Ayurveda Beauty Proper Use Of The Plant For Growth, The Youthful Skin Cream contains Sensitive Plant and other natural essences Of course, if you continue to feel exhausted, it’s a good idea to consult an ayurvedic expert to find out if there is a deeper ..
वनस्पतींचे औषधी गुणधर्म फार प्राचीन काळापासुन सर्वांनाच माहित आहे. या औषधी गुणधर्माचा सोंदर्य प्रसाधनासाठी उत्तम उपयोग करतात. अलीकडे कृत्रिम सौंदर्य प्रसाधनाचा शोध लागे पर्यंत वनस्पती जन्य पदार्थाचाच शारीरिक सौंदर्य वाढीसाठी उपयोग करण्यात येतो. तरी आजही त्याचे महत्व कमी झालेले नाही. त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत नाही. त्याची उपयुक्तता सिद्ध झाल्यामुळे आजच्या युगात कृत्रीम सोंदर्य प्रसाधना पेक्षा वनस्पती जन्य प्रसाधने (हर्बल कॉस्मेटिक) वापरणे काळाची गरज आहे. फार प्राचीन काळापासुन सौंदर्य वाढीसाठी स्त्रिया वनस्पतीजन्य औषधीचा वापर करीत असतं.शरीराच्या बाह्य व अंतर्गत सौंदर्य वाढीसाठी पोषक आहारा बरोबर नित्य नियम व्यायाम आणि योगासने करणे सुद्धा आवश्यक आहे. बाह्य शरीराच्या सौंदर्यासाठी अंगाला चोळून लावण्याचे द्रव पदार्थ, सुगंधी द्रव्ये असलेले तेल, उटणे, ओथासाथि रंग, खांसाठी रंग नेत्रांसाठी अंजन, आणि फुलांचे दागिने याचा वापर फार पूर्वी पासूनच करण्यात आलेला आहे. आजही तो होत आहे. त्याच बरोबर मुख सौंदर्य, केस सौंदर्य याही कला अस्तित्वात आहेत.
याउलट कृत्रिम सौंदर्य प्रसाधनात पावडर, पेस्ट, क्रीम्स, लोशन, फेसप्यक अशा कितीतरी प्रसाधने आहेत त्यात रासायनिक द्रव्ये असल्यामुळे कालांतराने चेहर्यावर सुरकुत्या पडणे, चेहर्याला डाग पडणे, खाज सुटणे, किंवा त्वचारोग अशी लक्षणे दिसून येतात.
आयुर्वेदात सुगंधी द्रव्ये करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात प्रामुख्याने वनस्पतीच्या पानापासून
उदा-: तुलस, दवणा, तेजपत. फुलापासून उदा-: काळी मिरी, जायफळ, हरीवकी, धने, बेल, लताकस्तुरी तसेच खोड म्हणजे – चंदन, देवदार आणि मुळ – म्हणजे ड्शीर, जतामासी यान पासून तयार केले जाते.
वरीलपैकी एखाद्या विशिष्ट झाडाची पाने, फुले, साली यांचे बारीक कुट करून केलेले मिश्रण एका पातळ कपड्यात बांधायचे आणि ते मिश्रण एक ते दोन तास पाण्यात भीजत ठेवायचे, ते पाणी नंतर गाळून त्यापाण्याच्या स्नानाने स्नायुदुखी, मनावरील ताण कमी होवून त्याच बरोबर त्वचेचे रोग सुद्धा बरे होतात. तसेच रक्तभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
पुदिना,रासमारी,केवडा,लिंबू यापासून सुद्धा सुगंधी द्रव्ये बनवतात. आयुर्वेदात केसांना रंग देण्यासाठी आव्ल्याचार्स, शुद्ध तूप,आणि मुळेठीची मुळे यांच्या मिश्रणाची शिजवून केलेली खळ कायम स्वरूपी केस रंग म्हणून उपयुक्त आहे. डोक्यावरचे केस काळे, कोंडा रहित आणि कोरडे स्व्च्छ करण्यासाठी आव्ल्याचा व लिंबाच्या रसाचा उपयोग करतात. तसेच केस घुन्याक्रीता शिकेकाई चा वापर फार्पुर्वी पासून करण्यात येतो. करड्या रंगाचे काळे करण्यासाठी भृंगराज, माका, सौंदर्य वृद्धीसाठी वनस्पती चा वापर योग्य,, आयुर्वेद आणि मुळेठीची मुळे यांची खळ उपयोगी पडते. मुलेठीच्या मुळातील अर्कात विविध प्रकारची औषधी गुण आहेत. त्यात फेनॉलिक कंपाउंड्स, ग्लायकोसाइड्स, कुमारीन, सिनॉमिक असिड, यांचे संयुगे तसेच सुक्रोज, स्टार्च, रेझिन आणि अकार्बनिक पदार्थांचा सामावेश असतो. तसेच केसांसाठी नारळ, तिळ, आणि एरंडी यांचे तेल फार उपयुक्त आहे. यां तेलात सुगंधी द्रव्य मिसळून तेल बनविले जाते. या मध्ये गुलाब, जाई, जुई, मालती, चंपकआणि केवड्याचे स्टीम डिस्टीलेशन करून सुगंधी द्रव्य तयार केले जातात.
चेहर्याच्या सौंदर्यासाठी आवळ्याची खळ उपयुक्त आहे. याशिवाय हळदी चा उपयोग सर्वांनाच माहित आहे.दात घासण्याच्या पद्धतीमध्ये पेष्ट आणि टूथब्रश येवजीपूर्वी कडू लिंबाच्या किंवा बाभूळीच्या काड्या वापरत. कडू लिंबाच्या काड्यात निबीन, निबिंडीन, निबीनिंन, निंबोस्टेरॉल, इसेन्शियल ऑइल या औषधी चा सामावेश असतो. दात किडणे, हिरड्या दुखणे, मुखदुर्गंधी, यासाठी लिंब काड्या फार उपयुक्त आहेत. आता तर वनस्पती संसोधनात सौंदर्य वृद्धीसाठी कितीतरी शोध लागलेले आहेत. आयुर्वेद आता कुठेही मागे उरला नाही. कित्येक व्याधीवर उपचार शोध लागलेले आहेत.