Mogalai Biryani :
If you are passionate for Biryani, then try Mughalai Biryani. Here is a recipes for Mughalai Biryani. Full of spices and Test must try Mughalai Biryani this time. It is lovely dish for non-vegetarians.
साहित्य :- एक किलो मटन, बासमती तांदूळ अर्धा किलो, आले लसून लाल मिरची यांची पेस्ट चवी नुसार, दही एक कप. पाच कांदे उभे कापून ब्राउन परतलेले, थोडा पुदिना, कापलेली कोथिंबीर एक वाटी दीड चमचा शहाजिरे कच्चे पावडर, एक चमचा सोपं कच्ची पावडर, गरम मसाला एक चमचा.
कृती :-
मटन स्व्च्छ करून साधारण तुकडे करून घ्यावे व त्याला वाटलेली आले-लसून पेस्ट व दही लावून मुरत ठेवावे.व नंतर त्याला परतून घ्यावे . त्यानंतर दोन ते तीन कप पाणी व चवी नुसार मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्यावे. त्यातील पाणी काढून भाताला वापरावे. एका पातेल्यात एक चमचा तूप घालून फोडणीत लवंगा दालचिनी दोन हिरव्यामिरच्या, घालून त्यात चवी नुसार मीठ, हळद घालावे व त्यात तांदूळ धुतलेले घालावे व भात शिजवून घ्यावा. शिजलेला भात मोकळा करून थंड करावा, कापलेले कांदे गुलाबीसर परतून त्यात शहाजिरे व सोपं पावडर, पुदिना, गरम मसाला एकत्रित करून थोडावेळ झाकून ठेवावा. जाडबुडाच्या भांड्याला तूप लावावे भात पसरावा त्यावर मटन पसरावा,पुन्हा भात पसरावा त्यावर तयार असलेला कांदे मसाला पसरावा नंतर लिंबाचा रस व रंग घातलेले दुध शिंपडावे. व त्यावर झाकण ठेवून किंचित वाफवून घ्यावे, व नंतर गरम वाढावे.