Have you ever been asked the question, “What’s your aim in life?” It’s quite a powerful question because it is a pretty direct and incisive way to ascertain what your purpose in life is and what you aim to achieve. This article will teach you what is aim of your life.
आत्म्याचे स्वाभाविक स्वरूप अत्यंत शुद्ध, पवित्र, अलौकिक व दिव्य आहे. त्याची अंतिम अवस्था धर्माचरण व ईश्वर साक्षात्कार आहे. आणि ध्येय हे शरीराच्या माध्यमाने ज्ञान मिळवून व प्रयत्न केल्यानेच गाठता येते. शरीराला एक विशिष्ठ उपकरण समजून इंद्रियाच्या गुलामगीरीतून आपण बाहेर पडतो तेव्हा आपोआपच आत्मानुभूती होवू लागते. जी व्यक्ती या तथ्याला आपल्याला हृदयात खोलवर ठसवते, ती नाशवान वस्तूच्या अनुचीत मोहाचा त्याग करून आत्मिक पवित्रतेकडे अग्रेसर होते. द्वेष, क्रोध ई. अनात्म तत्वां कडून त्याची आवड कमी होत जाते. विचारात व व्यवहारात पवित्रता उत्पन्न होत जाते. व्यक्ती जितकी आत्मसाक्षात्काराच्या जवळ जातो, त्या प्रमाणात त्या मध्ये दैवी गुणांचा सामावेश होत जातो. त्यातून सुख-शांती व सामाधानाचे खरे परिणाम समोर येत जातात.
आत्मज्ञानासाठी मोठमोठ्या उपकरणांची किंवा जास्तीतजास्त शालेय शिक्षणाची आवश्यकता नाही. कोणत्याही व्यक्तीचे स्वत:चे सामर्थ्य किंवा नाएलाज यांचे स्पष्टीकरण करणारी व्यक्ती आत्मज्ञानी होवू शकते. या करीता आत्मनिरीक्षणाची सवय लावावी लागते. हे काम कठीण नाही. स्वत:च्या चूका, त्रुटी व सवयीत सामावेश झालेल्या दुष्प्रवृत्तीना स्वत:मध्ये दृढता पूर्वक शोधणे आणि त्याला दूर हटविणे हे प्रत्येकाला शक्य आहे. सन्मार्गावर चालत असताना वाटेत ज्या अडचणी अडथळे व संकटे येतात त्यांना धैर्य पूर्वक सहन करीत राहिल्याने आपल्या संपूर्ण चेतनेचे रूप आपल्याकडे जाऊ लागते, जसे बंदुकीच्या गोळीचा नेम दूरवर साधण्यासाठी तिला छोट्यात छोट्या नळी द्वारे सोडली जाते. तसेच आपल्या सर्व चित्तवृत्तीना एकाच दिशेत लावल्याने त्यांचा अनपेक्षित असा परीणाम दिसू लागतो. जो पर्यंत आपले मानसिक प्रयत्न बहुमुखी असतात