The real purpose of life is simply to realize and remember who you Really are. Who you are beyond conditioning and identity. This article is based on human life which will tell you the real purpose of your life.
मनुष्य जीवनासारखी अलभ्य संधी मिळून देखील त्याचा उद्देश समजला नाही तर मनुष्य देहात व पशु देहात काय अंतर राहील! आत्मकल्याणाची साधना जो या जीवनात करीत नाही त्याकरिता या सूरदुर्लभ संधीचा काही एक फायदा नाही. थोडे निरीक्षण करा, रात्रीच्या खुल्या आकाशाकडे बघून चहू कडे नजर टाका किती तरी ग्रह नक्षत्र सर्वत्र विखुरलेले आहेत, कितीतरी मोठा विस्तार आहे या ब्रम्हांडाचा, हे जग किती विशाल, विस्तृत आहे. या सर्व गोष्टींवर विचार करण्यासाठी वेळ तेव्हाच मिळेल जेव्हा भोगांकडे वळलेल्या वृतिंना चित्तातून हटवून या परमार्थिक विषयांकडे दृष्टी वळवाल. या भौतिक आकांक्षा आपल्या मार्गा मध्ये अडथळा बनून उभ्या आहेंत. आत्मविकासाच्या मार्गावर अडचण बनून उभा आहे तो आपला स्वार्थ आहे.
आपण मत्सर, द्वेष, काम, क्रोध, भीती व लोभांच्या घनदाट जंगलात भटकत आहोत त्यामुळेच आपण महानते कडे अग्रेसर होत नाही. आपण थोडे उदार बनावे, स्वत:मध्ये हिम्मत घरावी आणि अध्यात्मिक जीवनाच्या कठीणतेला झेलण्यासाठी उठून उभे राहावे आणि मग बघावे कि ज्या महानतेला प्राप्त करण्यासाठी आपण निरंतर उत्सुक असतो.
ती महानता खऱ्या स्वरूपात मिळते कि नाही, सत्य आपल्या आतच दडलेले आहे, त्याला धर्माद्वारे जागृत करा. शक्ती आपल्या आतच सुप्त पडलेली आहे, त्याला साधनेने जागवा. जीवनाच्या सार्थक्तेचा हाच एक मात्र मार्ग आहे. ज्याला धारण केल्याने भयरहित शांती मिळेल. तोच धर्म आहे व तोच ध्येय आहे. तसेच ईतरांचे अधिकार आपल्याद्वारे सुरक्षित राहावे. आपण स्वत: जास्त अधिकाराच्या लोभापासून मुक्त असावे. आपले कल्याण हे तृष्णारहित, वासनारहित व निष्काम होण्यातच आहे. आपल्याच इच्छा आपल्याला बंधनात अडकवितात. याच मुळे चुका होतात व आपली उन्नती होत नाही. यामुळे मनुष्य सर्व प्रकारे दिन-हीन बनून कष्ट व क्लेषाचे, कटकटीने ग्रासलेले जीवन जगत असतो.