Mihi Prem Kel Hot Tichyavar
मीही प्रेम केल होत तिच्यावर
अगदी फुलाने वेलीवर कराव
चंद्राण चाद्ण्यावर करावं
अन चातकान पावसाच्या ओल्या सरीवर कराव,
अगदी तसं
प्रेम कसलं ते पूजा होत ती
मी केलेली नि:स्वार्थ आराधना होती ती पण तू मात्र शुभ सोनेरी मोत्यांनी भरलेली ओंजळ
भरकन रिकामी व्हावी, आकाशातील असंख्य
तारकापैकी एखादा तारका अलगदपणे निघून
जावा तशी निघून गेलीस
पण मी तुला बोलणार नाही
तुझ्याकडे काही मागणारही नाही कारण समजू शकतो त्या वेळची तुझी मजबुरी
म्हणूनच मी रोखून धरलय
माझ्या डोळ्यातील तुझ्या त्या आसवांना
पण मी रोखून धरणार नाही
सातव्या जन्मानंतर येणाऱ्या तुझ्या
त्या आठव्या जन्माला कारण
तॊ आठवा जन्म फक्त माझ्यासाठी असेल।।
Ravindra Mane & Aanur kagal