मनुष्य जीवनाचा अमुल्य राज मार्ग
Like
Like Love Haha Wow Sad Angry

How much more valuable is person,”How much more valuable then is a man than a sheep There are more ways of doing well upon sabbath days, than by the duties of worship cures us he heals the withered hand by putting life into the dead soul,

manush jivanacha amuly marg

मनुष्य हि परमात्म्याची अलौकिक कृती आहे. ती विश्वंभर परमेश्वराची महान रचना आहे, जीवात्मा हा आपल्या जीवन यात्रेचा अधिकांश भाग मनुष्य शरीरा द्वारे पूर्ण करू शकतो. दुसर्या योनी पेक्षा या मनुष्य योनीत त्याला जास्त सुविधा प्राप्त झाल्या आहेत. हेच जीवन फार सुविधा जनक आहे. सर्व प्रकारच्या सोयी आणि अनंत विलक्षण शक्ती या मनुष्य जीवनात मिळालेल्या आहेत. मनुष्याला हि तक्रार राहणार नाही कि परमेश्वराने त्याला विविध प्रकारच्या सुविधा व सावध गीरीपासून वंचित केले आहे. असे हे अमुल्य शरीर मिळून सुद्धा तो अजूनही अंध:कारातच चाचपडत आहे. तेव्हा त्याला दुर्दैवी नाहीतर आणखी काय म्हणावे?

आत्म ज्ञाना पासून पाठ फिरवून या मनुष्य जीवनात सुद्धा जड योनी प्रमाणे काम, क्रोध, मोह, लोभ इ. च्या कैदेत पडून आहें. खरोखरच फार दुर्भाग्याचीच गोष्ट आहे. परंतु ईतके असून सुद्धा त्याला दोष देता येणार नाही, तो वाईट नाही तो तर आपल्या सहज स्वाभाविक रुपात सत्-चित् आनंदीमय आहे तो पूर्णपणे आपल्या याच मूळ स्वभावाला घेऊन शिशूच्या रूपाने जन्म घेतो, परंतु आई-वडिलांचे जागृत नसणे, नुसान करणारे शिक्षण, वाईट संगती, विषारी वातावरण आणि समाजाची दुर्दशा यांच्या कचाट्यात सापडून तो आपल्या मूळ उद्देशापासून भटकत राहतो आणि तुच्छ प्राण्यासारखे अविवेक जीवन व्यतित करतो. म्हणूनच मनुष्याची निंदा न करता त्याच्या दोष-दुर्गुणांची निंदा करायला हवी . हे दोष-दुर्गुण मनुष्याला प्रकाशातून अंधारात ढकलतात. मनुष्याचे जीवन तर एखाद्या साच्यामध्ये तयार केलेल्या उपकरणा प्रमाणे आहे, त्याचा चांगल्या परिणामाचे श्रेय सामाजिक शिक्षण व तात्कालीन परिस्थितींना देणे योग्य राहील. जर मनुष्याला सदाचार युक्त व आदर्शांनी प्रेरित अशा गोष्टी बघण्याची इच्छा असेल तर त्याचे दोष-दुर्गुनांना मिटवून सुंदर,प्रकाशमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायला ह्वा. आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी एखाद्या वर्गावर व्यतीवर किंवा समाजावर आत्महिनतेचा भार टाकणे योग्य नाही, यामुळे मने कलुषित होतात. हा आज्ञाना चा पडदा नष्ट होईल आणि दिव्य ज्ञानाचा प्रकाश चहु कडे झगमगू लागेल असेच कार्य आपण करायला ह्वे.सुविधा जनक प्रवासाचा सामान्य नियम हा आहे. की वेळोवेळी प्रवाशांनी आपले स्थान वेळोवेळी सोडीत जावे। उतरत -चढत राहिल्याने प्रवास समाधान कारक होवू शकतो. अशीच व्यवस्था मनुष्य जीवनात असायला हवी. परमेश्वराने असा नियम बनविला आहें की,मनुष्याने एक निश्चीत वेळेपर्यंत या वाहनाचा उपयोग करावा आणि पुढे येणाऱ्या प्रवाशांसाठी ते स्थान सुरक्षित सोडावें. हा नियम परमेश्वराने मानवासाठीच बनविलेला आहे, हि एक प्रकारे त्याची जवाबदारी आहे की, अनपेक्षित व भावी नागरीकांची निर्मितीही त्याने चातुर्य व बुद्धीमत्तेने करावी. फक्त स्वत:च्या स्वार्थाचा विचार न करता येणाऱ्या यात्रेकरू साठी अशा प्रकारचे वातावरण सोडून जावे की तो सुद्धा आपला प्रवास आरामात पूर्ण करू शकेल.

माणसाच्या कर्तव्याची ईतीश्री एवढ्यानेच होत नाही आपल्या सोबत अनेक दुसरे यात्रेकरु सुद्धा प्रवास करीत असतात. मानवतेच्या नात्याने त्यांना सुद्धा आपल्या प्रमाणेच सुविधा पूर्वक प्रवास करण्याच्या अधिकार मिळालेला आहें. जर आपल्याला काही जास्त शक्ती-सामर्थ्य मिळाले असेल तर याचा हा अर्थ असा मात्र नाही की आपण दुसऱ्याला बळजबरीने त्रास द्यावा आपण स्वत:तर मजा मारीत रहायचं आणि दुसऱ्यानां बसायची सुद्धा सुविधा मिळवायची नाही. हे योग्य नाही, आपल्या ऋषींनी एक अशी व्यवस्था बनविली होती की प्रत्येक नागरिकाने तेवढीच वस्तू आपल्याजवळ ठेवाव्या आवश्यकता पूर्ण झाल्यावर त्यातून काही शिल्लक राहिल्यास समाजातील ईतर पिडीत प्राण्यांपासून अभावग्रस्त लोकांमध्ये वाटून देण्यात याव्या . जेणे करून समाजात कोणत्याही प्रकारची गडबड पसरणार नाही. विषमता ही पैशाची असो किंवा जमीन-जुमल्याची, ती प्रत्येक अभाव ग्रस्ताच्यामनात द्वेषच उत्पन्न करेल व त्यामुळे सामाजिक दुष्प्रवृत्तीच पसरतील. म्हणून न्याय-नीतीचा त्याग कधीही करू नये सर्वांच्या कल्याणातच आपले सुद्धा कल्याण समजून माणसाने मानवतेपासून दूर जावू नये. यातच शांती आहें. सुख आहें आणि सुव्यवस्था सुद्दा आहे. माणसाने वाईट गोष्टी पासून जागरूक रहावे याकरिता त्याने प्रत्येक क्षणी आपला उद्देश समोर ठेवायला ह्वा. आपण आपला मूळ उद्देश विसरतो तेव्हाच प्रवासात गडबड होते. मनुष्य जीवनात जे अधिकार व वैशिष्ट मिळालेली आहें ती काही विशेष प्रयोजनासाठीच आहेत. एवढी सुविधा दुसर्या कोणत्याही प्राण्याला मिळालेली नाही. मनुष्यच असा एक प्राणी आहे की त्याला सुंदर शरीर, विचार, विवेक, भाषा इ. अमुल्य गोष्टी मिळालेल्या आहे. तेव्हा माणूस यांचा योग्य उपयोग करेल तेव्हाच त्याची सार्थकता आहे. माणसाला शरीरासारखा अलभ्य लाभ मिळून सुद्धा जर तो आपले परमार्थिक ध्येय पूर्ण करीत नसेल तर त्याला ईतर प्रान्यांच्या श्रेनीचेच समजायला ह्वे. जन्मजन्मांतराचा थकवा मिटविण्यासाठी ही बहूमुल्य संधी मिळालेली आहें. मनुष्य स्वत:मिळालेल्या ज्ञानाचा व साधनांचा उपयोग करून ईश्वरप्राप्तींच्या अंतिम शांतीच्या स्थितीला प्राप्त करू शकतो. ज्यांना साधनांची, निष्ठेची एवढी शक्ती मिळालेली नसेल किंवा ज्या व्यक्ती यासाठी आवश्यक अशा कठीण तपश्चर्येच्या मार्गावर जाऊ ईच्छित नाहीत, या जन्मात उत्तम संस्कार, सदभावना, आणि श्रध्दा-भक्ती तरी उत्पन्न करावी जेणे करून पुढील जन्मामध्ये परिस्थितीची अनुकुलता आणखी जास्त वाढेल आणि हळूहळू जीवन ध्येयाकडे जाण्याची वाटचाल सुरु राहील. परंतु या कमनशिबी मनुष्याला काय म्हणावे, जो आत्मस्वरूपाला विसरून आपल्या वासनामय शरीरालाच सजविण्यात आनंद घेत आहे. मनुष्य शरीर नाशिवंत आहे, हे माहित असूनही ईतर प्राण्यांप्रमाणेच याला एक ना एक दिवस धुळीतच मिळवायचे आहें, तरी सुद्धा तो शारिरीक सुख मिळविण्यात तो आपल्या आधीकांश भाग नष्ट करून टाकतो. जो पर्यंत शक्ती व तारुण्य असते. तो पर्यंत तो समजूतदार पणाचे डोळे उघडत नाही. नंतर जेव्हा संस्काराची मुळे खोलवर जाउन बसतात आणि शरीरात शिथिलता येते तेव्हा मग थोडी अक्कल आल्यामुळे कोणता फरक पडणार? चातुर्य तर तेव्हाच आहे, जेव्हा योग्य संधी साधून माणसाने सदगुनांचा संचय केला असता म्हणजे हि यात्रा समाधान कारक पूर्ण करण्यात कोणतीही अडचण शिल्लक राहिली नसती. आपला सहज धर्म हा आहे कि आपण या जीवनात प्रकाशाची पूजा व आदर करावा आणि त्याच दिशेत आघाडी असावी. यात थोडा उशीर होवू शकतो, परंतु जेव्हा कधी एक नवीन जीवन मिळेल तेव्हा प्रकाशाकडेच गतिमान राहावें असा द्दृढ निश्चय त्याच्या सोबत नेहमीच टिकून राहावा. आपला विवेक हा होकायंत्राच्या सुई प्रमाणे ठीक जीवनाच्या ध्येया कडेच लागून राहावा. त्यामुळे आपण या यात्रेत कधीच भटकणार नाही.

या जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह इ. विकार आपल्या पवित्रतेला मलीन करीत असतात. या पवित्रतेला ब्रम्हचर्य, श्रद्धा, श्रम, व प्रेमाच्या दिव्य गुणांद्वारे दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. नक्कीच हा मार्ग फार कष्ट-कठीण व गुंतागुंतीचा आहें परंतु जर सत्य, श्रद्धा, भती आत्मसमर्पणाद्वारे ईश्वराच्या सतोगुणी प्रकाशा कडे आपण जात राहीलो तर या कठीणते मुळे मनुष्याचे कोणतेही नुकसान होवू शकत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu