डोळ्याचा आकर्षक मेकअप




Like
Like Love Haha Wow Sad Angry

One of the many challenges that working women face is choosing the right makeup while going to work. Here are few Tips of eye care and dress care for all working women. working women still have to grapple with the multi-roles that they play – these are traditional expectations of society.

home-tips-for-momsआरोग्य :-डोळ्याचा आकर्षक मेकअप…. डोळ्याचा नेहमी पेक्षा आकर्षक लुक मिळवू यां.

* हाय लाईट्स :- डोळे टपोरे आणि सतेज दिसावे यासाठी परफेक्ट हायलायटिंग करणं गरजेच आहे. हे साधण्यासाठी आयलीडच्या आतल्या बाजुला लाईट कलरची आयशेडो लावावी. मध्यभागी डार्क टोन ठेवावा. यामुळे डोळे ब्राईट आणि चिअरफुल दिसण्यास मदत होते.

* आकार :- डोळ्याचा नेसर्गिक आकार कसाही असला तरी मेकअपद्वारा वेगळ्या आकाराचा आभास करतां येतो. डोळे बारीक असल्यास आयलाइनर अथवा काजल बाहेरच्या बाजूस रेखून मोठे डोळे असल्याचा आभास करता येतो. डोळे अगदीच छोटे असतील तर बाहेरच्या बाजूला लाईट कलरची आयशेडो असावी. याउलट डोळे मोठे असतील तर आतल्या बाजूला लाईट कलरची आयशेडो करावी.

* स्यण्वीच लुक :-   ग्ल्यामरस लुकसाठी या प्रकारच्या डोळ्याचा मेकअप योग्य ठरतो. यामध्ये डोळ्यांच्या दोन्ही बाजूला हायलाईट केल्या जातात आणि मधल्या भागात पेहरावाला म्यचं होणारी आयशेडो लावली जाते.

* क्यट शेप :- यामध्ये डोळ्यांचा बाहेरचा कोपरा आणि एण्डलाईन हायलाईट केली जाते यामुळे डोळ्याला छानसा आकार प्राप्त होतो.


कपड्यांची काळजी :

आजच्या काळात कपड्यावर जास्तच खर्च केला जातो. त्यामुळे कपड्यांची योग्य सोय लावणे फार महत्वाचे आहे. भारी कपड्यावर पडणारे डाग हा गृहिणींच्या दृष्टीने चिंतेचा विषय असतो. ते कसे दूर करावे हा प्रश्नच असतो. आजकाल रंगीत कपडे सर्रास ड्राय केले जातात. ते कपडे धुण्याची वेळ येते तेव्हा मात्र तापदायक वाटू लागतात एक तर ते रंग जावून खराब होण्याचा संभव असतो. शिवाय ईतर कपड्यांना रंग लागण्याची भीती असते. तेव्हा धुताना थोडी काळजी घेतल्यास हा धोखा टळू शकतो. कपडे दीर्घ काळ टिकू शकतात व रंग हि ब्राईट दिसतात. यासाठी कांही विशेष युक्त्या आहेत. पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे कधीही डाय केलेल्या कपड्या सोबत भिजवू नयेत कारण हे डाय निधून जातात. आणि ईतर कपड्यांवर त्याचे डाग लागतात. डाय केलेले कपडे पहिल्यांदा भिजवताना पाण्यात रॉकसोल्ट (नेहमीच खाण्यातील मीठ ) आणि चिमुटभर खाण्याचा सोडा टाकावा.या पाण्यात थोडा वेळ हे कपडे भिजवून ठेवावेत आणि नंतर हलक्या साबणानं (अंगाला लावण्याच्या साबणानं) धुवावेत. रंगीत कपडे खूप वेळ भिजवू नयेत. भिजविल्या नंतर पंधरा मीनीटाने धुवावेत. त्यासाठी कधीच ब्रशचा वापर करू नये. तसेच हे कपडे गरम पाण्यात कधीच धुवू नये. याशिवाय डाय केलेले कपडे नेहमी आतल्या बाजूने साफ करावे या कपड्यानचा रंग उतरल्या नंतरही वापर करता येतो. अश्या पद्धतीने घरच्या घरीच सोप्या पद्धतीने कपड्यांची काळजी पूर्वक स्वच्छता होवू शकते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu