1
Krushan Utarto Roj Nabhatun
कृष्ण उतरतो रोज नभातून,
कालिंदीच्या तीरी
राधा येते शोधत तेथे
दोघांची बासरी
सूर तेच पण कृष्ण नव्हे तो
साजारंग हो निळा
तीरावर राधेला शोधत
कृष्ण बने सावळा
वाळूवरती कृष्ण शोधतो
तिच्या सांडल्या हाका
राधा राधा चाल तयाला
काळोखाचा ठेका
गगन निळे अन रात सावळी
भेट अनावर रोज
कृष्ण कृष्ण अन राधा राधा
गीत पसरले सांज
Arun Mahatre
1