Dudhi Bhopla scene as a potential weight loss aid, the Nutri Health. Dudhi, also known as bottle gourd and lauki, is a bottle shaped,.
दुधी भोपळ्याचे दोन प्रकार आहे. एक हलका हिरवट रंगाचा व साल कोवळी साल असलेला हा चवी ला फार चांगला असतो. आणि दुसरा फ़ुगिए गोल व लांबट जास्त बियांचा त्याची साल साधारणत: जड असते. पण शक्यतोवर भला घेताना त्याला नख टोचून बघावे पटकन टोचल्या गेले तर घ्यावे.
या भोपळ्यांत जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.त्यामळे आहारात त्याला अति महत्व आहे. दुधी भोपळ्याची भाजी पथ्यकर असून ती पित्त व कफ नाशक आहे. हिचे गुणधर्म धातूवर्धक आहे. दररोज दुधीचा रस पिल्याने किंवा त्याच्या फोडी वाफवून खाल्ल्याने शरीरातील स्थूलता कमी होते.
मेंदूच्या विकासा साठी त्याची भाजी खाणे अत्यावश्यक आहे. भोपळ्याचा कीस करून तो डोळ्यांवर काही मिनिटे ठेवल्यास मेंदू शांत राहतो. पायातील भेगा किंवा तळपायांना आग होत असल्यास दुधीच्या वेलींचा रस त्यावर चोळावा. किंवा त्याचा कीस पायांवर घासावा. भोपळ्याच्या बिया सुकवून त्याच्या आतील गर खाणे चांगले असते कारण ते फार पौस्टिक असते. भोपळ्याची भाजी किंवा त्याचे पकोडे हे सार्यांनाच आवडतात तसेच भोपळ्याची खीर,हलवा,किंवा त्याचे रायते सुद्धा बनवतात. हे सर्वच पदार्थ शरीराला चांगले आहेत.