मेरी ख्रिसमस




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Meri Krismas – Linguistics and terminology matter especially at Christmas. if you want to impress your friend ok Pisin, Bikpela hamamas blong dispela Krismas go long yu Meri Krismas Briefing An overview of Europe’s film industry ..

 या पृथ्वीimages (2) तलावर आजवर अत्यंत महापुरुष होवून गेले. जगण्याचा अर्थ  शोधणारे,जीवनाचा गुढार्थ जाणणारे,आणि साक्षात मृत्युला कवेत घेवू पाहणारे ,या सार्यांच्या जीवनात प्रदीर्घ यातनांच्या

 काळ्याकभिन्न रात्री नंतर ज्ञानाची तेजस्वी पहाट हसत आली. हे सर्व  अग्नी परीक्षा देणारे परंतु या सर्वांच्या जीवनाचा उद्देश मात्र एकच  मार्गात येणार्या सर्व यातनांना साधनेच कारण बनवून स्वत:च्या असीम  अस्तित्वात स्थापित होण आणि विश्व कल्याणा साठी निमित्त बनण.  दोनहजार वर्षापूर्वी जेव्हा यहुदी लोकांवर रोमच साम्राज्य होतं तेव्हां  इस्राईलमध्ये कलियुगाच तांडवच माजलं होतं ज्यू लोकांवर अतोनात  अत्याचार होत होते सर्वत्र अधर्म बोकाळला होता तेव्हा अश्या अंधार्या कोलाहलात सार्यांना एकच आशेचा किरण दिसला तो म्हणजे मुक्तिदाता ईसा म्हणजेच येसू ख्रिस्त . जन्सामान्यामध्ये अविश्वासाचे काळे मेघ दाटून आले होते.अंधश्रद्धाच्या दरीत सारा समाज कोसळू पाहात होता.पण ईसामसिहाचा जन्म झाला आणि अविश्वासरुपी कलियुगाला जणू पूर्णविराम मिळाला. जीजसने यहुदिंच्या अंधश्र्धा वर प्रहार केले. मानव जातीच्या कल्याणास्तव नवे नीती नियम तयार केलें पण तात्कालीन तथकथित पुरोहीतांसाठी हा फार मोठा धक्का होता. जीजसच्या सत्य वचनंमुळे तत्कालीन धार्मिक पंडीतांच्या आर्थिक हित संबंधांना हादरे बसू लागले मग अशा काही पंडीतांनी येसुला सुळावर चढविण्याच षड्यंत्र रचलं. त्यांना वाटले,कि ते येसुला नामशेष करतील ! पण ते येशूच्या देहाला नामशेष करू शकले. पण आज हजारो वर्षा नंतरही त्याचे शिक्षण अमर आहे.

     चैतन्यरुपात विराजमान असणारे येशू फक्त ख्रिश्चन बांधवासाठी नव्हे तर,सत्याची उपासना करणार्या सर्व साधकांसाठी वंदनीय आहेत. सुळावर चढतांना सुद्धा ते पापी लोकांसाठी प्रार्थना करीत होते आणि करुणा हाच त्यांच्या जीवनाचा संदेश आहे. निस्वार्थ आणि निर्व्याज प्रेम हा त्यांच्या अस्तित्वाचा अर्थ आहे. सुळावर चढतानाहि येशूच्या चेहर्यावर उमटलेल करुणेचं अनाकलनीय रहस्य त्यांच्याचं आत्मज्ञानात दडलेलं होतं. त्यांच्या ‘न्यू टेस्टामेन्ट’ या पवित्र ग्रंथातून अमृत धारेप्रमाण पाझरतं. तसेच ‘बायबल’ हा ग्रंथ सर्व विश्वाला आजही शांतीचा संदेश देत आहे. आजही आपण त्यांचा जन्म दिवस सणा सारखा साजरा करतो पण त्या मागचा मुळ उद्देश विरत जात आहे काय हे ध्यानात ठेवल पाहिजे. त्या येशुनी सुळावर चढताना महाजीवनाचा महाउत्सव साजरा केला होता तो म्हणजे प्रेम,द्या,करुणा,क्षमा,शांती,समर्पण. अश्या अनेक सगुणांचा आगार असणारा अथांग सागर होय. करुणेच्या लहरी तर या सागरांत कायम खळाळत असतात. म्हणून आजही  अनेक वर्षांन ते चैतन्यदायी वाटतात. त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांना पसंत पडणारी कोणती भेट. द्यावी यावर मनन करून त्यांच्या परमत्त्वाचा स्वीकार कायम ठेवून कृतीत उतरवून क्रिसमस साजरा करायला हवा. आपल्या अंतकरणात आनंदाचे,प्रेमाचे,करुणेचे,हर्षाचे आणि चैतन्याचे रंग आपल्या मित्र मंडळी  च्यात मिसळण्याची सुवर्ण संधी होय. परस्परांना अदृष्यात जोडणार्या तारा छेडल्या जातात, याचा मुळ उद्देश हाच की प्रत्येक तार चैतन्याच्या स्पर्शाने तरंगीत व्हावी. अहंकार जेव्हा विलीन होतो, तेव्हाच हे चैतन्य प्रगटतं, येसुला सुळावर चढवणारे लोक अहंकाराच्या,क्रोधाच्या भडाग्नित होरपळत होते. येशूला तर सुळावर चढताना सुद्धा त्यां पापी लोकांची कीव त्यांना येत होती. उच्चत्तम चेतनेच्या अनुभवातच हा साक्षात्कार होवू शकतो.

     त्यासाठी त्यांच्या शिकवणूकीला आत्मसात करावं. त्यांना वाटतं की ‘प्रभूच्या राज्ज्यात सर्वांनाच प्रवेश मिळावा ‘  आपल्या प्रार्थना आणि प्रायश्चित्त करण्याच महत्व  त्यांनी पटवून दिल होत. प्रार्थना असो वा प्रायश्चित्त येशुचां रोख अहंकार विलीन करण्या कडेच असायचा कारण अहंकाराच्या मुक्तीतून प्रभू राज्याचा पाया घातला जाणार होता. म्हणूनच ‘जो क्षमा करेंगे, उन्हे क्षमा किया जायेगा ‘ किंवा ‘ मै ईश्वरका पुत्र हुं, आप भी ईश्वर के पुत्र हो ‘ यांसारखी सत्यं वचने अंतर्यामी वसणार्या सत्याकडेच निर्देश करतात. याच शिकवणी ते मनुष्याला साद घालायचे म्हणून ते मनुष्यजातीसाठी मार्गदर्शक ठरले. खरंतर या पृथ्वीला असा मुक्तीदाता लाभला हा एक चमत्कारच म्हणावा लागेल . म्हणून २५ डिसेंबर हा दिवस सर्वांसाठीच आनंदाचा अभिष्टचिंतनाचा आणि सत्य मार्गावर अविरत चालत राहण्यासाठी प्रार्थना करण्याचा सुवर्ण दिवस आहे. त्यांच्या अमुल्य शिकवणीवर मनन चिंतन करण्याचा दिवस आहे. कारण आपल सर्वांच आयुष्य सर्वार्थांन फुलविण्यासाठी त्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. आपण आपल्या अहंकार,विकार,स्वैराचार,भ्रष्टाचार आणि निरर्थक विचारांची आहुती देवून येशु चरणी प्रार्थना

करू यां… शुभेच्छा … मेरी ख्रिसमस .

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu