग आणि विषयभोग हे साक्षात विष मानले गेले आहे. परंतु या नादात व्यक्तीला शेवट दालीद्र्य व अकाली मृत्यू पत्करावा लागतो.

आत्माच्या आनंद दायक गहनतेमध्ये मनुष्य तेव्हाच उतरु शकतो, जेव्हा तो जगातील आवश्यक कर्तव्यापासून निवृत्त होवून व त्यापासून स्वत:ला मुक्त करून घेईल आणि निवृत्तीच्या क्षणामध्ये निश्चिंत व निर्विकार होवून आत्मचिंतन करेल, आत्मचिंतन तेव्हाच शक्य होते जेव्हा मनुष्य संसारिक मृगतृष्णेमध्ये स्वत:ला कमीतकमी गुंतवून त्यात निष्पृह रहातो. जगात हेही सत्य आहे की विषयभोग सुद्धा एका मर्यादेपर्यंत आवश्यक असतात, त्याला जीवनाचे ध्येय बनवू नये.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: