गांभीर्य आणि अर्थ हरविलेले आजचे लग्न सोहळे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Marriage is a contract between two people who want to spend the rest of their lives together, for better or for worse. It is a social and family event that can be very emotional, but there are also legal consequences for the spouses while they are married and when the marriage ends.
The seriousness of the meaning of a lost wedding events today25

आजच्या काळातील बारमाही लग्न सोहळे,  हॉल मधील प्रसन्न, आणि सुगंधी वातावरणात योवनाच्या उंबरठ्यावर आलेल्या आणि येऊ पाहणार्या मुला-मुलींचा किलकिलाट, हास्याचा खळखळाट, मोठ्यांची लगबग सारे कसे बिनबोभाट चालू असते. एकदाचा अंतरपाट घरला गेला प्रयेक जन आपल्या बोलण्यात व्यत्यय आणूनच मंगलाष्टके एकदाचे चालू झाल्यांनतर अक्षदा वधू- वरांच्या डोक्यावर सोड्ल्या जातात व नंतर लगेच पुन्हा सुरु झाल्या गप्पा. पुढल्या होम विधी कडे सुद्धा ईतरांचे सोडा पण वधू-वराचे सुद्धा फारसे लक्ष नसते. हा एक यांत्रिक उपचारच होता अस वाटायचं. संदर्भ सुटलेला, गांभीर्य व अर्थ हरविलेला हा सोहळा !!

** घर असं असतं !

पण हा सोहळा हजारो वर्षा पूर्वी अस्तित्वात आला तो कशासाठी ?

एक तरून आणि एक तरुणी आयुष्य एकत्रित घालविण्याचा निश्चय करतात तेव्हा सर्वात अधिक गरज असते ती एकमेकांवर गाढ विश्वास असण्याची, हा परस्परांवरचा दृढविश्वास वैवाहिक जीवनाचा आणि म्हणूनच कुटुंबाचा मूलाधार असतो. या विश्वासाला पावित्र्याची जोड देण्यासाठी ‘सहजीवन’ या शब्दाचा यतार्थ लक्षात आणून देण्यासठी आणि त्याला समाजाचा पाठींबा मिळवून देण्यासाठी विवाह विधी अस्तित्वात आलां आनंद आणि सुख या भावना स्तरांना त्याट सहभागी करून घेतल्यामुळे वाढतात व द्विगुणीत होतात. म्हणून आप्त स्वकीयां समवेत,वडीलधार्यांच्या समोर विवाहाचे बंधन एकमेकांना घालायचे,अग्नीला साक्ष ठेवून एकनिष्ठेची शपथ घ्यायची.

आयुष्यात काही वेळा हि शपथ मोडण्यासारखे मोहाचे क्षण येतातहि, पण त्यावेळी आप्तस्वकीय आणि अग्नी यांच्या समोर उच्चारलेल्या शब्दांची आठवण, असे क्षण टाळण्याचे बळ देईल हि अपेक्षा असते. कायद्यातून पळवाटा तर निघतात पण भावनिक बंधने तोडणे फार कठीण असते, दिलेल्या वचनांची जाणीव मनातं खोलवर रुजलेली असते. ती आपल्या अंतर मनात सदैव जागती तेवत असते. म्हणूनच सहजीवनातील खाच-खळगे ओलांडता आलेच पाहिजे.

एकनिष्ठाचे आणि एकपत्नीत्व व एकपतित्व या संकल्पनाचे महत्व आपल्या संस्कृतीला फार पूर्वीच समजाविलेले आहे. एकपतित्व आणि एकपत्नीत्व या निष्कर्षावरच आपला समाज राहिला पाहिजे असे म्हणावेसे वाटते. आणि यातच ‘ कुटुंब’ या निष्कर्षां मुळेच सुस्थिर होईल व यातून ‘सुरेख घर’ जन्माला येईल. यात शंकाच नाही.

भारतीय पती-पत्नी घर उभे करतात एकमेकांच्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या आधारावर. आपला जीव त्यात ओतून त्याला घरपण देतात. केवळ कायद्यानुसार दोघांनी एकत्र राहण्याचा करार येथे होत नाही. ज्या समाजात तो होतो तिथे अपार्टमेंटला कायद्यांच्या तरतुदींची चौकट असते.

स्त्री आणि पुरुष यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती लक्षात गेवून आपल्या पूर्वजांनी आदर्श आयुष्याची संकल्पना निर्माण केली. पुरुष्यातील उणेपणाला स्त्रीचा आधार आणि स्त्री मधल्या न्युनावर पुरुष्याकडून ईलाज होतो आणि तेव्हाच घराला स्थैर्य लाभतं. स्त्रीच्या मार्द्वाला पुरुष्याचा कणखरपणा आधार देतो तेव्हाच त्या घरात मुले निर्धास्तपणे वाढतात. मुलांच्या निकोप आणि सुदृढ वाढीसाठी, चौरस आहारा इतकीच सुरक्षीततेचि भावना आणि मायेची उब अत्यावश्यक असते. किंबहुना या भावनिक पोषणाची गरज अन्नरसांमधल्या पोषणापेक्षा अधिकच असायला हवी. आणि ‘घरांमध्ये’ ती आई-वडिलां कडूनच पूर्ण होते. घरात अर्धपोटी झोपावे लागले तरी ‘आई’ चा हात अंगावर फिरला आणि कपाळावर थापटू लागला कि अगदी गाढ झोप लागते ती याचमुळे हे सुख द्लीद्री घरातील मुलेही भारतीय संस्कृतीमध्ये अजूनही पिढ्यान पिढ्या उपभोगत आहेत, म्हणूनच भारतात अजूनही ‘घरे’ आणि ‘सहकुटुंब’ शाबूत आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu