Hyderabadi Biryani
Hyderabadi Biryani is very famous in India. This recipe is perfect for the home preparation. This blog will tell you ingredients and Procedure for coking Hyderabadi Kacchi Biryani. It require basmati rice, onion, garlic cloves, green chillies, curd and listed ingredients.

साहित्य ;- अर्धा किलो मटन, अर्धा किलो बासमती तांदूळ , तीन कांदे, लसून सात पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा शहा जिरे, पाच वेलची, तीन लवंगा, दोन इंची दालचिनी, एक इंची कलमी, तीन हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, एक कप दही, चार चमचे तूप, थोडे केशर आणि चवी नुसार मीठ.
कृती :- तांदूळ धुवून एक तास पाण्यात ठेवावे व नंतर निथळून घ्यावे,मटणाचे साधारण तुकडे करून घ्यावे.दही व मीठ एकत्रित करून ठेवावे व ते मटणावर ओतावे व एक ते दीड तास झाकून ठेवावे. थोड्या दुधात केशर घालून खलून घ्यावे.तूप तापवून त्यात लवंगा, दालचिनी, वेलची, शहाजिरे घालावे त्यावर कांदा पातळ कापून घालावा. कांदा लालसर झाला कि त्यात दह्यातील मटन घालावे.ते परतत राहावे दही संपून कोरडे झाले कि त्यावर तांदूळ घालावे. आले, लसून, मिरची व पुदिना ह्यांची वाटलेली गोळी तांदळात घालावी.चवी नुसार मीठ घालावे.शिजण्या करीता जरुरीचे गरम पाणी घालावे. घट्ट झाकण ठेवून मटन व भात शिजू द्यावा. नंतर त्यावर केशर घालावे बिर्याणीचे पातेले आधी तापविलेल्या ओव्हन मध्ये ठेवावे. बिर्याणी कोरडी झाली कित्यावर उकडलेल्या अंड्याचे काप करून त्यावर वाढावी.