शक्तीचा स्रोत – आत्म्याला माना




Like
Like Love Haha Wow Sad Angry

“The Only Source of Life Energy is Soul.” An article describing the relationship of the Soul, source consciousness, to the creation of the human being and the practice of Core Synchronism

Five-Elementsआपले पूर्वज ज्ञान-विज्ञांनात आजच्या वैज्ञांनिकांपेक्षा कितीतरी जास्त प्रवीण होते. परंतु ते असे समजत असत कि विज्ञांन हे शेवटी मनुष्याच्या वृत्तींना पाशवी व भोगवादिच बनविते. म्हणून त्यांनी धर्म व आध्यात्मावर आधारित जीवनाची रचनां केली होती या जीवनात प्राण होता, शती होती, सर्वांगीण विकास होता आणि मनुष्याचे जीवन पूर्ण सुखी,निरोगी व सामाधानी म्हटले जावू शकेल, ते सर्व काही होते.

आत्म्याला सर्वज्ञ समजून अनित्य शरीराविषयी वैराग्य मुलक मनोवृत्ती धारण करण्याचे शिकण देणे हा उद्देश नसला तरी भौतिक सुख व इंद्रियांची पराधीनता सुद्धा मनुष्य जीवनासाठी नितांत उपयोगी मानली जावू शकत नाही. आत्म ज्ञांनाची आवश्यकता यांकरिता आहे की त्यामुळे सांसारिक विषयात स्वामित्व आणि नियंत्रनाची शती येते. भौतिक सुखांची रथाच्या घोडयानशी तुलना केली जावू शकते. त्यांना जर आत्मज्ञांनाची लगाम नसेल तर ते घोडे रथाला विनाश्याच्या खड्ड्यातच नेवून टाकतील. जगाच्या सत्तेपासून वेगळी असलेली मनुष्याची सत्ता हि मात्र व्यक्ती सापेक्ष नाही ती फक्त व्यष्टी नाही तर समष्टी सुद्धा आहे. त्यात अनंत सत्य, शिव व सौंदर्य सामावलेले आहे. ते समजल्याशिवाय मनुष्याचे अंर्तबाह्य कोणतेही प्रयोजन परिपूर्ण होत नाही. म्हणूनच आत्मज्ञांन हे मनुष्य जीवनाचे प्रमुख साध्य मानलेले आहे.

शरीराच्या सर्व अंग-अवयवाची स्थूल माहिती, पदार्थ आणि त्याच्या गुण भेदाची माहिती, ग्रह-नक्षत्रा संबंधीत गणित व वैज्ञांनिक तथ्य माहित झाल्याने मनुष्याच्या सुविधा जरी वाढल्या असतील तरी त्याने स्वत:विषयीचे ज्ञान प्राप्त केले नाही आणि हेच दुखा:चे मुख्य कारण आहे. मनुष्या हा फक्त शरीरच नव्हे तर परिस्थिती नुसार सांगतात की तो यापेक्षा काही वेगळी वस्तू आहे. म्हणजे तो आत्मा आहे त्या आत्म्याचे ज्ञांन प्राप्त केल्याशिवाय जगातील संपूर्ण ज्ञान-विज्ञान हे अपुरे आहे. उदा- इंजिन नसलेल्या मोटारी प्रमाणे ते वैज्ञांनिक ज्ञान कोणत्याही प्रकारे फायदेशीर होवू शकत नाही.

आत्मा हा शक्तीचा-अनादिस्त्रोत आहे. शौर्य, प्रेम व पुरुषत्वाची अनंत शती त्यात भरलेली आहे. म्हणून आत्मज्ञांनासाठी लावलेल्या वेळेला, श्रमाला व साधनांना निर्थक म्हणता येणार नाही. आत्मशतीला प्राप्त करून मनुष्याचे सर्व अभाव, दु:ख-दारिद्य, सांसारिक आधि-व्याधी, समाप्त होतात. म्हणून भगवान श्रीकृष्णाने आत्मज्ञांनि पुरुष्यालाच खरा ज्ञांनीपुरुष म्हटले आहे. मनुष्य हा शरीर नाही तर शरीराचा संचालक आहे.

तो मन सुद्धा नाही, कारण की मनाला प्रेरणा देवून कोणत्याही चांगल्या-वाईट कामामध्ये लावले जाते. सत-असतचे ज्ञान देणार्या बुद्धीला सुद्धा आत्मा कसे मानावे ? याचे विश्लेष्ण केल्यास कळून येते की हे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी पंचभूतातील सत्व, रज, तम अंश घेवून बनलेले आहेत. पंचभूत जड पदार्थ आहेत म्हणून आत्मा यांपेक्षा विलक्षण व शक्तिमान आहे. तो संचालक आहे, सूक्ष्म-तम आहे आणि शक्तीचा निर्माता अजर-अमर सर्वव्यापी तत्व आहे. जो या तत्वाला जाणतो, त्याची सर्व दु:ख नष्ट होतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,

1 Comment. Leave new

  • अतिशय सुंदर विचार आहेत, मी या विचारांनी खरच खुप प्रभावित झाले आहे, धन्यवाद

    Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu