लसीकरण : बालकापासून ते जेष्ठापर्यंत




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
Lasikaran
Lasikaran

Vaccination is the administration of antigenic material to stimulate an individual’s immune system to develop adaptive immunity to a pathogen. Vaccines can prevent or ameliorate morbidity from infection. This page provides resources that will help you with your decision to get vaccinated. If you are a health professional, Please read this article.

‘भारत माझा देश आहे. मी भारतीय आहे !’ हे वाक्य लिहितांना ऊर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा माझ्या देशातीआरोग्य विषयाकडे मी पाहू लागतो तेव्हा मला भारतीय अधिकारांची, त्यांचा आरोग्याची खरच काळजी वाटू लागते. माझा देश लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कदाचित २०३० साली तो जगातील प्रचंड लोकसंख्या असलेल्या नंबर एकचा देश असेल. अमेरिका (USA) आपल्या देशापेक्षा क्षेत्रफळाने तिप्पट मोठी आहे; पण तिथली लोकसंख्या भारताच्या १/३ पट आहे. आज भारताची लोकसंख्या आहे १२७ कोटी ! इतरही महत्वाचा बाबी आहेत; त्यात समाजात अज्ञान, कमी शिक्षण, दारिद्रय, शोषण, दुर्लभ, अनारोग्य, साथीचे आजार, पिण्याचे पाणी अयोग्य, गर्दी, शहरांचा बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे झालेला झोपडपट्टीचा प्रश्न, रोगप्रतिबंधक गोष्टीचा अभाव, दुष्काळ, अवर्षण, कधी कधी पुनग्रस्ताचे हाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, नानाविध अडचणींनी निर्माण होण्याऱ्या अडचणी. निर्वासित नेपाळी, बांगलादेशी, नागरिक, देशाचे एकत्व, अखंडत्व खिळखिळे करतात. अशा वेळीस देशातील व्यक्तींच्या आरोग्याच्या प्रश्न बिकट होऊन बसतो. त्यांना योग्य मार्गदर्शन व आजरामध्ये योग्य सल्ला मिळणे गरजेचे असते.

         आपल्या समाजात जन्मापासून मृत्युपर्यंत निरनिराळे आजार उदभवून त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. ती व्यक्ती विकलांग होते; अथवा त्यात दगा होऊ शकते. यामध्ये संसर्गजन्य आजारांचा खूप मोठा वाटा आहे. १६ आजारांवर जे संसर्गाने होऊ शकतात, त्यावर शास्त्रज्ञांनी अविरत प्रयत्नांनी रोगप्रतिबंधक लस शोधल्या आहेत. जर या लसी, योग्य वयात योग्य व्यक्तीस दिल्यास संसर्गजन्य आजारापासून वाचविण्यास मदत होते, त्यामुळे कुटुंबाला व पर्यायाने समाजाला संरक्षण मिळून तो आजार समूह नष्ट होऊ शकतो. याचे उदाहरण म्हणजे देवीचा आजार (Small pox) – जागतिक आरोग्य संघटनेने १९६७ – १९७७ या कालावधीत राबवलेल्या ममोहेमितून जगातून हद्दपार होऊ शकला. पोलिओ बाबतही हीच स्थिती आहे.आपल्या देशात लसीकरणाची चळवळ चांगली रुजली, त्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण घटून समाजाची आरोग्यक्षमता निश्चित वाढली आहे.

     भारतामध्ये १९७८ साली बी. सी. जी, त्रिगुणी, धनुर्वात, पोलिओ, विशमज्वराची लस; घटसर्प धनुर्वात (DT) याची लस – ‘मुस्कान एक अभियान’ हा प्रकल्प बिहारमध्ये २००७ साली राबविला, यात सरकारी, खाजगी, स्त्रियांच्यावर काम करण्याऱ्या संस्था व राजकीय पाठबळ घेऊन लसीकरण मोहीम १२-१३ महिन्यांच्या मुलात राबविली. २००५ साली बिहारमध्ये लसीकरणाचे प्रमाण १९ टक्के होते; या प्रकल्पामुळे ते ४९ टक्के झाले.

     अशा सहा लसींचा कार्यक्रम (EPI:Expanded Programme of Immunization) मुलांसाठी सुरु केला. नंतर या प्रकल्पामध्ये गोवर प्रतिबंधक लस देण्यात सुरुवात केली. १९८५ मध्ये (Universal Immulization Programme ) भारत सरकारने सुरु केला. एवढे प्रयत्न करूनही लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यास कमी पडले. २००७ -२००८ साली केलेल्या पाहणीनुसार, राज्यातील लसीकरण खालीलप्रमाणे आहे: तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ, पंजाब येथे ८० टक्के, गोवा ९० टक्के, ओडीसा ६२ टक्के, बिहार ४१ टक्के, उत्तर प्रदेश ३० टक्के लसीकरण झाले आहे.

       खर तर लसीकरणास १०० टक्के पाठिंबा मिळावयास हवा. तो का मिळत नाही? यासाठी २००९ साली एक पाहणी केली, त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आले. या सर्व गोष्टीचा विचार केल्यास आपल्या देशात

१) पाल्यास गरजेचे वाटत नाही

२८.%
२) लसीकरणाबद्दल माहिती नाही २६.३%
३) लसीकरण ठिकाण माहिती नाही १०.८%
४) सोयीची वेळ नाही ८. ९%
५) लसीकरणाची भीती वाटते ८. १%
६) आई -वडिलांना वेळ नाही ६%
७) इतरांकडून चुकीचा सल्ला ३%
८) लस परवडत नाही १. २%
९) लस उपलब्ध नाही ६,२%
१०) जागा अयोग्य ३.८%
११) प्रशिक्षित नर्स गैरहजर ३.९%
१२) लसीकरण घरापासून दूर २. १%
१३) प्रतीक्षात वेळ लागतो  २. १%
१४) सोयच नाही कारणे २. १%
१५) इतर कारणे ११.८%

 

 

सर्व व्यक्तींना लसीकरणाची सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मुस्कान एक अभियान ही लसीकरणाची मोहीम बिहार राज्यात राबविली जाते. अशा चळवळी देशभर राबविल्या पाहिजेत. आपला देश जर आरोग्यसंपन्न करावयाचा असेल तर आपण सर्व लसीकरणाचे फायदे पूर्णपणे समजून घेणे व त्याप्रमाणे लसीकरण करणे ही

 

१) आजार लसीकरणाची व्यक्ती
२)डांग्या खोकला बालक, वयात येणारी मुलं प्रौढ
३)घटसर्प बालक, वयात येणारी मुलं प्रौढ व्यक्ती
४)धनुर्वात बालक, यौवनावस्थेतील मुलं, प्रौढ व्यक्ती
५)पोलिओ बालक
६)गोवर बालक
७)गालगुंड बालक
८)जर्मन गोवर बालक
९)काविळ ब बालक
१०)हिमोफिलस टाईप बी बालक
११)इंफ्लुएझा बालक, यौवनावस्थेतील मुलं, प्रौढ व्यक्ती
१२)कांजिण्या बालक
१३)न्युमोकोकल जंतूसंसर्ग बालक, ज्येष्ठ नागरिक
१४)मेणींगोकोकल आजार बालक, यौवनावस्थेतील मुलं
१५)रोटाव्हायरस संसर्ग १ वर्षाचा खालील मुलं
१६)ह्युमन प्यपिलोयाव्हायरस युवती स्त्रिया
१७)संसर्ग
१८)नागिण वयस्क व्यक्ती
१९)क्षय  बालक

 

भारतीय बालरोगतज्ञ संघटनेने जन्मापासून १८ वर्षापर्यंत देण्याचे रोगप्रतिबंधक – लस – वेळापत्रक

         वय

               लस

 जन्मतः बी. सी. जी, पोलीओ(तोंडावाटे)-० ; कावीळ ब (१)
६ आठवडे त्रिगुणी लस, मेंदूज्वर, पोलिओ (इंजेक्शन-२), रोताव्हायरस लस, न्युमोकोकल लस+ कावीळ ब (२)
१० आठवडे त्रिगुणी लस, मेंदूज्वर, पोलिओ (इंजेक्शन-२), रोताव्हायरस लस, न्युमोकोकल लस
१४   आठवडे त्रिगुणी लस, मेंदूज्वर, पोलिओ (इंजेक्शन-२), रोताव्हायरस लस, न्युमोकोकल लस
६ महिने कावीळ ब (३); पोलिओ (तोंडावाटे)-१,इंफ्लुएंझा लस (१)
 ७ महिने इंफ्लुएंझा लस (२)
९ महिने गोवर प्रतिबंधक लस (१), पोलिओ (तोंडावाटे)-२
१२ महिने कावीळ अ ला डोस
१५  महिने न्युमोकोकाल बुस्टर, गोवर- गालगुंड -जर्मन गोवर प्रतिबंधक लस, कांजिण्या लस
१६ ते १८ महिने ट्रिपल बुस्टर डोस (१), मेंदूज्वर, पोलिओ
१९   महिने कावीळ अ १ व डोस, इंफ्लुएंझा बुस्टर डोस
२ ते ३ वर्ष टायफाईड (विषमज्वर) लस
४ ते ६ वर्ष त्रिगुणी लस,गोवर, गालगुंड, जर्मन गोवर, कांजिण्या, टायफाईड, २ रा बुस्टर
१० ते १२ वर्ष त्रिगुणी लस (कमी ताकदीचे ); धनुर्वात, घटसर्प लस -नंतर दर दहा वर्षांनी
ह्युमन प्यापिलोमा व्हायरस ३ डोसेस (०, १ ६ महिने)

 

काळाची गरज आहे. त्यावरील संशोधनास सर्वतोपरी सहकार्य घेऊन, सामाजिक,आर्थिक,राजकीय, जागतिक,स्थरावरील आरोग्य संस्था यांची मदत घेऊन हे कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे.

         आई – वडील, वैधकीय व्यावसायिक, सरकारी रुग्णालय औषध लसीकरण करण्याऱ्या औषध कंपन्या, संस्था, लशीच्या निर्मितीत सहभागी झालेले शास्त्रज्ञ व प्रयोगशाळा या जगात घडण्य़ाऱ्या नवनवीन बदलाबद्दल व लासीकरणाबाबत अत्यंत जागरूक असतात. श्वान दंश, यलो फिवर, जापनीज बी इन्क फ्यलायटीस यांसारख्या आजारांवर सुद्धा लस उपलब्ध करून त्या त्या आजारावर टाळण्यासाठी त्या दिल्या जातात.

       जगात मिळत असलेल्या सर्व लासी हल्ली भारतामध्ये मिळतात ; पण काही लसी सामान्यजणांच्या आवाक्याबाहेर आहेत. अजून महत्वाच्या लसी करणात आपण कधी पडतो. त्यामुळे आधुनिक लसी देणे दूर राहणे. भारतीय मुलांच्यात सरासरी ५४ टक्के मुलांना लसीकरण मिळते. जवळजवळ निम्मी मुले लसीकरणापासून वंचित राहतात, त्यांना या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळत नाही.

       लसीकरण हे सर्व वयातील लोकांना अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाच्या, समाजाच्या दृष्टीने वरदान आहे. आरोग्यावरील खर्चात बचत होते. अमेरिकन (USA) केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, लसीकरणात जर १ डॉलर खर्च केला ; तर त्यामुळे होण्याऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते व कुटुंबाचे २ ते २७ डॉलर वाचतात.

१९ वर्षाखालील व्यक्तीसाठी रोगप्रतिबंधक लसीकरण वेळापत्रक

लस

वय १९ -१४  वर्ष २२-२६

२७-४९ वर्ष

५०-५९

६०-६४ वर्ष

६५ वर्ष

धनुर्वात
कांजिण्या
ह्युमन प्यापिलोमा ३ डोसेस
व्हायरस व्ह्यक्सिन १ डोस
नागिण (shinqle) २ डोसेस
गोवर -गालगुंड-
जर्मन गोवर २ डोसेस
न्युमोकोकल व्ह्यक्सिन १ ते २ वेळ २ डोसेस १ डोसेस
मेणींगोकोकल व्ह्यक्सिन १ किंवा अधिक डोस
कावीळ अ २ वेळा २ डोस
कावीळ ब ३ डोस
हिमोफिलस इंफ्लुएंझा 
टाईप बी लस १ ते ३ डोस

 

       काही वेळा वरील रोगप्रतिबंधक लस घेणे टाकावे लागते. शक्यतो गरोदरपणा, रोगप्रतिकारबंधक, प्रतिकारशक्ती क्षीण झाली असल्यास, एच. आय. व्ही. ची बाधा झाल्यास, कांजिण्या विरोधी लस, नागिण विरोधी लस, गोवर, गालगुंड, जर्मन गोवर प्रतिबंधक लस देऊ नये.

       लसींची सुरक्षितता :

१)वापरल्या जाण्याऱ्या लसी सुरक्षित असतात. FDA ने लायसन्स दिलेले असते. लस बाजारात येण्यापूर्वी सर्व प्रकारे चाचणी घेतलेली असते. CDC व FDA यांचे लसीकरणाचे नियंत्रण असते.

लसीकरणाचे काही परिणाम अत्यंत सोम्य असतात, काही दिवसात ते बरे होतात ; उदा. इंजेक्शनच्या जागी दुखणे, लाल होणे, सूज होणे,गंभीर परिणाम   क्वचितच असतात.

       लसीकरण हे तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास अत्यंत गरजेचे असते.

प्रवास व लसीकरण : लहान मुल असोत, अगोधार स्त्री असो, कुठल्याही वयाची व्यक्ती मग ती स्त्री असो वा पुरुष, प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ज्या देशात जाणार आहात तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथे असलेल्या आजारांविषयी जाणून घेणे गरजेचे असते. तुम्हास जर प्रतिबंधक लसीकरण झाले असेल तर तुम्हास आजार होणार नाहीत व तुम्ही इतरांना किंवा तुमच्याबरोबर प्रवास करण्याऱ्या सहकाऱ्यांना धोका निर्माण करु शकत नाही.

       आजकाल जगभर प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढती आहे. कयलिफोर्नियातील आजार असो (Swine flu) किंवा दक्षिण आफ्रिकेतला   इबोला व्हायरस असो, चोवीस तासात जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात फैलावू शकतो. प्रवासास निघणाऱ्या व्यक्ती सहसा डॉक्टरांच्या सल्ला किंवा योग्य   ते लसीकरण घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारा आजार हा त्यांचा वयावर, त्यांनी घेतलेल्या लसीकरणावर, त्यांची आताची निरोगी तब्बेत, प्रवासाचे दिवस व प्रवासाचे आकार यावर अवलंबून असते. रोगप्रतिबंधक नस घेतली असो वा नसो ; तरी रोगप्रतिबंधक उपाय कसोशीने पाळावेत.

           नेहमीची रोगप्रतिबंधक लस त्या – त्या वयोगटातील व्यक्तींनी घेतली असल्यास प्रवासापूर्वी घेण्याच्या लसीकरणात खूप फायदा होतो. त्यांना खालील लसींपैकी त्या देशात असलेल्या आजारांच्या प्रादुर्भावाप्रमाणे लस घ्यावी लागते.

१) कावीळ अ लस (Hepatisis A)

२) विषमज्वर लस (Typhiod)

३) श्वानदंशावरील लस (Rabis)

४) कॉलरा

५) जापनिज इनकफ्यलायटीस

६)Tick- born encephalitic

७) मेंदूज्वर (Menigococcal Vaccine)

८) पीतज्वर (yello fever)

         ज्या प्रवाशांची रोगप्रतिकार शक्ती अशक्त (कमी) असते. (Immuno-comprised) अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रवासास निघावे. उदा.- एच. आय. व्ही, एड्स बाधित, यकृताचा दाह (Hepatisis इ.), स्टिरॉईड औषध चालू असताना, क्यण्सर थेरपी चालू असताना, प्लीहा काढलेली असल्यास, रक्तातील कॉम्प्लिमेंटची कमतरता असल्यास लसीकरण जरुरीचे असते.

       गरोदरातील स्त्रियांना inactive viral vaccine, bacterial vaccine किंवा toxoid यासारख्या लसीकरणामुळे कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे या प्रकारातील लसीकरण करून त्या जगात प्रवास करू शकतात. इंफ्लुएंझा सारख्या आजाराची लस घेऊन त्या प्रवास करू शकतात.

        ज्या लासी घेतलेल्या आहेत त्याची आंतररास्ट्रीय रोगप्रतिबंधक लसीकरणाचे पत्रक जवळ बाळगावे.

   भविष्यकाळाचे आव्हान :

         विसाव्या शतकात जी लस शोधली गेली त्यामुळे, बालकात होण्याऱ्या संसर्गजन्य आजारांवर त्यांचा खूब उपयोग झाला. तरीसुद्धा कावीळ ब लस (Hepatitis B vaccine), नागिणी विरुद्धची लस (Zooster Vaccine), ह्युमन प्यापिलोमा व्हायरस लस (HPV) यामुळे तरुणात, प्रौढ व्यक्तीमध्ये होण्याऱ्या दुष्परिणामावर ही योग्य ती मात्रा लागू पडली आहे. त्यांचे फायदे दिसून आले.

         रोगप्रतिबंधक लस शोधयात्रेत निरनिराळ्या लसींचा शोध व त्यांचे फायदे सर्व व्यक्तींना निच्छित मिळतील. मलेरिया, डेंगी ह्या आजारावर लस शोधणे चालू आहे. इन्सुलिनवरअवलंबून असलेला मधुमेह, निकोटीनची व्यसनधीनता (Nicotine addiction), अल्झायमरस या आजारांवर लस शोधण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत. या संशोधनात डी. एन. ए, व्हेक्टर व पेप्टाईड व्हयक्सिन ही अग्रक्रमावर आहेत. लसीकरणाच्या तंत्रातही बदल होत आहे; उदा. Transdeemal, od administration.

           या सर्व उपकरणांना शास्त्रज्ञांना बळ मिळो व या सर्व व्यक्तीच्या आरोग्यात निश्चित होणाऱ्या सुधारणांना अधिक शक्ती मिळो, यास आपण मनःपूर्वक शुभेच्छा देऊ.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu