तांबडा भोपळा




Tambda Bhopla (red pumpkin) is usually grown round the edges of garden lands.
images (1) भोपळ्याचे आहारातील महत्व कळल्यामुळे त्याचे पदार्थ अथवा भाज्या   खाण्याकडे जास्त कल आहे. तांबड्या भोपळ्याचे हि तेवढेच  महत्व आहे.  यां मध्यी ‘अ’ ‘ब’ ‘क’ या जीवनसत्वा बरोबर कार्बोदके तसेच खनिजे  आढळतात. हा भोपळा दीर्घकाल टिकतो. याच्या भाजीचे गुणधर्म  पौष्टिक, कृमिध्न आहेत. त्याच्या कोवळ्या वेलींची किंवा कोवळ्या  पानांची सुद्धा भाजी बनविल्या जाते. पोटातील आग घालविण्या साठी त्या  च्या वेलीच्या देठ्ठाचे रस काढून पिल्याने आग शांत होते.

 याही भोपळ्याच्या बियांचे गर काढून सुकवून बारीक करून त्यात तूप व साखर  घालून खाण्याने शरीर पुष्ट व सशक्त होते. शक्यतोवर हि भाजी आठवडी  एक वेळ तरी खावी.

 भोपळ्याच्या किसात गुळ घालून थोडे शिजवून लहान मुलांना खाण्यास  दिल्यास ते आवडीने खावू शकतात. किंवा याच गोड किसात गोडी नुसार बेताची कणिक घालून त्याचे गोड भजी सुद्धा करून खाण्यास देवू शकतो ती सुद्धा छान लागतात. किंवा याच्याच पुर्या सुद्धा बनवून खावू शकतात.

भोपळ्याची वरील हिरवि साल हलक्या हाताने किसणीने काढावी व त्यात तील हिरवी मिरची बारीक कापून त्यात घालावी व च्नुसार मीठ घालून कढइत किंचित तेल गरम करून परतावे ते जेनात तोंडी लावण्यात छान वाटते. तसेच भोपळ्याच्या बारीक फोडी व दोन मिरच्यांचे तुकडे पाणी न घालता कुकरमध्ये  शिजवून घावे थंड झाल्यावर त्याला बारीक करून चवीनुसार मीठ व किंचित साखर घालावी व  तेल गरम करून त्याची मोहरी व हिंग टाकून फोडणी करून त्यात घालावी व नंतर थोडे दही घुसळून त्या रायत्यात घालून जेवणात खाण्यास द्यावे.

भोपळ्याची हिरवी साल काढून त्याचे अगदी बारीक तुकडे करून ते तेलात तांबूस परतावे. व त्या सोबत दोन सुक्या लाल मिरच्या परताव्या त्यात थोडा चिंचेचा कोळ व गुळ,खोबरा कीस,भाजलेले तीळ व चवी नुसार मीठ हे सर्व एकत्रित करून त्यावर तेल गरम करून हिंग हळद व मोहरीची फोडणी केलेले तेल त्यावर घालून काचेच्या भांड्यात ठेवावे व आहारात घ्यावे.  भोपळ्याच्या बिया,साल,आणि गर हे सर्व आहारात फार पौस्टिक

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड