त्वचाविकारांसाठी आयुर्वेद




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

According to Ayurveda, the skin has six layers, located not only superficially but extending to the deeper levels of the body. A skin disease is, mostly, rooted in the skill layers. There are many reasons for the skin disorders. read this blog post for how yoga is useful for skin disorders.

Ayurveda for skin disorders
Ayurveda for skin disorders

सौदर्य हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय आपण सुंदर दिसावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. सौंदर्याचा विचार करताना त्वचा, त्वचेचा रंग, उंची, केस, चेहरा, शरीराचा बांधा इ. घटकांना महत्वाचे स्थान असते; पण शरीराचा एकूण सौदर्यात सिंहाच्या वाटा असण्यारया घटकांपैकी चेहऱ्यापाठोपाठ त्वचेचा क्रमांक लागतो. चेहऱ्यांची त्वचा, तुकतुक्तीत, तजेलदार असण, त्वचेचा वर्ण चांगला असणे हे सौदर्याच महत्वाच लक्षण आहे. त्यामुळे सौदर्याच्या जोपासनेमध्ये त्वचा या घटकाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्वचा केवळ सौदार्याच्याच दृष्टीकोनातून नाही तर आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्वचा हा स्वास्थाचा आरसा आहे सुस्वास्थाचे प्रतिबिंब म्हणजेच निरोगी त्वचा शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ उमटणारे हे एक अद्वितीय माध्यम.

सुंदर, कांतिवान त्वचा असावी, वर्ण नितळ असावा अशी सर्वांचीच इच्छा झाल्यामुळे किंवा त्वचेच योग्यप्रकारे पोषण न झाल्यामुळे ही साधी अपेक्षा साध्य होत नाही. त्वचेसाठी बाजारात अनेक प्रकारची Cream, Lotions, Fairness Creams मिळतात. पण खरच अशा प्रसाधनांनी सौदर्य वाढते किंवा टिकते का? केवळ यांच्या जाहिरातबाजुला भुलून आपण यांच्या आहारी जावे की नाही याची आपण शांतपणे विचार केला पाहिजे व्यक्तीच्या त्वचेची नैसर्गिक स्थिती व्यवस्थित राहावी यासाठी काही मार्गदर्शन तत्वे आयुर्वेदाने दिली आहेत, जर आपण या तत्वाचे नियमित पालन केले तर महागड्या क्रीम व लोशनची आपल्याला गरजच पडणार नाही.

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांचे प्रमुख कारण आहे. चुकीची आहारपद्धती व चुकीची जीवनशैली, जी आपण नकळत आपल्या जीवनात अवलंबून असतो. त्वचानुसार होण्याची विविध कारणे आयुर्वेदात वर्णन केलेली आहेत. जसे अधिक प्रमजसे अधिक प्रमाणात द्रव व स्निग्ध पदार्थ खाणे, विरूद्ध गुणांचे पदार्थ एकत्रित करून घाणे जसे शिकरण, फ्रुट स्यलड, दही घालून भाज्या करणे इ. अति जड पदार्थ खाणे, नवीन धान्य खाणे, दही, मीठ, मासे यांचे अत्यधिक प्रमाणात सेवन करणे, मल, मूत्र, वेगांचे धारण करणे, भोजनानंतर लगेच व्यायाम करणे, सतत उन्हात भटकणे, उन्हातून आल्यावर श्रम केल्यावर लगेच थंड पाण्याने व्यायाम करणे इ. कारणांमुळे शरीरात दोषांचा प्रकोप होतो व त्यामुळे त्वचा, रक्त, मास यांच्या ठिकाणी द्दृष्टी निर्माण होते. व त्वचानुसार निर्माण होतात. तसेच हल्ली तरुण – तरुणींना कॉलेज क्लास, नोकरी इ. गोष्टीमुळे सतत बाहेर राहावे लागते, त्यामुळे बाहेरचे चमचमीत, तेलकट मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. यामुळे असेच वेळी – अवेळी जेवण करणे, रात्री जागरण करणे, चालनीज, पावभाजी, मिसळ इ. विदाही पदार्थ खाणे, सतत चिंता (Strees), वायू प्रदूषण (Air Pollution), व्यसने व्यायामाचा अभाव इ. कारणांनी सुद्धा तारुण्यापिटिका डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, त्वचेवर सुरकुत्या (Wrinkles) पडणे यांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या आरोग्यात बिघाड होऊ लागला की सर्वप्रथम त्याचा परिणाम त्याच्या त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावरील त्वचेवर आढळतो. आपण निरोगी असलो की त्वचा तजेलदार, सुंदर दिसते, त्वचेवर एकप्रकारचे तेज येते, आजारपणात किंवा मानसिक स्वास्थ बिघडले तरी तसेच त्वचा निस्तेज दिसते.

सौदर्याशी निगडीत त्वचेच्या समस्यांचे दोन प्रमुख आढळतात.

त्वचेचे गंभीर आजार उदा. विविध प्रकारचे त्वचारोग विशेषतः, इसब, सोरियासीस इ. यामध्ये त्वचा दिसायला खराब दिसते. याअर्थी याचा सौंदर्याशी संबंध असतो. पण प्रामुख्याने शारीरिक बिघाड झालेला असतो. त्यामुळे यात फक्त उपचार करून चालत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे त्वचेचे किरकोळ आजार जसे त्वचेवर काळे डाग पडणे, बारीक पुरळ पडणे, तारुण्यपिटिका इ. हे त्वचेचे किरकोळ आजार आयुर्वेदाने सांगितलेली जीवनशैली, आहार – विहार किंवा सर्वसाधारण उपाय यामुळे टाळू शकतो. रोजच्या जीवनात आपण जर खालील जीवनशैली आत्मसात केली तर नक्कीच त्वचेचे सौंदर्य वाढेल.

१) अभ्यंग – अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावून चांगले मालिश करणं होय यामुळे त्वचेखालच रक्ताभिसरण सुधारत त्वचा मऊ होते व त्वचेचा वर्ण सुधारतो, त्यामुळे रोज स्नानापुर्वी संपूर्ण अंगाला शक्य नसले तरी हात, पाय व चेहऱ्याला तेल जरूर लावावे. आयुर्वेदाने ऋतुनुसार तेल वापरण्यास सांगितले आहे, जसे हेमंत, शिशिर ऋतुत, तिळ तैल, शरद ग्रीष्म ऋतूत खोबरेल तेल इ.

२) उद्दर्तन  – उद्दर्तन म्हणजे उटणं. दिवाळीत आपल्याकडे उटण व तेल लावण्याची पद्धत आहे. उटण चोळल्यामुळे त्वचेचा सैलपणा जाऊन त्वचा घट्ट होते. त्वचेचा वर्ण सुधारतो व त्वचानितळ होते. त्यामुळे फक्त दिवाळीतच उटण न लावता साबनाऐवजी रोज त्रिफळा चूर्ण, डाळीचे पीठ +हळद जर लावले तर त्वचा नक्कीच तजेलवार होईल.

३) नस्य  – रोज जर नाकात, तेल किंवा तुपाचे २ – २ थेंब टाकले तर चेहऱ्याची त्वचा नक्कीच उजळेल.

४) मुखलेप -चेहऱ्यावर विविध प्रकारचे लेप लावणे त्वचेचा वेगवेगळ्या तक्रारीनुसार आयुर्वेदात अनेक प्रकारचे लेप सांगितले आहेत. यामुळे त्वचेचा वर्ण सुधारतो. यामुळे त्वचा मऊ व तजेलवर होते.

उदा. रुक्ष त्वचेसाठी – शतावरी + जेष्ट्मध+ अनंतमूळ + गुलाब + वाळा + नागरमोथा + हळद + यांचे चूर्ण एकत्र करून दुधात मिसळून त्याचा लेप लावणे.
त्वचाविकारासाठी  व्यवहारात उपयुक्त सर्व साधारण लेप, उपाय खालीलप्रमाणे –

१)  तारुण्यपिटिका (झळाश्रीशी) १) लोध्र + वेखंड + धणे चूर्ण एकत्र करून दुधात लावणे.
२)  चंदन + अनंता + मंजिष्ट मंजिष्टा + मुलतानी माती + कडूनिंब साल चूर्ण + आंबेहळद यात गुलाबपाणी मिसळून लावणे.
३) मुलतानी माती+ श्वेतचंदन + आवळा + जेष्ट्मध + मंजिष्ठा चूर्ण गुलाबपाण्यात मिसळून लावणे.
४) त्रिफळा चूर्ण + जेष्टमध + अनंता + मुलतांनी माती एकत्र करून दुधात लेप लावणे.
५) अर्जुन + गोरखमुंडी + नीम + अनंता चूर्ण एकत्रित करून लावणे.
६) काळे डाग – १)जालफळ +हळकुंड दुधात उगाळून लावणे.
७) रक्तचंदन उगाळून लेप लावणे.
८) मुलतानी माती व चंदन पाऊडर एकत्र करून लेप दुधात लावणे.
९) अनंतमुळ साल दुधात उगाळून लावणे.
१०) त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी -१) मसूर डाळीचे पीठ दुध व सायीत मिसळून लावणे.
११) चंदन + सारिया + मंजिष्टा + खस + आंबेहळद + मसूरडाळ पावडर दुधात एकत्र करून लावणे.
१२) रात्री १० बदात पाण्यात भिजवणे, सोलून पेस्ट मधात पेस्ट करून मधात मिसळून त्वचेला लावणे.
१३) त्वचा स्वच्छ होण्यासाठी (उश्र शरपिळरस)
१४) पपई + संत्रासाल + आवळा + कोरफड चूर्ण एकत्र करून लावणे.
१५) आठवड्यातून १ वेळा लिंबू साल किंवा टोम्यटो चेहऱ्यावर चोळणे.
१६) त्वचा जर तेलकट असेल तर त्रिफळा चूर्ण वापरून चेहरा धुवावा.
१७) डोळ्याखाली  काळी वर्तुळे –
१८) चंदन + जायफळ + हळकुंड दुधात उगाळून डोळ्याखाली लावणे.
१९) झोपतांना डोळ्यावर गाईचा दुधाचा गार पट्ट्य़ा ठेवाव्या.
२०) काकडी व बटाट्य़ाचे काप डोक्यावर ठेवणे.
२१) गुलाबजलात भिजवून कापसाचे बोळे डोळ्यांवर ठेवणे.                            

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu