अनिश्चित भविष्काळ व स्वीकार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

An Unknown Future and a Doubtful Present, We fill our lives with plans for our future selves. People have always done this. Someone who lives only in the moment is not quite human.

future-mega

कित्येक दा आपण भविष्याची तरतूद करताना चुका करीत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही. त्याची आपल्या मनात भीती बाळगून असतो. एखाद्या गोष्टीची इच्छया ठेवणे व त्याबद्दल चिंता करणे हे फार वेगवेगळे आहे. जर आपण एखादी गोष्ट मनात धरून त्याबद्दल चिंतीत असाल तर मात्र नकळत आपण   नकारात्मक गोष्टींना आकर्षिल्या जात आहे. हे खरे ज्या गोष्टींवर आपण लक्ष देतो ती गोष्ट आपल्याकडे कित्येक पटीने वाढून येत असते.’ हा जीवनाचा नियम आहे. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न ठेवता भविष्य कसेही असो त्याचा स्वीकार करायलाच हवा. आपल्या जीवनात घडणार्या बाबीं वर लक्ष करा मना विरुद्ध घडत असल्यास आपण चिंतीत होतो, घाबरतो आणि बहुतां तेच घडते. पण आपण त्या गोष्टीला न घाबरता जसेच्या तसे सामोरे जा व मनाला विचारा मी हे स्वीकार करू शकतो का असे केल्याने भीती वाटणार नाही व परिणाम सुद्धा बदलतात. तेच परिणाम स्वीकार करा.

आपण घटना किंवा परिस्थिती बदलण्याची इच्छा ठेवू शकतो पण त्यासाठी अधिक प्रयत्न करणे योग्य नाही. नकारात्मक भावना आल्यातरी त्याचे दमन करू नका, व त्यांचा विस्पोट होऊ देवू नका. कधीही मध्यम मार्ग स्वीकारा म्हणजे आपल्या नकारात्मक भावना व्यक्त करा. व त्याचा स्वीकार करा. त्या भावना दाबून ठेवल्यास त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढतात. आणि त्याच उद्रेक झाला कि अपराधीपणाच्या भावनेत आपण जखडले जावू शकतो. आपल्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त करण्यात समज आहे. गरज पडल्यास नकारात्मक भावनांवर क्रियाही करावी परंतु तिला स्वीकार केल्यावर नकारात्मक भावनेने केलेले कर्म विपरीत किंवा व्यर्थ परिणाम घडविते म्हणून ज्यामुळे नकारात्मक भाव निर्माण झाले ती घटना पूर्णपणे बघून घ्या नंतर भावनांचा स्वीकार करून पूर्णता करा व त्यांना निष्क्रिय करा. असे केल्यांनतरच त्या व्यक्त करा.

नकारात्मक भावना तीन मुख्य भावनांवर आधारीत असते १. दुख   २. क्रोध  ३. भीती .या तीन भावनांना अनुसरून यांचे वर्गीकरण केले तर सर्व गोष्टी सुचीबद्ध रीतीने आपल्या समोर येतील.
आपली भावना कोणत्या प्रकारची आहे ओळखून  ती जशीच्या तशी स्वीकार करा व थोडा वेळ यातच रहा काही वेळाने हि भावना आपोआपच नाहीशी होईल. व मनात दुसरा भाव जागृत होईल तो भाव सुद्धा आपण जसा च्यातसा स्वीकार करा.व त्या भावनेत काही काळ रहा, नंतर काही काळाने हे सर्व विलीन होत जाईल व आपल्याला आरामदायी, शांत वाटेल. अशी स्थिती होवू लागेल. अश्या रीतीने नकारात्मक भावना संपुष्टात येतात. त्यांच्याशी लढण्याची किंवा क्रोध करण्याची गरज नसते. आपल्याला एवढेच करावयाचे आहे की क्रोध, निराशा, किंवा ईतर अन्य भवनांना आहे तसेच स्वीकारायचे, तिचा प्रतिरोध करायचा नाही. ज्याचा आपण अस्वीकार करतो ती टिकून राहते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu