Etule Kari Deva genius partly lies in his ability to transform the external world into its spiritual analogue.
इतुलें करीं देवा एकें हे वचन | समूळ अभिमान जाळीं माझा ||
इतुलें करी देवा एकें हे गोष्टी | सर्व सम दृष्टी तुज देखें ||
इतुलें करी देवा विनवितों तुज | संतचरणरज वंदी माथां ||
इतुलें करी देवां एकें हे मात | हृदयी पंढरीनाथ दिवसरात्री ||
भलतियाभावें तारी पंढरीनाथा | तुका म्हणे आतां शरण आलों ||
काय कीर्ती करुं लोक दंभमान | दाखीवी चरण तुझे मज ||
मज आतां एसें नको करुं देवा | तुझा दास जावा वांयाविण ||
होईल थोरपणे जाणीवेचा भार | दुरावेन दूर तुझ्यापायिं ||
अंतरीचा भाव काय कळें लोकां | एक मानी एका देखोवेखीं ||
तुका म्हणे तुझे पाय आतुडती | त्या मज विपत्ती गोड देवा ||