Life Means Feelings: This is especially so when similar events are repeatedly experienced. Ultimately they form a final emotional conclusion about life, how to live it, and more importantly, how to survive physically and mentally in a world of chaos. When this happens a feeling is born.
आपण एखाद्या गोष्टीला ती वास्तव आहे असे का म्हणतो तर ती आपण पाहू शकतो. तिला स्पर्श करू शकतो म्हणून. पंचज्ञानेद्रियांमुळे आपण शब्द, स्पर्श रूप, रस व गंध यांचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. जगात जे जे अस्तित्वात आहे त्यात सातत्याने बदल होत आहे. तसाच आपल्या शरीरातही सातत्याने बदल होत आहे. तुमचे शरीर म्हणजे एक चमत्कार आहे. ते सतत एखाद्या प्रवाहाप्रमाणे संथपणे वाहात असते, त्यात बदल होत असतो, पण या बदलाची आपल्याला जाणीवही नसते. किंबहूना हा बदल समजून घेण्यासाठी आपण असे म्हणू शकतो की, शरीर हे ‘म्हातारे’ होत नाही जर त्याच्यात फक्त बदल होत असतो. नवीन जन्माला आलेले बाळ हे अतिशय नाजूक असते तरीही ते स्वत:चे संरक्षण करू शकते. कारण बाळ हे नवीन जन्म आले असले तरी त्यांचा शरीरात असणाऱ्या पेशी या नवीन नसतात. त्यामुळे जन्म म्हणजे अदृश्य असलेले दृश्य होणे आणि मृत्यू म्हणजे दृश्य असलेले अदृश्य होणे होय; पण जे अदृश्य असते ते नसतेच असे नव्हे. हे ज्याला समजत नाही त्याला आपले शरीर म्हातारे होते असे वाटते. आपले शरीरही अनाप्रमाणे शिळे होत नाही. निर्जीव होत नाही निर्जीव वस्तू खराब होतात, गंजतात, पण आपले शरीर सतत ताजे राहण्याचा प्रयत्न करत असते. सर्व संकटांना सामोरे जाऊन त्यांचा प्रतिकार करून अॅडजस्ट होण्याचा प्रयत्न करत असते. हि ऊर्जा प्रत्येक व्यक्तीत आहे. म्हणूनच आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंना वर्षानुवर्ष सामोरे जाऊन सुस्थितीत राहू शकतो. ऋतूतील बदल आपले शरीर सहन करू शकते, कारण ऋतूप्रमाणे शरीरात बदल घडवून आणण्याची शक्ती शरीरात असते. प्रत्येक श्वासागणिक आपण शुद्ध हवा आत घेत असतो आणि अशुद्ध हवा बाहेर टाकत असतो.
शरीरातील प्रत्येक अवयवातील प्रत्येक पेशीत ठराविक अंतरानंतर सातत्याने बदल होत असतो. खरे तर शरीरात अक्षरश: ढवळाढवळ चाललेली असते, पण याची शरीराला आणि मनाला तरी जाणीव होते का ? साधारपणे वयाच्या तिशीनंतर गोगलगायीच्या गतीने आपले शरीर थकायला लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, त्वचेचे तेज कमी व्हायला लागते. स्नायूंमधील शक्ती कमी व्हायला लागते, दृष्टी मंदावू लागते, एकू कमी येते, हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्यातील जोम उत्साह व शएक्क्ती कमी व्हायला लागते. शरीरातही अनेकजैवरसायनात बदल होऊ लागतो आणि तरुणपणी जसे काम करू शकत होतो तसे आपण आता करू शकत नाही. वय जसजसे वाढू लागेल तसतसे हे बदल अपेक्षित असले तरी ते होणारे बदल हे अतिशय हळूहळू म्हणजे वर्षाला दहा टक्के या प्रमाणात होतात. शरीरातील बाकी ९० टक्के उर्जा कायम राहाते. तसेच मेंदूची कार्यक्षमताही अतिशय हळूहळू कमी व्हायला लागते. मी आता म्हातारा होऊ लागलो असेच जर तुम्ही सारखे लागतात म्हणू लागलात तर ही एजिंग प्रोसेस लवकर व्हायला लागेल आणि तुम्ही लवकर म्हातारे व्हाल. त्यामुळे दहा टक्क्यांनी प्रतिवर्षी तुम्ही म्हातारे होत असलात तरी उरलेल्या ९० टक्क्यांकडे बघा. हे ९० टक्के अंतर्मन आणि त्याचे नियमन करणे तुमच्या बुद्धीवर अवलंबून असते. हि बुद्धी जरी तुम्हाला दिसली नाही तरी अस्तित्वात असते. तिचे अस्तित्व ओळखून तिचा योग्य प्रकारे वापर केला तर तुम्हाला कळेल कि शरीर हे वृद्ध होत नाही तर त्यात त्यात बदल होत असतो. त्याच्यातील सर्जनशीलता अजूनही टिकून असते, पण अशा तऱ्हेने शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार करणे हि तुमच्या अंर्त:मनातील बुद्धीची कसोटी आहे. तुमच्यातील हि बुद्धी तुम्ही सततच्या अभ्यासाने विकसित केली तर तुमच्या शरीरातील बदल तुम्ही थोपवू शकता. या बाबतचे अगदी योग्य उदाहरण घायचे झाले तर एखाद्या व्यक्तीचे निवृत्त होणे.
तुम्ही नोकरीतून निवृत्त झाला किंवा व्यवसायातून स्वखुशीने निवृत्त म्हणजे इतर क्षेत्रांत सक्रिय व्हायला मिळालेली संधी आहे. त्यामुळे निवृत्ती म्हणजे अधिक सक्रिय होन होय. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अनेक वेळा अनेक कारणांमुळे तानतनावाशी सामना करावा लागतोच. पण हेच तानतणाव तुम्ही सतत मनात एखाद्या कॉम्प्यूटरप्रमाणे साठवून ठेवू लागलात तर तुम्ही सतत तणावाखाली राहता. त्यामुळे सतत एक प्रकारची भीती, दडपण, संताप, नैराश्य, संशय याशिवाय तुमच्या मनात वेगळ्या भावनाच निर्माण होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने अशी एक कलाविकसित केली पाहिजे कि ज्यामुळे वाईट आणि तणावाच्या घटना आयुष्यातून पुसल्या जातील आणि चांगल्या घटना तेवढ्याच लक्षात राहतील. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टी या लक्षात ठेऊन लक्षात ठेवाव्यात आणि काही गोष्टी लक्षात ठेवून विसराव्यात याचीच जर सवय लावून घेतली तुमच्या मनात काय साठवायचे आणि काय विसरायचे याची विवेक बुद्धी हळूहळू चांगली विकसित होईल कि ती एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे मनात होत राहील. ही क्रिया होते आहे हे तुम्हाला कळणारीही नाही. शरीरात तुमच्या नकळपणे अनेक क्रिया होत असतात. श्वासोच्छवास, पचन, नवीन पेशींची उत्पती, जुन्या व रोगग्रस्त पेशींचानाश, शरीरातील विषारी पदार्थाचे शुद्धीकरण, ब्लडप्रेशरवर नियंत्रण, शरीर तामनानाचे नियमन, अशा असंख्या क्रिया शरीरात सहजपणे होत असतात. या सहजपणे होणाऱ्या क्रिया मंदावणे म्हणजे वृद्धत्व होय.
शरीरातील या क्रिया सहजपणे होत असतात याची आपल्याला जाणीव होत नाही म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, पण याचा अर्थ त्या क्रिया शरीरात होतच नाही. असे नव्हे आपण या क्रियांकडे जागरुकतेने बघण्याचा कधी प्रयत्नच करीत नाही, तसा प्रयत्न केला तर या अनैच्छिक क्रियावरसुद्धा आपण नियंत्रण मिळवू शकू. त्यासाठी शरीर आणि मन हे कायमचे जागृतावस्थेत ठेवायला शिकले पाहिजे. बुद्धी ही अशी चीज आहे की, ती गंजत नाही, नाश पावत नाही, म्हातारी होत नाही, ती सतत तरून राहते, चैतन्यान मुसमुसलेली असते. सतत प्रवाही असते. यालाच प्राण असे म्हणतात. प्राण म्हणजे जीवन ऊर्जा होय. या प्रमाणावर प्रयत्नाने प्रत्येक व्यक्ती नियंत्रण ठेवू शकते. आपल्या इच्छेप्रमाणे ही ऊर्जा वापरू शकते. या ऊर्जेचाच वापर करून वृद्ध माणूसही चिरतरुण राहू शकतो. ही ऊर्जा प्राण आहे म्हणूनच माणूस जिवंत राहू शकतो. शरीर, मन, विचार, बुद्धी यामधील त्राण गेला तर प्राणही जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आत ऊर्जा जाणून घेण्याची क्षमता आहे. या प्राणाकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देण्याची जरुरी आहे. तेवढी जागरुकता प्रत्येकात हवी जागरुकता म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे जाणीव. वृद्धत्वामध्येही मानसिक ऊर्जा म्हणजेच प्राण कमी होत नाही ऊर्जेची जाणीव ठेवली तर वृद्धत्व हे ओझे वाटणार नाही…..