आयटी क्षेत्र आणि आयुर्वेद




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

IT sector is one of Health destruction sector. you cannot work for longer time. after few years you can face health problems. if you want to increase career time in IT you have take help of Ayurveda. Read how Ayurveda will helpful for IT professionals.

IT professionals and Ayurveda
IT professionals and Ayurveda

पण वेळेअभावी अभ्यंग रोज केला जात नाही. स्पा पार्लरमध्ये  जाऊन मसाज महिन्यातून एक दोनदा केला जातो. पण त्यापेक्षा रोज दहा मिनिटे वेळ देऊन अभ्यंग मिळणारा फायदा निश्चीतच जास्त असतो. दिनचर्येत व्यायामाचा अंतर्भाव हवाच. एका वैधकीय  निरीक्षणाअंती आढळून आले की या क्षेत्रातील ७० टक्के लोक व्यायाम करीत नाहीत. ३० टक्के व्यायाम करीत असतात. त्यामध्येही वजन वाढल्याने जास्तीत जास्त व्यायाम करून जिममध्ये जाऊन व्यायाम करून लवकरात लवकर वजन कमी करणारेच जास्त आहेत. व्यायाम करतांना काही नियम आवश्यक असते. जसे व्यायाम नेहमी अर्धशक्ती करावा,छातीवर, कपाळावर घाम येऊ लागला की व्यायाम बंद करावा. नियमित व्यायाम करणाऱ्याने जेवणात स्थिग्ध पदार्थ घ्यावेत. अजीर्ण झाले असतांना व्यायाम करू नये. इत्यादी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नाहीतर हद्रोगादी अनेक आजारांना निमंत्रण आहेच.

दिनचर्येचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे भोजन. नियमाप्रमाणे ताजे, गरम, सर्व रसात्मक, स्निग्ध, रुचकर व नियमित वेळेवर जेवणे आवश्यक आहे. पण यापैकी कित्येक नियम पाळले जात नाहीत. सुर्याप्रधान देश असल्याने सर्व व्यवहार सुर्याशी निगडीत असायला हवेत. या नियमानुसार सकाळचे जेवण १० ते ११ व रात्रीचे जेवण ६ ते ७ वाजेपर्यंत व्हायला हवे. दोन्ही जेवणात ६ ते ८ तासांचे अंतर आवश्यक आहे. पण कार्यमग्न ते   पण कार्यमग्नतेमुळे सकाळचे जेवण २-३ वाजेपर्यंत कधीही जेवणे, वारंवार तेलकट, तिकट पदार्थ खाणे, सोबत शीतपेय,  मिल्कशेप पिणे, वारंवार पावभाजी, भेड, वडा, पाणीपुरी,चायनीच असे विदाही पदार्थ सेवन करणे, कामाच्या थकल्याने वारंवार चहा, कॉफी सारखे उत्तेजक  पेय घेणे हे सारखे साखरे घडते. रात्री खर तर लघु भोजन असावे पण या उलट रात्री स्निग्ध प्रमाणत:जास्त जेवण तेही खूप उशिरा घेतले जाते. सकाळी नाश्त्याला वारंवार ब्रेड, अंडी, फळांचा रस, बिस्किटे, पोहे घेणे व त्यावर ताबडतोब दुध किंवा कॉफी असा आम्ल, लवण, मधुर, संयोग, नित्याचाच. मोड आलेल्या कडधा न्यात व्हिटय मीन, बी मिळते.मग रोजच असे विदाही पदार्थ घेणे. जास्त पाणी पिल्याने त्वचा चांगली राहते मग अतिरेकी पाणी पिणे, रात्री जेवणानंतर ताबडतोब  झोपणे या क्रिया वारंवार घडल्यावर पचनशक्ती मंद, विषम होणे साहजिकच आहे. परिणात: भूक न लागणे, अन्नपचन उशिरा होणे, पोटात तडस लागणे, फुगणे, उलट्या होणे, पोटात, छातीत आग लागणे, छातीत दुखणे, मलावलंब, डोके दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पुढे यातूनच आम्लपित्त, मधुमेह, हृ द्रोग, परीणामशूल, बीपी वाढणे, इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम सारखे आजार विशेषतः दिसायला लागतात. स्त्रियां मध्ये विशेष तः मासिक रक्तस्त्राव अतिप्रमाणात होणे, अनियमित होणे ही लक्षणे दिसतात.

चिन्ताज्वरो मनुष्यांना सुधां निद्रां बलं हरेता︱
रुप्मुत्सह्बुद्धीम श्री जीवित न च संशय: ‖

चिंतारूपी तापामुळे मनुष्याची भूक, झोप, बल, सोंदर्य, उत्साह, बुद्धी, संपत्ती यांची हानी होते आयुष्यही नष्ट होते. दैनंदिन जीवनातील ताण, स्पर्धा धावपळ, दुरावलेले नातेसंबंध यांचा सतत मनावर परिणाम होऊन मानसिक संतुलन बिघडते. सतत जास्त काळ हा ताण, चिंता त्याचबरोबर इतर मनोदोष जसे द्वेष, लोभ मत्सर हेही असले तर मग हे परिणाम मनोदायिक रोगांमध्ये परावर्तीत होतात. ‘अर्थ’ हे जगण्यासाठी आवश्यक असा साधनालाच साध्य मानून तेच एकमेव उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवल्याने, त्यासाठी तर मग आपले नातेवाईक, मित्र, घरदार सोडून अन्य दुसरा गावाला किंवा परदेशात जावे लागते. ऑफिसमधील तणावाबरोबरच आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक व्यावसायिक – कमी करण्यासाठी लागणारा कुटुंबातला , नात्यांमधला संवाद मात्र कमी झालाय. या सगळ्या गोष्टींचा, विसंवादाचा प्रकृतीवर परिणाम न झाल्यास नवलच ! मग थकवा येणे, भूक न लागणे, एकाग्रता काम होणे, कामाचा आनंद न मिळणे, चिडचिड, शकेखोरपणा वाढणे, अंग  दुखणे, झोप न येणे ही लक्षणे दिसू लागतात. दीर्घकाळ हे चक्र चालू राहिल्यास मग मधुमेह, हृद्रोग, स्थौल्य, अम्लपित्त, निद्राविकार, बीपी वाढणे, वंध्यत्व शुक्रदोष, मासिक पाळीच्या तक्रारी हे आजार उद्भभवतात. व्यवसाय म्हटलं की हे सगळ थोड्याफार प्रमाणात सहज करावे लागणार पण त्यासाठी काही सोपे उपचार केल्यास हे आजार सुसह्य होऊ शकतात किंवा टळू शकतात.

  • ऑफिसमध्ये काम घरी आणू नये.
  • कामाच्या ओढीने ऑफिसला जाणे तसेच घरच्या ओढीने लवकर घरी येणे.
  • घरी कामाच्या ठिकाणी सुगंधी द्रव्ये, फुले, यांचा वापर करावा.
  • अन्य उपचारामध्ये विशेषत: आपल्या आजाराची जी कारणे असतात. त्याचे परिवर्तण करणे महत्वाचे.
  • अन्य उपचारांमध्ये विशेषतः आपल्या आजाराची जी कारणे असतात त्यांचे परिवर्तन करणे महत्वाचे.

आठवडयातून तीनदा तरी नारायण तेल, बला तेल, यांनी अभ्यंक करावा.  सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा. चालण्याचा व्यायाम सर्वात्तम, पचनशक्ती संबंधित तक्रारीवर विशेषतः वज्रासन, पश्चीमोत्तानासन करावे. पाठदुखी, कंबरदुखी असताना भुजंगासन, मकरासन रोज केल्यास फायदा होतो. वारंवार उदभवणारा नेत्रशूल, नेत्रदाह असल्यास त्राटक करावे.

IT professionals and Ayurveda
IT professionals and Ayurveda

  वारंवार अजीर्ण होत असल्यास जेवताना हिंग्वाष्टक चूर्ण, समशक्रशक्ररा चूर्ण, शुंठी चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. मलावष्टंभ, मुळव्याध,भगंदर अशा तक्रारी असताना उपाशीपोटी २ चमचे साजुक तूप घ्यावे. जेवणात नेहमी चाकवत, चुका, पालकांची पातळ भाजी घ्यावी. दिवसभर कोमट पाणी घ्यावे. दोन्ही जेवणात फोडणी दिलेल्या वरणाचे पाणी प्यावे. पोळीसाठी कणिक भिजवताना १ -२ चमचे एरंडेल तेल त्यात घालावे. गंधर्व हरितकी, त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. १०-१२ काळ्या मनुका चावून खावा. प्रात:काली एक वेळा गरम पाणी प्यावे. रात्री २ चमचे एरंडेल शुंठी काढयात घ्यावे. स्थूल व्यक्तीमध्ये विशेषतः कोलेस्टेरॉल वाढले असताना प्रात:काली  थोडे आले, २ लसुण पाकळ्या मधाबरोबर घ्याव्यात. जेवताना आले किंवा लसुण, ओली  हळद, अल्प प्रमाणात खावी, हृद्रोगाचे प्रमुख कारण अपानवायू विकृती असते. हृद्रोग झाल्यावर महागडे औषधे घेण्यापेक्षा पूर्वीच तसे होऊ नये म्हणून सकाळ व संध्याकाळी जेवणापूर्वी भास्करलवण चूर्ण १/२ चमचा गरम पाणी व तुपाबरोबर घ्यावी.

तीव्र मानसिक श्रम जाणवत असल्यास संत्र्याचा रस व सैधव घ्यावे. कोहळ्याचा रस व मध प्रात: काळी घ्यावे. दुधीचा रस व मध घ्यावे. अम्ल पित्ताचा त्रास असताना शतावरी चूर्ण दीर्घकाळ दुध व तुपाबरोबर घ्यावे. दुधीचा रस व मध घ्यावे. अम्लपित्ताचा त्रास असताना शतावरी चूर्ण दीर्घकाळ दुध व तुपाबरोबर घ्यावे. ड्राय आय सिंड्रोम – डोळे कोरडे होणे, दुखणे, खाज होणे, आग होणे ही लक्षणे असताना विशेषत: अभ्यंग करावे, वाटाणे, छोले, मटर, ब्रेड, इटली, डोसा, मोड आलेले धान्य कच्चे खाणे,शिकरण खाणे टाकावे. प्रात:काळी २ चमचे गाईचे तूप, दुध, पाण्याबरोबर घ्यावे. तूप हे वातिपतघ्न आहे. वातमलमुत्राचे अनुलोमन करणारे आहे. अग्निवर्धक आहे. कफदोष व डोळ्यातील स्निग्धता वाढवणारे आहे. मज्जावर्धक आहे. वारंवार मलावरोधअसेल तर त्याचा परिणाम म्हणून डोळ्यातील स्निग्धता कमी होते, त्रिफळामृत,आमलकीसिद्ध घृत वैधकीय सल्लाने घ्यावे.

IT professionals and Ayurveda
IT professionals and Ayurveda

मान दुखणे, पाठ दुखणे या तक्रारीवर लाक्षादी गुग्गुळ, गोक्षुरादी गुग्गुळ, तुपाबरोबर घेणे, अणुतेलाने नस्य केल्याने या तक्रारीबरोबर डोळ्यांच्या तक्रारीही कमी होतात.  या क्षेत्रात आढळलेले विकार हे विशेषत: आग, मस्तिष्क, मन, नेत्र, संधि,स्नायू यांच्याशी संबंधित आहेत. या सर्वांवर उत्तम फायदा होणारा उपाय म्हणजे बस्तिचिकित्सा, मुळावरच घाव घातल्याने या चिकित्सेने मिळणारा फायदाही दीर्घकाळ मिळतो. अर्थातच हा उपाय व अन्य उपायही तज्ञ  वैधाच्या निदर्शनाखालीच करावेत. आयुर्वेदोक्त पंचकर्म ही चिकित्सारुग्ण  लक्षण, बल, काळ इत्यादींचा विचार करून केल्यास, वेळोवेळी, ऋतुनुसार शरीरशुद्धी केल्यास हे आजार उत्पन्नच होणार नाही किंवा झाल्यास त्यांची तीव्रताही कमी राहील.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा