जीवनाचे ध्येय – भाग 2




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Aimless life is certainly a sin. Many people have no definite aim in life. They are like the travelers going ahead without any destination. Such people lead an aimless life and what they do in life, is largely a matter of chance, determined by the circumstances in which they happen to be placed. do you set any aim of your life?. read this article to determine aim your life.
The real purpose of life

मानवी जीवनाचे भाग दोन आहेत. एक स्थूल व दुसरे सूक्ष्म एक जड व दुसर चेतन, एक अंधकारमय तर दुसरे प्रकाशमय एक मर्त्य, दुसरे अर्मत्य. जगातील सर्व धर्म, दर्शन, महापुरुष विचार वंतानि याचा स्वीकार केला आहे. प्रत्येकाची वेगवेगळी भाषा व बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असल्यामुळे त्यांची नावे जरी वेगळी असली तरी सर्वांचा अंतिम सूर एकच निघतो.

आदिकाळापासून मनुष्यजात जीवनाच्या या विभिन्न पैलूंवर विचार करीत आहे. या दोघांमध्ये जे स्थिर आहे, सत्य आहे तेच चैतन्य आहे. प्रकाशयुक्त आहे, अमर्त्य मनुष्याने त्याकडे अग्रेसर होण्याचा प्रयत्न केला आहे. अनादिकाळापासून चालत आलेला हाच प्रयत्न मनुष्याचा एक स्थायी उद्देश बनला आहे. मनुष्य अंधारापेक्षा प्रकाशाला जास्त पसंत करतो तो मरणाची इच्छा करीत नाही, तर अमर होण्याची भावना त्यात पूर्वीपासूनच राहिली आहे. त्याला दु:ख नकोसे वाटते तो नेहमीच सुखाच्या शोधात लागलेला असतो. तो अमर्याद बनू ईच्छितो. कुरूपता, जडता, व विकृती ऐवजी सौंदर्य, चैतन्य, व्यवस्था व कुशलतेवर तो जरी प्रेम करीत असेल तरी वेगवेगळ्या क्षेत्रात तो आपले ज्ञान रचनात्मक दृष्टीने सामान्यच आहे, मर्यादितच आहे हे जाणतो. असे असून सुद्धा सर्व माणवांच्या समोर एकच ध्येय आहे. दु:खा कडून सुखां कडे, अंध:काराकडून प्रकाशाकडे मर्त्य कडून अमर्त्य व जडते कडून चैतन्याकडे प्रगती करणे.

हा नियम फक्त मनुष्य जातीलाच लागू होत नाही तर हा संपूर्ण सृष्टीचा नियम आहे. प्रत्येक प्राण्यांमध्ये व सृष्टीच्या प्रत्येक स्पंदनामध्ये या नियमाचा उच्चार होत आहे. नद्या आपल्या लहानश्या मर्यादित स्वरूपा कडून त्या अनंत व गंभीर अश्या विशाल सागराकडे धावत आहे. उंच उंच पर्वते आपली उतुंग शिखरे पसरलेल्या त्या विश्वव्यापी सत्तेकडे पहात आहे. त्यांनाही आपले स्वरूप फार छोटे व मर्यादित वाटते अशी जाणीव त्याना होत आहे. असे वाटते कि शिखरे सुद्धा तितकीच विराट, अनंत व महान बनण्याच्या प्रतीक्षेत उभी आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा