संकल्प करण्याची संधी !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The opportunity to determination: Opportunities arise whether you expect them or not, sometimes you have to have the courage to go out and look for them, that requires determination as well, So… It takes determination to look for opportunities and it takes determination to succeed in the opportunities given…

determination‘कृपावधी’ म्हणजे कृपा अवधी …. सध्या आपल्याला मिळालेला अवधी वर्ष्याच्या शेवटी शेवटच्या काही दिवसांचा काळ या दिवसात आपण आपल्या अंतर्यामी असणार्या संकल्प शक्तीला जागृत करण्याचा कारण नवीन वर्ष्याच्या आरंभी आपल्याला मिळणारी नामी संधी.

नियतीने माणसाला प्रत्येक निर्मिती साठी निश्चित असा एक अवधी दिला आहे जेणे करून त्याने होनार्या चुका सुधाराव्यात आणि केवळ उत्तमतेचा ध्यास धरावा.हाच तो ‘कृपावधी’ म्हणायचा मनुष्याला हा कृपावधी दिला गेला नसता तर तो कधीही आपल्या दृष्टीलक्ष पर्यंत पोचला नसता. ‘मनुष्य जेव्हा आपल्या जीवनावर मनन करतो तेव्हाच तो खर्या अर्थानं जगण शिकतो.’

एक कार्य पूर्ण झाल्या नंतर दुसरे सुरु करण्यापूर्वीच्या मधल्या वेळेला ‘कृपाअवधी’ म्हटलेले आहे जसे परीक्षा संपल्या नंतर निकाल हाती येण्या पूर्वी विद्यार्थ्या कडे जो वेळ असतो त्यात पुढील अभ्यास कसा करावयाचा त्यावर मनन करू शकतो. पूर्वी झालेल्या चुकांवर विचार करून पुढील प्रगती साठी कार्ययोजना बनवू शकतो. प्रत्येकाने या ‘कृपावधीचा’ अवसर साध्य केला पाहिजे.

हाच एक मनुष्याच्या पृथ्वीलक्ष गाठण्याचा अवधी आहे. यातूनच पुढे अत्युच्च गोष्ठी प्राप्त करण्यासाठी तो पृथ्वीतला वर आलेला आहे. यातूनच आत्म निर्माण होईल. या अवधीत आपल्याला विचार करण्याची कला शिकून चेतनेच्या सर्वोच्च स्तरावर आनंदान कार्य करावयाचे आहे.

विश्वातील सर्व सकारात्मक गोष्टींसाठी ग्रह्नशील बनायचे आहे. या वेळेचा सदुपयोग भविष्यातील सर्वोत्तम कार्य योजना बनविण्यासाठी करावयाचा आहे. हा अवधी काही भूतकालावरील चुकांवर अश्रू ढाळायचा नसून त्यातून योग्य ती शिकवण घेऊन उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्याच्या संधीचा आहे हे विचार व नंतर कृती करून जीवनात अनेक प्रकारे परिवर्तन घडवून आणण्याचा काळ आहे. मला काय हवं आहे! यावर जरूर मनन करा!

विचार कमी पण योग्य करा…

कुठल्याही कामाची योजना आखूनच सुरवात करा या करीता स्वत:ला थोडी व्यायामाची व घ्यान करण्याची किंचित सुरवात करा. ध्यानात असताना आपल्या मनाला विचारा ते किती वेळ ध्यान करू शकते ? तेवढा वेळ ध्यान अवश्य करा. मनातून सर्व काम करून घेण्यासाठी त्याला थोडी ध्यानाची सवय लावा. म्हणजे तो मन चांगला विचार करू शकेल. नाही तर आपले हे मन कामाची फार टाळाटाळ करू इच्छितो.

मनाला नेहमी लवचिक ठेवा त्याला कठोर बनवू नका. हे सर्व घ्यान किंवा व्यायामा द्वारे शक्य होवू शकेल. घ्यान, व्यायाम, मनन, नंतरच सुविचार उत्पन्न होतील. या खेरीज थोडा परंतु चांगला विचार करण्यासाठी आपल्याला लेखन,वाचन या सर्व गोष्टींची अतिशय आवश्यकता आहे. चांगल्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी नित्य नवनवीन बनणे गरजेच आहे. त्या नंतरच जुन्या प्रवृत्तीतून मनुष्य मुक्त होतो. कारण बुद्धीचा लवचीकपणा व्यक्तीला सहजपणे नाविन्य प्रदान करतो. बुद्धी हि नव्या दृष्टीकोनातूनच परिवर्तन घडवून आणण्यास तत्पर असते.

स्वत:चे प्रामाणीकपणे आत्मनिरीक्षण करा. हे कृपा अवधीतच शक्य होवू शकते. नाही तर मनुष्याला स्वत:चे आत्म निरीक्षण करण्यास सवडच होत नाही. तेव्हा कृपावधीतच आत्मनिर्माणाचे कार्य सुरु करा. जे कार्य करावयाचे असेल ते एकाच वेळी शक्य होत नसल्यास त्याची लहान हिश्यात विभागणी करून करा. म्हणजे त्यात रुची वाटेल.

आपल्या मनात दररोज होणारे विचार एका डायरीत लिखित करा म्हजेच याला लिखित मनन म्हणतात. त्यामुळे आपले सकारात्मक अनुभव, विचार हे आचरणात आणण्यास मद्दत होईल. अन्यथा विचार येतात आणि जातात. ज्यावेळी आपल्याला सवड असेल त्यावेळी लिखित असेलेली डायरी आवश्य वाचा. म्हणजे पुढील कार्य सुरवात करण्यास सोपे जाईल.

कृपा अवधीत आपण जितके जास्त मनन करू तितकीच जास्त कृपा अनुभवू शकणार. त्याच कृपेच स्मरण करून निसर्गाने आपल्यावर केलेल्या भरपूर प्रेमाला धन्यवाद देरवून नवीन वर्षात सहजतेने प्रवेश करू या! .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा