Shevgyachya shenga or drumsticks is the star ingredient of this curry. It adds its own unique flavor. Try it if you love drumsticks
शेवगा यालाच मुंगण्याच्या शेंगा असं म्हणतात. शेवगा आणि बटाटा अशीसुद्धा भाजी केली जाते तसेच शेवग्याच सूप आही कबाबही केल जात. तसेच शेवगा, बटाटा आणि परवल याची सुकी भाजी केल्या जाते.
मात्र हि भाजी मसाल्याविणा बनविण्यात व खाण्यात एक वेगळीच चव येते. शेवग्याच एक वेगळ स्थान आहे. हा शेवगा आहारात नेहमीच वापरलात तरी काहीच हरकत नाही. कारण यात औषधी गुणधर्म फार आहे. शेवगा गरम, हलका, तिखट, मधुर, अग्नीप्रदीपक, रुचकर, दाहकारक वीर्य वर्धक, पित्त व रक्त प्रकोपक असून शेवग्याची भाजी वात विकार दूर करणारी आहे.
औषधी गुण – शेवग्याच्या मुलांचा रस काढून किंवा त्याच्या काढ्यात मध घालून घेतल्याने गळू बरे होतात. शेवग्याच्या फुलात ‘प्टेरेगोस्परमीन, पाल्मिक एसिड, स्टेइक एसिड, बेटेनिक एसिड, ओलेइक एसिडहे घटक असतात. टेरिगोस्पर्मीन नावाचे प्रती जैविक असतात. पानातील रसात जीवाणू नाशक तत्व असतात. तसेच त्याच्या खोडातून भुरकट डिंक मिळतो. तसच बियां मधून रंग रहित तेल मिळत. शेव्ग्यात मोठ्या प्रमाणात खनिजं आढळतात.
शेवग्यापासून जीवनसत्व ‘अ’ ‘क’आणि ‘इ’ तयार करतात. पाणी शुद्धी करण्यात शेवग्याच्या बियांचा वापर होतो. याच्या पानाचा रस पिल्याने उचकी थांबते