‘प्रयत्न वाळूचे कण रगडीता’




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

God created us for this specific purpose, human are that spotless to be in the other non- intellectual and emotional seriousness only by the silent life of the noble purpose is to bring about a God. The softness of the heart and brain power on the basis of , intelligence and intense luminosity, like the aroma of philanthropy had in mind that human life is worthwhile, and will not be . Read this article on how your Attempt are important.

‘प्रयत्नवाद’ ‘जीवनोन्नती’

Prayatn Waluche Kan Ragdita
Prayatn Waluche Kan Ragdita

सर्वगुण संपन्न असा मानव निर्माण करण्यामागे ईश्वराचा विशिष्ट असा हेतू असला पाहिजे कारण ईतर सजीवांमध्ये नसलेली बौद्धिक व भावनिक विचारशीलता फक्त माणसालाच देऊन त्याचा जीवन विकास घडवून आणण्याचा सृष्टीसर्जकाचा हेतू उदात्त आहे. आणि बुद्धी या शक्तीच्या जोरावर हृदयात कोमलता, बुद्धीत प्रखर तेजस्विता आणि मनात परोपकाराचा सुगंध दरवळत ठेवला कि, मानवी जीवनाचे सार्थक झाल्या शिवाय राहणार नाही. ‘धियो विश्र्वा विराजती’ या उक्तीप्रमाणे बुद्धीच्या बळावर जगाचे शासन चालविण्यासाठी आपल्या बुद्धीला सकस विचारांची जोड असायला हवी, यामुळे दृष्टीकोन बदलतो श्रद्धा व भावना डोळस बनतात व मानवी उत्कर्ष साधला जातो. बुद्धिवादाच्या भ्रामक कल्पना गोंजारून आणि कर्तव्याचा अहंकार बाळगून खऱ्याजीवन उन्नतीचे ध्येय प्राप्त होणार नाही.

बुद्धीच्या गर्भात निपजनारा डोळस विचारच मनाला संस्कारी, वेद्नाशील व प्रतिकारक्षम बनवितो आणि मानसिक दृढता प्राप्त करून देतो. मन व बुद्धी हे शरीराचे चालक व वाहक आहेत त्यांची पारदर्शी वृत्ती व जिवंतपणा जिवनविकासाचा मार्ग प्रशस्त करू शकतो. भौतिक जीवनात रममाण होणारी व्यक्ती मन व बुद्धीच्या जडणघडन कडेदुर्लक्ष करीत असते.

मनात प्रसवनाऱ्या संकल्पनांचा, विचारांचा जीवन घडविण्यात फार मोठा वाटा असतो. जीवनध्येयाप्रती सतत जागरूकता राहावी. यासाठी निराशेची मरगळ मनातून अजिबात झटकून टाकावी लागते. विवेकबुद्धीच्या जोरावर हि क्रिया सतत पार पाडता येते. परंतु त्याकरिता मनात निग्रहीवृत्ती असायला हवी!

जीवन कल्याणाची अभिलाषा मनात अनंत तेवत राहावी या करीता वेदांचा भव्यदिव्य संदेश आचरणात आणला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर मानव धर्माचा विकास व्हायला पाहिजे. कृतज्ञतेचा सुगंध दरवळत ठेवावा.सुखात-दु:खात धैर्यशील आणि आश्र्वस्त राहावे. लाचारी,शूद्रता, आश्वस्तता, निस्तेजता असंतुष्टता यांना मनोनिग्रहाने दूर ठेवण्याचा मंत्र वेदांद्वारे प्राप्त होतो. आपली अस्मिता, आत्मगौरव, आत्मसम्मान जपण्याचे भान वेदांद्वारे मिळते.

दिव्य-भव्य नि विश्वात अतुलनीय असणारी भारतीय संस्कृती आज भोगवादामुळेच काळवंडलेली आहे. हे आपण बघतच आहोत ज्या संस्कृतीजवळ मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्येची सामाजिक, आर्थिक, नैतिक, अध्यात्मिक उकल करण्याचे सामर्थ्य आहे, व तिचेच आम्ही पायिक आहोत हा अभिमान प्रत्येकाने मनात बाळगून त्याचे पालन करायला पाहिजे.

पंथ, धर्म, संप्रदाय यांच्या दंद्वातून सु- संस्कृती ची सुटका झाली पाहिजे.आपल्या उन्नत व गौरव संपन्न संस्कृतीचे दर्शन विश्वाला घडवीण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सतपुरुष्यांनी मानवी कल्याणाची उत्कटता व उदात्तता जोपासली, व संत ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाचा व्यापक हेतू पासायदानातून जन समुदायाला समजावून दिलेला आहे.

भारतीय धर्म व संस्कृती सातासमुद्रापार नेवून स्वामी विवेकानंदांनी भारताला गौरविले तसेच विचार मनी बाळगून तेच जोपासायला पाहिजे.व देशाच्या उन्नतीचा उच्चांक ठेवला पाहिजे. धर्म व संस्कृती ची काळजी अहोरात्र वाहणार्या सत्पुरुश्यांची बरोबरी जरी करू शकत नसाल तरी निदान माणुसकी व परोपकारी वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न प्रत्येकाने निश्चित करायला हवा.

श्रद्धा, धर्म, संस्कृती मूर्ती पूजा यांचे चुकीचे संदर्भ लाऊन चित्तशुद्धीच्या नावाखाली आजकालचे बरेच संत म्हणवून घेणारे कुसंत मानवी कल्याणाचा मार्ग कलुषित करीत आहे,त्यांचा विरोध झालाच पाहिजे. भक्ती मार्गावरून चालणारा भाविक आज अंधश्रध्येच्या दलदलीत भरकटलेला आहे. मूर्तीपुजेची खरी संकल्पना व खरी श्रद्धा मागे पाडून दगडाच्या देवांना पूजण्याची जणू स्पर्धा समजून त्याचा उच्चांक गाठताना दिसत आहेत. मूर्तींना सोन्या मोत्यांनी जडवून देवीदेवतांना श्रीमंत दर्शविण्याचा प्रयत्न शुरू आहे. त्या नावा खाली भाविकांची चांगलीच फसवणूक व लुट होत आहेत. हे सर्व थांबवायला हवे. या करीता प्रत्येक मानवाने भक्ती श्रद्धा समजून घेतली पाहिजे. अंधश्र्द्धा मनातून काढून देव भक्ती-भावाचा भुकेला आहे हे समजून घ्यायला हवे.

मंदिरांची व त्यातील देवी-देवतांची संख्या वाढवून श्रद्धा वाढत नाही ‘चांगल्या-वाईटाची पारख करणारी दृष्टी प्राप्त व्हावी’ हीच डोळस श्रद्धेची खरी व्याख्या आहे. आज विविध आश्रमांतून कर्तुत्वाच्या निष्क्रियतेचा जो जप सार्वत्रिक निदर्शनास येतो, ती भोगाचीच दुसरी बाजू होय, यात योगाची कोणतीच लक्षणे दिसत नाही. श्र्द्ध्येचा गैर फायदा घेत अनैतिक कृत्यांना खतपाणी घालण्याचे काम काही आश्रमात होत आहेत त्यांचेच अनुकरण करण्याची कृती विनाशाच्या खाईत नेणारी आहे.

श्रद्धेची स्पटिक दृष्टी निर्माण करण्यावर भर दिला जावा.अंधश्रद्धेची बांडगुळ समाजातून हद्दपार व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे अगत्याचे आहे आत्मश्रद्धा जागृत करून कार्यनिष्ठा व जीवननिष्ठा जोपासली गेली पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रयत्नवादाला फार महत्व दिलेले आहे.

” ‘ दे रे हरी पलंगावरी’ हि वृत्ती मानवी अध:पाताला कारणीभूत आहे.’ म्हणून ” प्रयत्न वाळू चे कण रगडीता तेल हि गळे .” हेच सत्य आहे.

प्रयत्नवादच जीवनातून पलायनवाद, निष्क्रियता याचे उच्चाटन करू शकतो मानवी कल्याणाचे तत्वज्ञान निश्चितच क्लिष्ट नाही. सहज, सुलभ, परोपकारी वृत्तीने प्रामाणिक प्रयत्नांनी जगणे राहिले कि, जीवन उन्नतीचा मार्ग सहज समृद्ध होतो. प्रयत्न वादाला डोळस श्रद्धेची जड दिली कि, वैचारिक क्रांती आणि मानसिक परिर्वतनहि सहज शक्य होते. वैचारिक दुष्काळ असलेल्या या युगात संस्कृतीच्या यज्ञ ज्वालेवर आत्मउन्नतीची मशाल उजळवू या आणि जीवनात आनंद आणू यां!

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा