आनंदाचा मूळ प्रवाह – आमच्या आंत आहे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

What is the main source of happiness . Whats is the Main source of your  happiness. Happiness is a mental or emotional state of well-being characterized by positive or pleasant emotions ranging from contentment to intense joy. Find out the your point of  happiness.

happiness

आत्मायाच्या प्राथमिक आकांक्षेचे नाव ‘आनंद’ आहे. मनुष्या पासून तर किड्या, मुंग्यां पर्यंत जितके काही प्राणी आहेत सर्व्ह आनंदाची इच्छया करतात. प्राण्यांचे जीवनच आनंद आणि त्याच्या आशा आकांक्षावर अवलंबून आहे. मनुष्य स्वत:आनंद स्वरूप आहे. जगाच्या मायाजाळा मध्ये त्याचे हे मूळ स्वरूप तो विसरलेला आहे. तो त्यालाच शोधण्याचा व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या संपूर्ण जीवनाचा मुख्य उद्देश आनंद प्राप्त करण्याचा आहे. मनुष्य जेव्हा सुख-भोगंमध्ये गुंग असतो तो आनंदासाठी विनम्र बनून कष्ट घेतो तर ते सुद्धा आनंदाच्या आशेने आनंद हि सर्वांची आवश्यकता आहे मनुष्य जीवनाचे ध्येय सुद्धा आहे.

आनंद दन प्रकारचे मानले गेले आहे एक उत्कृष्ट आणि दुसरे निकृष्ठ ज्यांना अध्यात्मिक किंवा आत्मिक तसेच सांसारिक किंवा विषयिक सुद्धा म्हटले जावू शकते. आनंद आणि सुख-शांतीची इच्छा सर्वच करतात परंतु तो पाहिजे असलेला आनंद तो कोणता आहे, कोणत्या श्रेणीचा आणि स्तराचा आहे या विषयी फार कमी व्यक्ती समजू शकतात. मनुष्याला पाहिजे असणारा आनंद वस्तुत: आध्यात्मिक आनंदच आहे. मात्र लोक त्याला विसरून सांसारिक आनंद शोधण्यात व त्याला प्राप्त करण्यातच आपले संपूर्ण जीवन घालवितात. सांसारिक आनंद किंवा वासनात्मक आनंद मृगतृश्ने सारखा अतृप्ती देणारा असतो. अध्यात्मिक आनंदच खरा सत्य आणि वास्तविक असतो हा मिळाल्यास आनंदाची इच्छा पूर्णपणे तृप्त होवून मनुष्य सामाधानी बनतो. संपूर्ण तृप्ती व खर्या सामाधानासाठी मनुष्याने अध्यात्मिक आनंदाची इच्छा व त्याचाच संग्रह करण्याच प्रयत्न करायला हवा.

एखादी गोष्ट हि आहे कि सांसारिक व वासनात्मक आनंदाच्या भ्रमात वाहत जाणारी व्यक्ती हि निम्न मानसिकतेची असते त्यामुळे ती तुच्छ आणि श्रेष्ठ, निकृष्ठ आणि उत्कृष्ठ मधील फरक समजू शकत नाही, अशा व्यक्तीचे भोजन, वस्त्र, राहणीमान, विषय भोग व हास्य-विनोदात मिळणारे मनोरंजन आणि क्षणिक तृप्तीलाच आनंद मानून घाण्याच्या बैलाप्रमाणे रात्रं-दिवस त्यातच फिरत बसतात. कारण वास्तविक आनंदाची त्यांना झलक सुद्धा लागत नाही, आणि नंतर अतृप्ती व तृष्णे मुळे पुन्हा या संसार चक्रामध्ये येवून फसतात.

बरेच अंशी लोक स्वादिष्ट खाने व वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान करून त्यांचे प्रदर्शन करण्यात संतुष्ट होवून त्यालाच आनंद मानतात, त्यात अतोनात पैसा खर्च करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्यातच मोठेपणा समजतात पण यात वास्तविक आनंदाची कोणती गोष्ट आहे ? हे कुतूहल, आश्चर्य, आनंदाचे कारण मानले जाईल पण ते उच्च मानसिकतेचे लोक मानले जावू शकत नाही. ते अज्ञानाचे द्योतक व त्यांचे आकर्षण प्रभावहिनतेचे आहे. त्यांची हि दिशा म्हणजे बुद्धिमान व्यक्तीसाठी दयेची किंवा खेदाचीच बाब होवू शकते.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा