Massala is a mixture of many spices and herbs. It is used extensively in Indian cooking. An Indian meal is not complete without Indian spices. Get tips on making Spices…
चहा मसाला
साहित्य-: ५० ग्राम सुंठ पूड, ५ ग्राम काळे मिरे,५ ग्राम लवंग, ३ ते ४ दालचिनी तुकडे, ६ विलायची,अर्धा जायफळ.
कृती -: लवंग, मिरे, दालचिनी, विलायची, जायफळ हे सर्वांची मिक्सर मध्ये पावडर करावी आणि सुंठ पावडरीत मिसळून घ्यावी. हा मसाला तयार . चार कप चहास अर्धा चमचा मसाला वापरावा. प्रथम पाणी घेऊन त्यात प्रथम मसाला टाका व पाणी उकळीला येवू द्या व नंतर चहा पावडर घाला.
……………………………………………………………..
चिवडा मसाला
साहित्य –:धने पूड, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, साखर आणि कढीपत्ता, सोप, मोठी विलायची, व लवंग याची पावडर करून ठेवावी. साधीसी फोडणी देवून चिवडा तयार करून हि पावडर वरून दोन चमचे सोडल्यास चिवडा स्वादिष्ट बनतो.
……………………………………………………………..
चाट मसाला
साहित्य -: आमचूर पावडर, काळी मिरी, धने, जिरे, सुक्या लाल मिर्चीचे तुकडे, सुकलेली पुदिन्याची पाने, सुंठ, मेथी दाणे, ओवा, खरबुजाच्या बिया, लवंग, तमाल पत्ता, जायफळ आणि थोडे हिंग
कृती – : हिंग, खरबुजाच्या बिया, आमचूर पावडर, पुदिन्याची पाने, सुंठ, जायफळ हे सर्व बाजूस ठेवून बाकी सर्व मसाला वेगवेगळे मंद आचेवर तेल न वापरता गरम परतून घ्यावे. नंतर या सर्वांची भाजलेले व न भाजलेले सर्व जिन्नस मिक्सर मध्ये घालून एक जीव पावडर करावी. त्यानंतर बाहेर काढून त्यात चवी नुसार साधे मीठ व काळे मीठ घालावे व मिक्स करून मसाला बरणीत भरावा. पाणी पुरीचे पाणी करताना पाण्यात पाण्याचा अंदाजे हा मसाला एक तास पूर्वीच घालावा. म्हणजे स्वाद चांगला येतो. तसेच भेल, दहीवडे, चाट , रगडा, फ्रुट्स, उडीद, मुग पापड यावर सुद्धा मसाला वापरता येतो.
……………………………………………………………..
सांबार मसाला
साहित्य -: धने, लाल सुकी मिरची चे तुकडे, एक चमचा जिरे, थोडी मेथी दाणे, बिन सालाची उडदाची डाळ, एक चमचा मोहरी, किंचित हिंग आणि कढीपत्ता.
कृती -: डाळ चांगली भाजून घ्यावी. धने, मिरची, मेथीदाणे, जिरे व कढीपत्ता वेगवेगळे भाजावे, नंतर सर्व जिन्नस एकत्रित मिक्सर मधून पावडर करावी. मसाला तयार हा बरणीत किंचित मीठ घालून ठेवल्यास टिकतो.
……………………………………………………………..
खिचडी मसाला
साहित्य -: गोडा मसाला, पंजाबी गरम मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, धने, सुके खोबरे, जिरे, लिंबू रस
कृती -: हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्सर मध्ये बारीक करावे व खिचडीला उकळी आली कि नंतर त्यात घालावे व खिचडीत एक जीव करावे. व लिंबू रस टाकावा असल्यास थडे साजूक तूप घालावे व खिचडी झाकून शिजू द्यावी. हि मसालेदार खिचडी रुच्रकर लागेल.
……………………………………………………………..