आयुष्य खूप सुंदर आहे
Like
Like Love Haha Wow Sad Angry
7

 Aayushy Khup Sundar Aahe.

images

आयुष्य खूप सुंदर आहे
सोबत कुणी नसाल तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळ वाहून गेल
म्हणून रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही अस म्हणून
उदास होऊ नका.
मुगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, अस म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हान करा त्या सूर्याला ।।
मग उगवले तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितीज घेऊन
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ
उत्साह ध्येयाने भरून म्हणून
आयुष्यात खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
7
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: