जीवनाचे ध्येय (भाग-1)




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Have you ever been asked the question, “What’s your aim in life?”. Have you ever understood what the person asking the question meant? It’s quite a powerful question because it is a pretty direct and incisive way to ascertain what your purpose in life is and what you aim to achieve as a goal. Read this Marathi article to learn about What’s your aim in life?.

The real purpose of life

जीवन निर्वाह व जीवन ध्येय या दोन भिन्न गोष्टी आहे. बहुतेक सामान्य लोकांचे ध्येय हे जीवन निर्वाह करणे हेच असते. खाणे, कमविणे, लग्न-मुलांना जन्म देणे, देवान-घेवाण, व्यापार-व्यवहार इ. जीवनक्रम पूर्ण करीत मरणाच्या दारापर्यंत पोहोचणे,या सर्व व्यतिरिक्त त्यांचे कोणतेही ध्येय नसते. एक स्वत:साठी साधने जमविणे, दुसरे एक संसार उभा करणे, आणि मुलांचे पालन-पोषण करीत लग्न इ. करून देणे, या सामान्य बाबींना लोकांनी जीवनाचे ध्येय मानले आहे. परंतु हि जीवन निर्वाहाची सर्व साधारण प्रक्रिया आहे. हे जीवनाचे ध्येय नाही. जीवनाचे ध्येय त्या सुनिश्चित विचारालाच म्हटले जाईल जे या जगातील साधारण कार्यक्रमापेक्षा काही तरी वेगळे महान असेल; ज्याला पूर्ण करण्यासाठी अधिक पुरुषार्थ करावा लागेल.

जीवनात एखादे सुनिश्चित ध्येय ठरवून चालणाऱ्यांना असाधारण व्यक्तींच्या श्रेणीमध्ये गणले जाते. त्यांचे वैशिष्ठ व मोठेपणा फक्त हेच असते की ते सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तिंपेक्षा काही असामान्यतेला धरून असतात. लोक त्यांना महान यांसाठी मानतात. कि महान व्यक्तींने एक वेगळाच व असामान्य असा जीवनाचा मार्ग निवडलेला असतो. सामान्य व्यक्ती हा मात्र आधी ठरलेल्या मार्गानेच जात असतो. व त्यात कितीतरी दु:ख व त्रास सहन करीत असतो. पण असामान्य व्यक्तींच्या अंगी हिम्मत, कष्ट, सहिष्णुता मोठ्याप्रमाणात असते. परंतु असेही आहे कि जीवन निर्वाहाच्या साधारण प्रक्रियेला सुद्धा एक असामान्य दृष्टीकोन ठेवून जर पूर्ण केले गेले तर ते सुद्धा एक प्रकारचे जीवनाचे ध्येयच म्हटल्या जाते. या साधारण प्रक्रियेत असामान्यत्व तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा जीवन अश्या प्रकारे व्यतीत होईल कि, ज्यामध्ये मनुष्य पतनाच्या खड्ड्यात न पडतां एक आदर्श जीवन जगत जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत पोहोचेल. ज्या व्यक्तीने आपले जीवन अश्रू -वेदना व दु:खा पासून मुक्त करून हास्य, हर्ष, प्रमाद व उत्साहाने व्यतीत केले आहे. त्याने सुद्धा एक प्रकारे यशस्वी जीवनध्येयच प्राप्त केले. ज्याने समाधानकारक व हसत-खेळत जीवन यात्रा पूर्ण केली आहें, त्याचे जीवन यशस्वी मानले जाईल.या उलट ज्याने आपली जीवनयात्रा रडत, कन्ह्त व पश्चाताप करीत पार केली त्याचे जीवन खूपच अपयशी झाले असे समजावे लागेल.

जीवनाच्या यशस्वितेचे प्रमाण जिथे एखाद्याच्या कार्याने-कर्तुत्वाने वाढते, तिथे त्याच्या अंतिम श्वासामधील शांती व समाधानाची मानसिकता सुद्धा त्याचा एक सुंदर पुरावा आहें. जीवन निर्वाहालाच जीवन मानणारे जो पर्यंत आपल्या जीवनात एक सुव्यवस्था एक शिस्त व सुंदरता आणणार नाही तो पर्यंत जीवन जगण्याच्या सामान्य प्रक्रियेत ते यशस्वी होवू शकणार नाही. जीवनात हास्य व उत्साहाचे प्रमाण जितके जास्त राहील, ते तितकेच सुंदर राहील. प्रसन्नता हेच जीवनाच्या सुंदरतेचे दुसरे नाव आहे. ज्या जीवनात हास्य नाही, उत्साह व उल्हास नाही त्यात जगातील सर्व सुख साधने असोत, ते विपुल सुवर्णानी मढलेले असोत, त्याला सुंदर म्हटले जावूच शकत नाही.

मोठा बंगला, सुसज्जित खोल्या, सुंदर वस्त्र, भरलेल्या तिजोऱ्या, आलिशान गाड्या आणि रंगरूप अशा आकर्षणाने भरलेले जीवन जरी ईतरांना आकर्षक वाटत असले तरी हि साधने त्याच्या स्वत: साठी जीवनातील सौंदर्य वाढवू शकत नाही. कारण जीवनातली सुंदरता बाह्य सौंदर्यावर किंवा वैभवावर नाही, ती तर मनुष्याच्या अंत:करनातच असते. ज्यांचे गुण, स्वभाव, कर्म जितके सात्विक व सुरुचीपूर्ण असतील, त्यांचे जीवन तितकेच प्रसन्न व तितकेच सुंदर राहिल. अविचारी, व्यभिचारी किंवा अवगुणी आहें तो कितीही धनवान, टापटीप, सुडौल शरीर व सुंदर राहणीमान असला तरी तो सुंदर जीवनाचे ध्येय साधू शकत नाही. या उलट जो सामान्य स्थितीचा आहे, गरीब आहे व फार देखणा नसेल परंतु जर तो सुसंस्कृत, सभ्य, सुशील, संतुष्ट व शांत असेल तर त्याचेच जीवन जास्त सुंदर म्हटल्या जाईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा