Ayurveda (Sanskrit Āyurveda आयुर्वेद, “life-knowledge”; English pronunciation /ˌaɪ.ərˈveɪdə/) or Ayurvedic medicine is a system of Hindu traditional medicine of Vedic tradition, is native to the Indian subcontinent, and is a form of alternative medicine.
पाच हजार वर्षापूर्वीच्या आयुर्वेदाने आता पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली आहे, दशदिशांत आयुर्वेदाला मान्यता मिळाली आहे आणी जगाच्या नकाशात मानाचे स्थान मिळवले आहे, आयुर्वेदाच्या इतिहासातले हे पान सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. एक निशब्द क्रांती झाली आहे एक नवे पर्व, युगाचा प्रारंभ झाला आहे. आणी हे युगप्रवर्तक कार्य केले आहे, डॉ. पी. एच. कुलकर्णी यांनी, त्यांचे विध्यार्थी आणी सहाय्यकांनी आयुर्वेदाचा ध्वज पूर्ण विश्वात नेला आहे. आयुर्वद उपचार, प्रशिक्षण, संशोधन, प्रचार, प्रसार, सप्तखंडात झाला आहे, या यज्ञाचे अध्यर्यू आहेत डॉ. पां. ह. कुलकर्णी. आयुर्वेद महर्षी आणी लोकगुरू असलेले डॉ. कुलकर्णी हे आयुर्वेद्मय व्यक्तिमत्व आहे.
एकाच आयुष्यात अनेक आयुष्य ते जगत आहेत. त्यांच्या माया पद्मावती श्रद्धाळू कवयित्री होत्या, सरस्वती, अन्नपूर्णा आदिमातेचे साक्षात रूप होत्या. निरंतन प्रयत्न, जीवनावरचे प्रेम अतिशय सुसंस्कृत त्या होत्या, सेवा, श्रद्धांची प्रेरणा त्यांनी आपल्या पुत्राला दिली. त्यांचे वडील श्री. हरिभाऊ एखाद्या वटवृक्षाप्रमाणे सर्वांना छत्रछाया आधार देणार होते ते कर्मयोगी, साधुवृत्तीचे होते. सर्व समाजाशी त्यांची जीवाभावाचे नाते होते, मन शुद्ध होते. त्यांनी अडती चे काम केले. आयुर्वेदिक औषधांचा व्यवसाय केला. त्यांच्या घरात अनाथाश्राय, वृद्धाश्रय, रुग्णालयही होते. ते क्रियाशील सेवाभावी तत्वनिष्ट होते.भक्ती, प्रीती, संस्कृतीचा संगम त्यांचा घरात होता. घरात सणवार साजरे होत, श्रम, प्रतिष्ठा होती. वडील त्यांना म्हशीची सेवा करायला लावत.
लहानपणापासून डॉक्टरांचा स्वभाव सतत प्रयत्न करण्याचा होता. आज डॉक्टरांची इतके रूपे आपल्याला दिसतात. डॉक्टर एक व्यक्ती नसून एक संस्था आहेअसे वाटते. ते डॉक्टर आहेत, गुरु, संशोधन, औषधनिर्माता, समाजसेवक, कवी, लेखक, संपादक आहेत, भाषांतरकार आहेत, आयुर्वेदाचे प्रचारक, प्रसारक आहेत, संघटनकुशल नेता आहे. उत्कृष्ट समन्वयक आहेत, यशस्वी ‘व्यावसायिक’ आहेत, आयुर्वेदाबरोबर संगीत तत्वज्ञानाचा व्यासंग आहे. जगातल्या सत्तर देशांचा प्रवास त्यांनी केला. शेकडो व्याख्याने दिली, त्यांच्या व्यक्तिमत्वाला नम्र विनोदाची किनार आहे. सतत कार्यरत असलेले ते कर्मयोगी आहेत, अनेक शोधनिबंधाचे लेखक, मार्गदर्शक आहेत त्यांच्या विध्यार्थांनी पी. एच. डी. पदव्या प्राप्त केल्या आहेत,अनेक पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत, जीवनावर त्यांचे प्रेम असल्याने ते रसिक, श्रोता, प्रेक्षक आहे, कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत. अनेक उपक्रमांचा विक्रम त्यांनी केला आहे, कार्यशाळा, शिबिरे आयोजीत केली आहेत, अनेकांना पुरस्कार दिले आहेत, सम्मान केले आहेत, सर्व पंथीमध्ये बंधुभावांचे नाते त्यांनी निर्माण केले आहेत, वैश्विक पातळीवर त्यांच्या कार्याचा सम्मान झाला आहे. कुटुंबवैध संकल्पना पुन्हा व्हावी म्हणून ते कार्यरत आहेत . आयुर्वेद जीवनशैलीचे पुरस्कर्ता आहेत, मन विशाल आहे. वर्तमान, भूत, भविष्याचे चिंतन करतात. श्रद्धा हे त्यांचे वैशिष्ट्य आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ते जगाशी संपर्क साधतात. संघशक्तीवर त्यांचा विश्वास आहे, आयुर्वेदामुळे भारतात, जगात आरोग्य महासत्ता निर्माण होईल असे ते मानतात.
त्यांची आयुर्वेद व इतर विषयांवरची दीडशेहून अधिक पुस्तके अधिक प्रसिद्ध झाली आहेत. चरक सहित, सुश्रुत सहितेचा मराठी, इंग्रजीत अनुवाद केला आहे. दीर्घायु हे दिवाळी वार्षिक सातत्याने तीस वर्ष ते चालवत आहेत आणी दीर्घायु हे दिवाळी वार्षिक सातत्याने तीस वर्ष ते चालवीत आहेत आणी दिर्घायु इंटरन्यशनल हे आयुर्वेद विचार, संशोधनाला वाहिलेले इंग्रजी वैश्विक त्रेमासिकही ते चालवतात त्यात देशविदेशातील आयुर्वेद तज्ञांचे संशोधनपद लेख, अनुभव, विचार कार्य असते. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक मोठ्या पदावर काम केले, त्या संस्थाच्या आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी विकास केला, स्वतः बरोबर स्वन्स्थेलाही मोठे केले. औषधीवनस्पतीचे वितरण, पारिचारिका, प्रशिक्षण, निबंधस्पर्धा असे उपक्रम तर कितीतरी आहेत. त्यांच्या व्यक्तीमत्वात पारदर्शकता, परिपूर्णता, परिपक्वता आहे. ते उत्तम श्रोता आहेत. रूगणांचे, विध्यार्थ्यांचे, सहकार्यांचे आणी सर्वांचे ऐकतात, सर्वांचा मान ठेवतात. त्यांचे बोलणे, प्रेरणा, उत्तेजना देणारे असते. आयुष्यात गंभीर व्याधींनी ग्रासले, अनेक सत्वपरीक्षापार पाडाव्या लागल्या, आरोग्य प्रत्यारोप, टीका झाल्या तरीही सर्व प्रसंगातून ते सोन्यासारखे उजळून निघाले.प्रीयजनांचा चीरवीयोग सहन करावा लागला, अनेक चांगल्या गोष्टी करताना विरोध झाला पण धैर्याने त्यांनी या सर्वांना तोंड दिले. पैशाचे महत्व आणी मर्यादाही ते जाणतात.
आयुर्वेद शिक्षण केल्यावर पुण्याच्या कोथरूड भागात त्यांनी व्यवसाय सुरु केला. कोथरूड पुण्याजवळ असूनही ग्रामीण मागासलेला भाग होता त्या भागात डॉक्टर नव्हते, वस्ती विरळ होती. आसपासच्या खेड्यातील रुग्णांची रांग लागत असे; गावात दुषित पाणी, रोगराई, अस्वच्छतता होती, डॉक्टरांनी
गावाचे पालकतत्व घेतले, आरोग्यशिक्षण दिले योग्य उपचार दिले, माणसाबरोबर पशुचेही ते डॉक्टर झाले. स्वतः त्यांनी शिक्षणक्षेत्रात, वृत्तपत्र क्षेत्रात काम केले. दवाखाना हि समाजसेवा होती, स्वतः अनेक डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले.
ते जितके डॉक्टर आहेत, तितकेच गुरु आहेत, अनेक विध्यार्थांना त्यांनी घडवले,आयुर्वेदाला ते वैश्विक वारसाड मानतात. प्राचीनकाळी आयुर्वेदात सतत प्रयोग संशोधन होत असे ती परंपरा खंडित झाली डॉक्टरांनी आधुनिक संशोधनपद्धती आयुर्वेदात आणून आयुर्वेदाला विश्वमान्यता प्राप्त करून दिली. आयुर्वेदग्रंथाने इंग्रजीत भाषांतर केले, संशोधनाचे दालन खुले केले. संगणक नवी संपर्क, प्रसारण माध्यमांसाठी शास्त्रीय रुप आयुर्वेदाला दिले. त्याचे धर्म, दैवी चमत्कारिक रूप त्यांनी दूर केले. आधुनिक वैधकाशी त्याने नाव जोडले. संशोधन सुरु केले. हृदयविकार, अस्थिविकार, स्त्रीविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, लट्ठपणा, मनोविकार, निरनिराळ्या आयुर्वेदिक औषधी, भस्मे यावर संशोधन केले. अनेक संस्थान त्यांनी निर्माण केल्या. ‘सकाळ’ वृत्त पत्रात काम करतांना विदेशी तज्ञांशी परिचय झाला. त्यातून परदेशात आयुर्वेदाचा प्रसार करण्याची कल्पना निघाली. तो आयुर्वेदाचा इतिहासातला अमूल्य क्षण होता. काहींचे म्हणणे होते, देशात आयुर्वेदाचा आधी प्रसार करावा नंतर परदेशात जावे. डॉक्टरांचे म्हणणे होते, परदेशात आयुर्वेदाला लोकप्रियता मिळाली वर इथे आपोआप प्रसार वाढेल, जशी योग कल्पना प्रथम परदेशात प्रसिद्ध झाली नंतर नंतर येथे जनमानसाने स्वीकारली. अन्य डॉक्टर सहकार्यासोबत त्यांनी देशविदेशात आयुर्वेदाचा प्रसार सुरु केला. जागतिक परिषदा भरवल्या. डॉक्टरांच्या पुस्तकांची इंग्रजी, इतर भाषांमध्ये भाषांतरे झाली. आपल्याबरोबर अनेक सहकारी, विध्यार्थ्यांना त्यांनी परदेशात नेले. परदेशी रुग्ण, वैधकीय व्यवस्था यांच्या यांनी अभ्यास केला. तिथे प्रसिद्धी शंकानिसरण केले, व्याख्याने दिली. तिथे पत्रद्वारा अभ्यासक्रम सुरु केला. प्रथम इटलीत आयुर्वेद विद्यापीठ स्थापन झाले. ऑस्ट्रेलियातल्या आयुर्वेद स्कूलमध्ये आयुर्वेदिक संशोधन होते. पंचकर्म नाडीपरीक्षा यांचा अभ्यास होतो. तिथे रुग्णांना ते तपासतात, योग्य सल्ला देतात. सर्व वनस्पती भारतातून नेणे कठीण असल्याने दक्षिण अफ्रिकेतील वनस्पतीवर संशोधन सुरु केले. अनेक स्त्री वैधकही तिथे कार्यरत आहेत. अमेरिकेत अनेक रूपांनी प्रचार, प्रसार, प्रशिक्षण होते. अंटार्टिकांच्या बर्फाळ प्रदेशातही आयुर्वेदिक उपचार घेतले जातात. गायत्री मंत्रही म्हटला जातो. तिथे आयुर्वेदिक उपचार चालतात, अभ्यासक्रम आहेत. फ्रान्समध्ये आयुर्वेद, सल्ला, सेमिनार यांचे आयोजन केले जाते. आयुर्वेदिक मसाज तिथे लोकप्रिय आहे. जर्मनी हा इतिहासकाळापासून आयुर्वेद्प्रीय देश आहे, इथले अनेक वैध तिथे स्थायिक झाले आहे. तिथे आयुर्वेदिक दवाखान्यांचे उद्घाटन डॉक्तरांनी केले आहे. आरोग्य मार्गदर्शन ते करतात, या सर्वांमागे डॉक्टरांची प्रेरणा आहे. त्यांनी स्वतःवर सत्तरहून अधिक देशात भ्रमंती केली आहे. हॉलंड, हॉगकौंग, इंडोनेशिया, इस्त्राईल, आफ्रिका, मलेशिया, मॉरीशस, न्युझीलंड, सिंगापूर, साम्यवादी देश, स्पेन सर्व देशात डॉक्टर त्यांचे विध्यार्थी, सहकारी आणि स्थानिक वैध व सामान्यजन सर्वांनी आयुर्वेदाची ध्वजा आपल्या खांध्यावर घेतली आहे, वीस वर्ष हे व्रत धारण केलेले आहे. युनोने आयुर्वेदाला मान्यता दिलाने एक वेगळेस्थान प्राप्त झाले आहे. जिथे मानवी जीवन आहे तिथे आयुर्वेद पोहचला आहे, विश्वविजेता झाला आहे. कीर्ती त्रिखंडात पसरवली. अनोखे कार्य त्यांनी केले आहे. अखंड भ्रमणाने व्रत घेवून ही यशोगाथा निर्माण झाली आहे, असे हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व आहे.
डॉ. पी. एच. कुलकर्णी