A home is generally a place that is close to the heart of the owner. Home is the place where we are born and live. It is the sweetest place in the world.
अवघ्या जगात भारतीय संस्कृतीच्या उदो-उदो होतो त्याचे मुख्य कारण येथील टिकून असणारी ‘कुटुंबसंस्था’ आहे, पण या ‘कुटुंब’ संज्ञेलाच सध्या आम्ही सुरुंग लावायला निघालो आहोत. अनेक जुन्या चालरीती मोडीत काढताना घरातील आई- वडिलांची अवस्थाही तीच होतेय याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
प्रत्येक जन्माला आलेला माणूस बाल्यावस्था, तारुण्य, वृद्धत्व या तिन्ही टप्प्यांतून जात असतो. म्हणजे आजचा बालक उद्याचा तरुण व आजचा तरुण उद्याचा वृद्ध असणारच आहे. निसर्गाचे हे चक्र अविरतपणे चालतच आहे. प्रश्न एवढाच आहे की, प्रत्येक तरुणपिढी हे किती समजून घेते आहे!
अवघ्या जगात भारतीय संस्कृतीचा उदो -उदो होतो त्याचे मुख्य कारण येथील टिकून असणारी कुटुंबसंस्था आहे, पण या कुटुंब संज्ञेलाच सध्या आम्ही सुरुंग लावायला निघालो आहोत. अनेक जुन्या चालीरीती मोडीत काढताना घरातील आई-वडिलांची अवस्थाही तीच होतेय याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. जनरेशन गॅप हा प्रत्येक पिढीचाच प्रश्न आहे, तो असणारच! पण त्याला उतर देखील आपल्यालाच शोधायची असतात. म्हणूनच आज घरातील वडीलधार्या माणसांची कुटुंबाला खूप मोठी गरज आहे. हे निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे.
सध्याचा काळात दोघेही नोकरी निमिताने बाहेर, आपल्या पाल्यांना आपण वेळ देऊ शकत नाही, अशावेळी आपल्याला मुख्य आधार असतो तो अशा आपल्याच असणाऱ्या आई-वडिलांचा मुलांचे बालपण हरवू नये, त्यांच्यावर खरोखरच संस्कार व्हावे, त्यांना सूरक्षितता मिळावी, प्रेम व जिव्हाळा मिळावा; यासाठी आम्हाला गरज आहे ती घरातील चार पावसाळे अधिक पाहिलेल्या ज्येष्ठांची आपल्या मुलांच्या आजी-आजोबांची.
आजी- आजोबांचा आनंदाचा झरा म्हणजे त्यांची नातवंडे असतात. प्रेमाचा एक अतूट- भावबंध त्यांच्यात निर्माण झालेला असतो, कधी-कधी आपण आईवडील तो समजून घेऊच असे नाही. यासाठी एकत्र कुटुंबपद्धतीची नितांत गरज आहे. आजकाल मुले मोठ्या प्रमाणावर टेक्नोसव्ही झालेली दिसतात. सतत मोबाईल, टीव्ही, नेट इ. च्या जाळ्यात अडकून अॅडिक्ट झालेली असतात. आई-वडील त्यांच्या कामांच्या व्यापात गर्क असतात. त्यांचे जीवन देखील अत्यंत धकाधकीचे असते.
घरी आल्यानंतर आपल्या आई वडिलांचा खूप मोठा आधार आपल्याला मिळतो. आपण निश्चिंतपणे अनेक गोष्टी करू शकतो. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे त्यांचे लक्ष असते, त्यांना थोडा धाक, बंधने आवश्यक असतात. शिवाय मुलांना गोष्टी सांगणे, फिरायला नेणे दोनचार स्त्रोत्रे शिकवणे हे अगदी सहजच ते करतात .
कळत-नकळत असे चांगले संस्कार मुलांवर निश्चितच होतात. नातवडांच्या आजारपणात आजीबाईचा बटवा आणि अनुभव आपल्याला खूपच उपयुक्त ठरतात.
नाण्याला नेहमी दोन बाजू असतात. यादुष्टीने आजी-आजोबा नेहमीच बरोबर असतील असे सांगता येत नाही. नवीन पिढीची नवी आव्हाने पेलताना तरुणांची दमछाक होते. तंत्रज्ञान बदलते आहे, जीवन गतिमान झाले आहे. पूर्वीसारख्या बऱ्याच गोष्टी नवीन पिढी करणे काही वेळेस अवघड असते त्यावेळी घरातील जेष्ठांनी आमच्या वेळी नव्हते हो असे किंवा आम्हीसुधा खूप कष्ट केलेत पण नाटकं नव्हती असे म्हणण्यापेक्षा नवीन पिढीला अधिक समजून घ्यायला हवे. उलट यांना आपल्या मानसिक आधारची गरज आहे. हे लक्षात ठेवून पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार केला पाहिजे, कारण तीच काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार बदल करून स्वत:चे हट, स्वतःचा आदर दुराग्रह बाजूला ठेवून स्वतःचा आदर ठेवून घरातल्यांना आपण कसे उपयोगी पडू! याचा विचार हवा.
ज्येष्ठांनी आपली भूमिका हि मित्रत्वाची ठेवून मुलगा-सुनेच्या संसारात आपण जास्त न डोकावता इतर करता येण्यासारख्या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले तर ते त्यांच्या दुष्टीने अधिक चांगले मुलांसाठी संस्कारवर्ग, छंदवर्ग चालविणे, खेळघर, कथाकथन यासारख्या उपक्रमात सहभागी होऊन मुलांकडूनही काही शिकता येते का! याचा विचार करावा. आपला अधिक वेळ दुसऱ्यांना मदत करण्यात घालवणे शक्य असेल व झेपेल तेवढे पर्यटन केले तर त्यांचे आयुष्य अत्यंत निरामय व सुंदर पद्धतीने मला-नातवंडासोबत खचितच घालवता येईल. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते,
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोत नुसती नाती.
तेव्हा ज्येष्ठांनी व तरुणांनी नाती जपण्याचा प्रयत्न केला तरच घर घरासारखे वाटेल…….