Living being representing the most evolved species on Earth, characterized especially … Includes 17 all-around themes to explore, including the human body,She’s a very warm and generous human being. We should do more to help our fellow human beings. The drug has not yet been tested on human being
मनुष्याचा मुळ जो स्वभाव असतो. त्याच्या वर मात करण फारच कठीण असतं. स्वभाव बदलविण्या बाबत आपण कितीही प्रयत्न केले तरी व्यर्थ !
तर हा कठीण वाटणारा स्वभाव नक्की आहे तरी काय? व्यक्तीचे वागणे ज्यावर अवलंबून असते, त्याप्रमाणे ते कृतीत उतरते त्या कृतीतून त्या व्यक्तीची ओळख इतरांना होत असते ते वास्तव म्हणजे त्या व्यक्तीचा स्वभाव अस समजाव. व्यक्ती वागतो तो त्याच्या स्वभावानुसार. त्याचे व्यक्तिमत्व हे त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. राग, लोभ, मद, मोह, माया, आणि मत्सर हे मानवाचे षडरिपू आहे. या षडरिपुचा पगडा त्या व्यक्तीवर जसा असेल तसा त्या व्यक्तीचा स्वभाव होत असतो. रागीट, तापट, संतापी, चीड्चीडेपणा हि रागाची लक्षणे आहेत. प्रत्येक गोष्ट फक्त आपल्यालाच मिळावी हि लोभाची लक्षणे होत. मी पण स्वभावात असणे म्हणजे मी जे करेन, किंवा म्हणेन तेच खरे माझेच ऐकले पाहिजे हि मदाची लक्षणे होत. आपले कोणत्याही प्रकारे नुकसान होवू नये हे प्रत्येकाला वाटते पण आपल्या फायद्यासाठी दुसर्याचे नुकास झाले तरी चालेल हे मात्र मोहाचे लक्षण होय. धन आणि संपत्तीची अति अपेक्षा करीत सर्व काही आपल्याच जवळ जमा करणे हे मायेचे लक्षण होय.इत रांजवळ सर्वकाही आहे माझ्याजवळ नाही असे समजून त्यांचा द्वेष करणे किंवा त्यांच्या बद्दल मनात चीडचीड निर्माण होणे किंवा जे आपल्याला मिळाले नाही ते ईतरांना मिळू नये हि भावना मनात असणे म्हणजे हि मत्सराची लक्षण होत.
या स्वभावाची वैशिष्टे असलेली व्यक्तिमत्वे समाजात वावरताना आपण बघतच आहे. पण त्यांच्या सोबत असणार्यांना कायम त्रास होत असतो. असे विचित्र स्वभावाची व्यक्ती सोबत असणार्यांना फार त्रास सहन करावा लागतो, म्हणून सामान्य स्वभावाची व्यक्ती अशा व्यक्तीमत्वापासून शक्यतोवर स्वत:ला दूर ठेवण्याचाच प्रयत्न करतो. कधी कधी या व्यतिरिक्त एक प्रकारे कोरडा स्वभावहि असतो तो असा कि त्या व्यक्तीला ना कुठले देणे ना घेणे कुठल्याही प्रसंगात त्यांचे अस्तित्व नसल्या सारखेच असते ,ना राग, ना लोभ ना दु:ख ना सुख, ना आनंद ना क्लेश एकदम जगाच्या एका टोकाला स्वत:ला ठेवून फक्त देहाची हालचाल करणारी प्रजाती, चेहर्यावरती रेषा नसणारी अशीही ऎक स्वाभावाची लख असते.
या उलट शांत, संयमी, लाघवी, प्रेमळ, सन्मार्गी, मोकळे, हसरे, गोड असेही स्वभाव असतात. असे स्वभाव असलेल्या व्यक्ती सर्वांनाच खूप आवडतात. त्यांच्या मनात कोणत्याही गोष्टी घर करून राहात नाही.